वडापावचे पैसे बुडवणं पडलं महागात...गजा मारणे टोळीविरुद्ध दरोड्याचा गुन्हा

सराईत गुंड गजा मारणे याच्या अडचणीत आणखी वाढ झाली आहे. टोल बुडवल्याप्रकरणी खंडणीचा गुन्हा दाखल झाल्यानंतर आता दरोड्याचा गुन्हा दाखल झाला आहे.
police registers dacoity offence against criminal gaja marane
police registers dacoity offence against criminal gaja marane

पिंपरी : पुण्यातील सराईत गुंड गजा मारणे व त्याच्या साथीदारांनी मुंबई-पुणे द्रुतगती महामार्गावरील ऊर्से टोलनाक्यावर टोलबरोबर वडापाव आणि पिण्याच्या पाण्याच्या बाटल्यांचेही पैसे दिले नसल्याचे समोर आले आहे. त्यामुळे त्यांच्याविरुद्ध दरोड्याचाही गुन्हा आज दाखल करण्यात आला. यामुळे गजा टोळीविरुद्धचा फास पिंपरी चिंचवड पोलिसांनी आणखी कडक आवळला आहे. 

आता हा अजामीनपात्र असा दरोड्याचा गंभीर गुन्हा आणि अगोदर दहशत पसरवल्याबद्दलचे दाखल झालेले पाच गुन्हे असे एकूण सहा गुन्हे  दाखल झाल्याने गजा मारणे टोळीला मोका लावण्याची तयारी पिंपरी चिंचवडचे पोलीस आयुक्त कृष्णप्रकाश यांनी सुरु केली आहे. त्यांनी स्वतः आज याला दुजोरा दिला. तसे झाले, तर गजाला पुन्हा काही महिने तुरुंगात काढावे लागणार आहेत. 

न्यायालयाने दोन खून खटल्यातून निर्दोष मुक्तता करताच गजाची १५ फेब्रुवारीला तळोजा मध्यवर्ती कारागृहातून सुटका झाली होती. त्यावेळी त्याच्या साथीदारांनी त्याची तळोजा ते पुणे अशी जंगी मिरवणूक काढली होती. त्याबद्दल दहशत माजवल्याबद्दल पहिला गुन्हा पिंपरी चिंचवड पोलिसांनी गजा व साथीदारांविरुद्ध नोंद केला. त्यानंतर पुणे व खोपोलीतही ते दाखल करण्यात आले. पण, हे सर्व गुन्हे जामीनपात्र असल्याने एका गुन्ह्यात गजाने लगेचच जामीनही घेतला होता. 

दरम्यान, तळेगाव दाभाडे पोलिस ठाण्यावरील गुन्ह्याचा तपास करताना गजा व साथीदारांनी एक्स्प्रेस वे वरील ऊर्से टोलनाक्यावर टोलच भरला नसल्याचे आढळले. तसेच, तेथील फूडमॉलवर त्यांनी घेतलेला वडापाव आणि पाण्याच्या बाटल्यांचेही पैसे त्यांनी दिले नसल्याचे दिसून आले. त्यामुळे त्याप्रकरणी त्यांच्याविरुद्ध खंडणीचा गुन्हा आता तळेगाव दाभाडे पोलिस ठाण्यात आज दाखल करण्यात आला. त्यामुळे गजा सापडला,तर आता तो लगेच जामिनावर सुटणार नाही. त्यात जर मोका लागला,तर पुन्हा काही महिने त्याला तुरुंगात घालवावे लागणार आहेत. 

Edited by Sanjay Jadhav

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Sarkarnama News
sarkarnama.esakal.com