पुणे पदवीधर : 42 हजार मतदार नोंदणी केलेल्या रवींद्र भेगडेंसाठी पुणे जिल्हा भाजप आग्रही - pune bjp supports ravindra bhegade for mlc candidate | Politics Marathi News - Sarkarnama

ब्रेकिंग न्यूज

पूरग्रस्तांना तातडीची मदत; घरात पाणी शिरलेल्यांना १० हजार, अन्न धान्याचे नुकसान झालेल्यांना ५ हजार रुपय मिळणार. वडेट्टीवार यांची घोषणा
सातारा : राष्ट्रवादी काँग्रेसच्या सर्व आमदार व खासदारांचे एक महिन्याचे वेतन पुरग्रस्तांना देण्यात येणार आहे, अशी माहिती उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी सांगलीत दिली.

पुणे पदवीधर : 42 हजार मतदार नोंदणी केलेल्या रवींद्र भेगडेंसाठी पुणे जिल्हा भाजप आग्रही

सरकारनामा ब्यूरो
मंगळवार, 3 नोव्हेंबर 2020

भेगडे यांच्या नावावर शिक्कामोर्तब करावे, अशी पुणे जिल्हा भाजपची मागणी...

पुणे : पुणे पदवीधर मतदारसंघात ४२ हजारांहून अधिक नवीन पदवीधर मतदारांची नोंद करून भारतीय जनता पक्षाची दावेदारी आणखी मजबूत करणाऱ्या रवींद्र भेगडे यांना उमेदवारी मिळावी अशी मागणी जिल्हाध्यक्ष गणेश भेगडे यांनी पक्षाचे प्रदेशाध्यक्ष चंद्रकांतदादा पाटील यांच्याकडे केली आहे.

भारतीय जनता पक्षाचे जिल्हाध्यक्ष  गणेश भेगडे यांनी प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील यांना पत्र देऊन पुणे पदवीधर मतदारसंघातून पक्षाची अधिकृत उमेदवारी भेगडे यांना मिळावी अशी मागणी केली आहे. रवींद्र भेगडे हे मावळ तालुका भाजपचे अध्यक्ष आहेत. 

जनसंघाच्या स्थापनेपासून भेगडे कुटुंब पक्षाचे निष्ठावंत कार्यकर्ते राहिलेले आहेत.  विद्यार्थीदशेतच राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे स्वयंसेवक म्हणून काम करत रवींद्र भेगडे यांनी संघटन विस्ताराचे काम महाराष्ट्रभर केले आहे. मावळचे माजी आमदार दिगंबर भेगडे यांच्या मार्गदर्शनाखाली १९९८ पासून रवींद्र भेगडे लोकसेवेत आपले योगदान देत आहेत. मावळसह पुणे जिल्ह्यात भारतीय जनता पक्षाची धोरणे घरोघरी पोहचवण्यासाठी त्यांनी मेहनत घेतली आहे असे भाजपचे कार्यकर्ते सांगतात. पुणे पदवीधर मतदारसंघाच्या पुणे विभागाचा नोंदणी प्रमुख म्हणून पक्षाने दिलेली जबाबदारी यशस्वीपणे सांभाळताना सुमारे ४२ हजार पेक्षा जास्त नवीन पदवीधर मतदारांची नोंद त्यांच्या अध्यक्षतेखाली झालेली आहे. पदवीधर मतदारांपर्यंत पोहचण्यासाठी भेगडे यांनी राबिवलेल्या उपक्रमांना मतदारांनी देखील अतिशय सकारात्मक प्रतिसाद दिलेला दिसून आला आहे.

गेली १2 वर्षे भाजपकडे असलेला पुणे पदवीधर मतदारसंघ आणखी बळकट करण्यासाठी रविंद्र भेगडेंनी केलेले प्रयत्न, जनसंघाच्या स्थापनेपासून पक्षाशी असलेली निष्ठा, तरूण चेहरा आणि मतदारांशी असलेला थेट संपर्क याच्या जोरावर भाजपची उमेदवारी त्यांना मिळेल, अशी शक्यता वर्तवली जात आहे.

अधिक राजकीय बातम्यांसाठी सरकारनामा अॅप डाऊनलोड करा
Play Store    App Store

संबंधित लेख