`लाॅकडाऊन रिटर्न्स : सायंकाळी चार वाजता पुणे बंद, रात्रीची संचारबंदी (वाचा सविस्तर आदेश)

हे आदेश येत्या सोमवारपासून (28 जून)लागू होतील
lockdown in Pune
lockdown in Pune

पुणे : पुणे शहरात पुन्हा आता लाॅकडाऊन सुरू झाला आहे. दुकानांच्या वेळाही घटविण्यात आल्या आहेत. हाॅटेलवरही निर्बंध लादण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. पाॅझिटिव्हिटी रेट वाढल्याने प्रशासनाने हे पाऊल उचलले आहे. त्यामुळे पुणे रूळावर येण्याआधीच पुन्हा निर्बंध आले आहेत.

महापालिका आयुक्तांनी जारी केलेले सविस्तर आदेश पुढीलप्रमाणे- हे आदेश येत्या सोमवारपासून (28 जून) लागू होतील 

१) पुणे महानगरपालिका क्षेत्रातील सर्व अत्यावश्यक सेवा ( Essential Category ) मधील नमूद दुकाने ही सर्व दिवस दुपारी ०४.०० वाजेपर्यंत सुरू राहतील,

२) अत्यावश्यक दुकानांव्यतिरिक्त इतर दुकाने ( Non-Essential Shops) सोमवार ते शुक्रवार दुपारी ०४.०० वाजेपर्यंत सुरू राहतील. शनिवार व रविवार पूर्णतः बंद राहतील.

३) मॉल, सिनेमागृह Single Screen and Multiplex) नाट्यगृह संपूर्णतः बंद राहतील,

४) रेस्टॉरंट, बार, फुड कोर्ट हे सोमवार ते शुक्रवार दुपारी ४.०० वाजेपर्यंत आसन क्षमतेच्या ५०% क्षमतेने सुरु राहतील. दुपारी ४.०० नंतर तसेच शनिवार व रविवार फक्त पार्सल सेवा / घरपोच सेवा ( Home Delivery ) रात्री ११.०० पर्यंत सुरु राहील.

५) लोकल ट्रेनमधून फक्त वैद्यकीय सेवेसाठी अत्यावश्यक सेवेतील कर्मचारी व महिलांसाठी शासकीय कर्मचारी, विमानतळ सेवा ( Airport Services), बंदरे सेवा ( Port Services) यांच्या कर्मचाऱ्यांना प्रवास करणेस परवानगी राहील.

६) पुणे महानगरपालिका क्षेत्रातील सार्वजनिक ठिकाणे (उद्याने ), खुली मैदाने, चालणे व सायकलिंग आठवड्यातील सर्व दिवस सकाळी ०५.०० ते सकाळी ०९.०० वाजेपर्यंत सुरू राहतील.

७) सुट देण्यात येत असलेल्या आस्थापना / सेवा Exemption Category ) व्यतिरिक्त सर्व खाजगी कार्यालये कामाचे दिवशी ( working days) ५०% कर्मचारी क्षमतेने दुपारी ०४.०० वाजेपर्यंत

८) पुणे महानगरपालिका क्षेत्रातील सर्व अत्यावश्यक सेवा व कोविड १९ व्यवस्थापनाशी संबंधित शासकीय कार्यालयांचे कामकाज (Government Offices and Emergency Services required for Covid-19 Management) १००% क्षमतेने सुरु राहतील.

शासकीय कार्यालये ( अत्यावश्यक / कोरोना विषयक कामकाज करणाऱ्या कार्यालयां व्यतिरिक्त ) ५०% अधिकारी / कर्मचारी उपस्थितीत सुरु राहतील. उपरोक्त कार्यालये / आस्थापना यांना यापेक्षा जास्त कर्मचारी उपस्थित असणे आवश्यक असल्यास संबंधित आस्थापना प्रमुख यांनी आपत्ती व्यवस्थापन प्राधिकारी यांची परवानगी घ्यावी.

