`मैं हूॅ डाॅन` म्हणणे मंगलदास बांदल यांना पडले महाग : पोलिसांकडून गुन्हा दाखल

लाॅकडाऊनचे उल्लंघन झाल्याबद्दल राजकीय नेत्याविरुद्ध पहिलाच गुन्हा दाखल झाला आहे.
`मैं हूॅ डाॅन` म्हणणे मंगलदास बांदल यांना पडले महाग : पोलिसांकडून गुन्हा दाखल
bandal

पुणे : जिल्हा परिषदेचे माजी सभापती मंगलदास बांदल यांच्यासह आठजणांविरुद्ध शिक्रापूर पोलिसांनी गुन्हा दाखल केला आहे. कोरोना लाॅकडाऊन काळातील निर्बंधांचे पालन न केल्याबद्दल हा गुन्हा दाखल झाला आहे. 

पोलिस हवालदार ब्रह्मा पोवार यांनी याबाबत फिर्याद दिली आहे. बांदल हे `मै हूॅं डाॅन` हे गाणे आपल्या साथीदारांह एकत्र गात असल्याचा व्हिडीओ व्हायरल झाला होते. हा व्हिडीओ पोवार यांच्या व्हाॅटस अपवर व तसेच बाबू पाटील ढमढेरे यांच्या फेसबुकवर शेअर करण्यात आला होता. या व्हिडीओत एकूण आठ ते दहाजण दिसतात. त्यातील संदीप भोंडवे, संजय जगताप हे माझ्या ओळखीचे असल्याचे पोवार यांनी आपल्या फिर्यादित म्हटले आहे. त्यामुळे त्यांच्यावरही गुन्हा नोंद झाला आहे. 

कोरोना महासाथीच्या काळात जिल्हाधिकाऱ्यांनी जमावबंदी तसेच संचारबंदी लागू केली आहे. त्यामुळे पाचजणांपेक्षा एकत्र येण्यास मज्जाव करण्यात आला आहे. या व्हिडिओत बांदल यांच्यासह इतर त्यांचे मित्र स्पीकरवर गाणी म्हणत होते. मोठा साऊंडट्रकही लावण्यात आलेला होता. बांदल हे मेै हू्ॅ डाॅन हे गाणे म्हणत असल्याचे व्हिडिओत दिसत आहे. त्याला इतरजण साथ देत असल्याचे दिसून येत आहे. यात कोणीही मास्क घातलेला नव्हता. हे सारे नियमांचे बंधन उल्लंघन असल्याचे फिर्यादित नमूद करण्यात आले आहे. 

हा व्हिडीओ व्हायरल झाल्यानंतर तो वरिष्ठ पोलिस अधिकाऱ्यांपर्यंत पोहोचला. त्यामुळे अशा एकत्र येण्यावर बंधने असतानाही त्याचे उल्लंघन केल्याबद्दल गुन्हा दाखल करण्यात आला आहे. बांदल यांच्याविरुद्ध पुण्यातील एका सराफ व्यावसायिकाकडे खंडणी मागितल्याच्या प्रकरणी गुन्हा दाखल झाला आहे. त्यावर ते सध्या जामिनावर आहेत. त्यांना वैद्यकीय कारणांमुळे जामीन देण्यात आला आहे. 

Related Stories

No stories found.
Sarkarnama
www.sarkarnama.in