तुरुंगातून सुटण्याचा जल्लोष करणारा गुंड गजा मारणे पुन्हा कोठडीत जाणार - pimpri police soon arrest gaja marane for unauthorized procession | Politics Marathi News - Sarkarnama

तुरुंगातून सुटण्याचा जल्लोष करणारा गुंड गजा मारणे पुन्हा कोठडीत जाणार

उत्तम कुटे
मंगळवार, 16 फेब्रुवारी 2021

गुंडाच्या मिरवणुकीवरून पोलिस लक्ष्य झाले होते. 

पिंपरी : तुरुंगातून सुटलेला पुण्यातील कुख्यात गुंड गजानन ऊर्फ गज्या मारणे लगेचच पोलिस कोठडीत जाण्याची शक्यता निर्माण झाली आहे. कारण त्याच्या सुटकेनंतर त्याच्या साथीदारांनी कोरोनाचे निर्बंध असतानाही केलेला मोठा आनंदोत्सव आणि काढलेली जंगी मिरवणूक त्याच्या अंगलट आली आहे. कारण दहशत पसरवल्याबद्दल गज्या व साथीदारांविरुद्ध तळेगाव दाभाडे (ता. मावळ जि. पुणे) पोलिस ठाण्याl आज गुन्हा दाखल झाला

पप्पू गावडे आणि अमोल बधे खून खटल्यातून गजाची निर्दोष मुक्तता झाल्याने नवी मुंबईच्या तळोजा मध्यवर्ती कारागृहात असलेला गजा काल सुटला. तुरुंगाबाहेर पडताच त्याचे जंगी स्वागत करण्यात आले. पुण्याकडे येताना तीनशे मोटारीतून त्याची मिरवणूक काढण्यात आली. पुणे-मुंबई एक्स्प्रेस वे वरील ऊर्से टोलनाक्यावर हा ताफा आला. तेथे फटाक्यांची आतषबाजी करण्यात आली. ड्रोनने या आनंदोत्सवाचे चित्रीकरणही तेथे करण्यात येत होते. कोरोनाचे निर्बंध अद्याप कायम असून उलट तो आणखी वाढत आहे. अशा परिस्थितीत ही जंगी मिरवणूक ती सुद्धा एका गुंडाची काढण्यात आल्याने त्याची पोलिसांनी दखल घेतली. चित्रीकरणासाठी वापरण्यात आलेला ड्रोन त्यांनी जप्त केला आहे. ओळख पटवून अटकेची कारवाई केली जाणार असल्याचे तळेगाव दाभाडे पोलिस ठाण्याचे निरीक्षक भास्कर जाधव यांनी `सरकारनामा`ला सांगितले.

दुसरीकडे वाघोली येथे शिंदेचा खून झाल्यानंतर त्याच्यावर स्तुतीसुमने उधळणारे व त्याच्या गुन्हेगारीचे उदात्तीकरण करणारे अनेक फलक पुणे-नगर महामार्गासह गावागावांमध्ये लागले होते. या सर्व फलकांची पोलिसांनी माहिती घेतली व ज्या फलकांवर श्रध्दांजली अर्पण करणारांची नावे होती त्या युवकांना शिक्रापूर पोलिस स्टेशनमध्ये बोलावून घेवून सर्वांना यथेच्छ चोप देण्यात आला. या शिवाय या सर्वांवर सरकारी जागेचे विद्रुपीकरण तसेच याच अनुषंगाने काही गुन्हे दाखल करण्यात आले व तात्काळ अटकसत्रही सुरू करण्यात आले. पुणे पोलिस मात्र गजा मारणेच्या पाठिराख्यांवर अशी कारवाई करण्यात कमी पडले. 

अधिक राजकीय बातम्यांसाठी सरकारनामा अॅप डाऊनलोड करा
Play Store    App Store

संबंधित लेख