९) सर्व आउटडोजर स्पोर्ट्स ( outdoor games) सर्व दिवस सकाळी ०५.०० ते ०९.०० या वेळेत सुरु

१०) सामाजिक, धार्मिक कार्यक्रम व मनोरंजन कार्यक्रम यास ५० लोकांच्या उपस्थितीत सोमवार ते शुक्रवार दुपारी ०४.०० वाजपर्यंत परवानगी राहील.

- उपरोक्त कार्यक्रमाचा कालावधी हा ३ तासांपेक्षा जास्त असू नये

 -सदर ठिकाणी खाद्यपदार्थचे सेवन करण्यास प्रतिबंध राहील.

-सदर कार्यक्रमात Covid Appropriate Behaviour (CAB) से पालन करावे.  आदेशाचे पालन न करणाऱ्या आस्थापनांवर दंडात्मक कारवाई करावी. तसेच बारंबार नियमांचा भंग झाल्यास सदर आस्थापनाचे परवाना रद्द करणे अथवा विशिष्ट दिवसापर्यंत संबंधित आस्थापना बंद करण्यात येतील.

(११) पुणे महानगरपालिका क्षेत्रातील सर्व धार्मिक स्थळे नागरिकांसाठी पूर्णपणे बंद राहतील. सदर ठिकाणी दैनंदिन पूजा / अर्चना करण्याकरिता परवानगी राहील..

(१२) लग्न समारंभ कार्यक्रम जास्तीत जास्त ५० लोकांच्या उपस्थितीत करणेस परवानगी राहील.

(१३) अंत्यसंस्कार, दशक्रिया व त्यांच्याशी निगडीत कार्यक्रम जास्तीत जास्त २० लोकांच्या उपस्थितीत करण्यास परवानगी राहील.

(१४) पुणे महानगरपालिका क्षेत्रामधील ज्या बांधकामाच्या ठिकाणी कामगारांची राहण्याची व्यवस्था आहे असे बांधकाम सुरु ठेवता येतील. तथापि, बाहेरून येणारे कामगार असल्यास असे बांधकाम दुपारी ०४.०० वाजेपर्यंत सुरु ठेवण्यास परवानगी राहील. मात्र बाहेरून येणारे कर्मचारी हे दुपारी ०४.०० वाजता तेथून घरी जाण्यासाठी बाहेर पडतील

१५) कृषी संबंधित दुकाने आणि त्यांच्याशी संबंधित आस्थापना (बी-बियाणे, खते, उपकरणे व त्यांच्या निगडीत देखभाल व दुरुस्ती सेवा इत्यादी ) तसेच कृषी उत्पन्न बाजार समिती मधील शेतमालाची विक्री करणारे दुकाने / गाळे हे सर्व दिवस दुपारी ०४.०० वाजेपर्यंत सुरू राहतील.

१६) ई-कॉमर्स सेवांना सर्व वस्तू व सेवा यांचा पुरवठा करण्याकरिता परवानगी राहील.

१७) पुणे महानगरपालिका क्षेत्रात सायंकाळी ०५.०० वाजेपर्यंत ५ पेक्षा जास्त लोकांना एकत्र येण्यास ( जमावबंदी ) प्रतिबंध राहील तसेच सायंकाळी ०५.०० नंतर ( अत्यावश्यक कारण बगळता ) संचारबंदी लागू राहील.

१८) व्यायामशाळा ( Gym), सलून, ब्यूटी पार्लर, स्पा, wellness centers आसन क्षमतेच्या ५०% क्षमतेने पूर्व नियोजित वेळेनुसार ( by appointment) दुपारी ०४.०० वाजेपर्यंत सुरू राहतील. मात्र शनिवार व रविवार पूर्णतः बंद राहतील. सदर ठिकाणी वातानुकूल ( A.C.) सुविधा वापरता येणार नाही.

१९) पुणे महानगरपालिका क्षेत्रातील सार्वजिक व्यवस्था ( PMPML) आसन क्षमतेच्या ५०% क्षमतेने (without standing) सुरु राहील.

