एल्गार परिषद होणारच..पोलिसांनी परवानगी दिली पण...

एल्गार परिषदेला परवानगी देण्यात येत नसल्याने मागील काही काळापासून वाद सुरू होता. अखेर परिषदेला परवानगी मिळाली आहे.
pune police gave permission to hold elgar parishad on 30th january
pune police gave permission to hold elgar parishad on 30th january

पुणे : एल्गार परिषदेला पुणे पोलिसांकडून परवानगी मिळत नसल्याने मागील काही काळापासून गदारोळ सुरू होता. अखेर एल्गार परिषदेला पुणे पोलिसांनी परवानगी दिली. पण, या परिषदेला केवळ दोनशे जणांनाच उपस्थित राहता येणार आहे. ही परिषद 30 जानेवारीला स्वारगेट येथील गणेश कला क्रीडा मंच येथे होणार आहे. 

एल्गार परिषदेला परवानगी मिळावी, यासाठी निवृत्त न्यायाधीश बी. जी. कोळसे पाटील यांनी स्वारगेट पोलिसांकडे अर्ज दिला होता. त्यानंतर एल्गार परिषदेला परवानगी देण्याचा निर्णय पोलिसांनी घेतला आहे. ही परिषद 30 जानेवारीला आयोजित करण्यात आली आहे. कोरोनाच्या संसर्गामुळे सरकारने ठरवून दिलेल्या नियमावलीनुसार ही परिषद होणार आहे. त्यामुळे फक्त दोनशे जणांनाच या परिषदेस उपस्थित राहण्याची परवानगी देण्यात आली आहे, अशी माहिती स्वारगेट पोलीस ठाण्याचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक बाळासाहेब कोपनर यांनी दिली. 

मागील वर्षी 31 डिसेंबरला एल्गार परिषदेचे आयोजन करण्याचा निर्णय संयोजकांनी घेतला होता. पंरतु, पोलिसांनी कायदा-सुव्यवस्था आणि कोरोना संसर्गाच्या पार्श्‍वभूमीवर परिषदेला परवानगी नाकारली होती. यामुळे परिषदेचे संयोजक निवृत्त न्यायाधीश कोळसे पाटील यांनी आंदोलनाचा इशारा दिला होता. शनिवारवाड्याच्या प्रांगणात 31 डिसेंबर 2017 रोजी एल्गार परिषदेचे आयोजन करण्यात आले होते. त्यानंतर दुसऱ्या दिवशी 1 जानेवारी 2018 रोजी भीमा-कोरेगाव येथे दोन गटांत वाद होऊन हिंसाचार झाला होता. एल्गार परिषदेमुळे हिंसाचार भडकला होता, असा ठपका पोलिसांकडून त्यावेळी ठेवण्यात आला होता. 
 

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Sarkarnama News
sarkarnama.esakal.com