२०) माल वाहतूक करणाऱ्या वाहनांना व त्यामध्ये जास्तीत जास्त व्यक्ती (चालक + क्लीनर / मदतनीस) यांना इतर प्रवाश्यांना लागू असलेल्या नियमानुसार प्रवास करणेस परवानगी राहील.

२१) खाजगी वाहनातून बसेस तसेच साथ अंतराच्या रेल्वे मधून अंतर जिल्हा प्रवास करण्यास परवानगी राहील. मात्र सदर वाहने शासनाने घोषित केलेल्या लेवल ५ मधिल ठिकाणी थांबणार असतील तर e-pass असणे बंधनकारक राहील अशावेळी वाहनामधून प्रवास करणाऱ्या प्रत्येक व्यक्तीसाठी स्वतंत्र e-passआवश्यक राहील.

२२) Export oriented units including MSMEs that need to fulfill export obligation) मधील उत्पादन नियमितपणे सुरु राहील.

२३) खालील उत्पादन क्षेत्र / उद्योग नियमितपणे सुरु राहतील.

अ) अत्यावश्यक वस्तूंचे उत्पादन करणारे उद्योग ( Essential goods manufacturing units ) (अत्यावश्यक वस्तूंचे उत्पादन करणाऱ्या उद्योगांना लागणारा कच्चा माल उत्पादन करणारे युनिट, त्याची पॅकेजिंग करणारे युनिट आणि संपूर्ण पुरवठा साखळी यासह).

ब) सतत प्रक्रिया करणारे उद्योग ( All continuous process industries) ( Units that require process that are of such a nature that these cannot be stopped immediately and cannot restart without considerable time requirement)

क) राष्ट्रीय सुरक्षा व संरक्षणाशी संबंधित उत्पादन करणारे उद्योग (Manufacturing of items that are significant to National Security and Defence)

ड) Data Centers/Cloud Service providers/ IT Services supporting critical infrastructure and services.

२४) उपरोक्त मुद्दा २२ व २३ येथे नमूद केलेल्या उद्योगांव्यतिरिक्त इतर सर्व उत्पादन क्षेत्र हे ५०% कर्मचारी क्षमतेने सुरु राहतील. कर्मचारी ने-आण कण्यासाठी संबंधित उद्योगांनी स्वतंत्र व्यवस्था करावी. सदर कर्मचाऱ्यांना सार्वजनिक वाहतूक व्यवस्थेतून प्रवास करता येणार नाही.

२५) उपरोक्त आदेशामध्ये परवानगी देण्यात आलेल्या ज्या अस्थापना दुपारी ०४.०० वाजेपर्यंत सुरू राहतीलठिकाणी काम करणारे कर्मचारी तसेच त्या ठिकाणावरून सेवा घेणारे नागरिक यांनी सायंकाळी ०५.०० वाजेपर्यंत त्यांचे घरी पोहोचणे अपेक्षित आहे.

(२६) पुणे महानगरपालिका क्षेत्रातील सर्व प्राथमिक, माध्यमिक शाळा, महाविद्यालये, शैक्षणिक संस्था यांचे नियमित वर्ग दिनांक १५ जुलै २०२१ पर्यंत पूर्णतः बंद राहतील. सर्व प्रकारचे कोचिंग क्लास प्रशिक्षण संस्था पूर्णतः बंद राहतील. मात्र ऑनलाईन शिक्षणास मुभा राहील.

 २७) मद्य विक्रीची दुकाने सोमवार ते शुक्रवार दुपारी ०४.०० वाजेपर्यंत सुरू राहतील, शनिवार व रविवार Home Delivery सुविधा सुरु राहील

२८) सदर आदेश हे पुणे महानगरपालिका क्षेत्रामध्ये येणाऱ्या पुणे कटक मंडळ व खडकी कटक मंडळ यांना देखील लागू राहतील.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Sarkarnama News
sarkarnama.esakal.com