पोलिस आयुक्त कृष्णप्रकाश यांचा दणका...दोन अधिकाऱ्यांना बसवले घरी

आरोपींच्या फायद्यासाठी गुन्ह्याची तीव्रता कमी करणाऱ्या दोन पोलिस अधिकाऱ्यांना पिंपरी-चिंचवडचे पोलिस आय़ुक्त कृष्णप्रकाश यांनी तडकाफडकी निलंबित केले.
पोलिस आयुक्त कृष्णप्रकाश यांचा दणका...दोन अधिकाऱ्यांना बसवले घरी
pimpri chinchwad police commissioner krishna prakash suspends two police officers

पिंपरी : आरोपींच्या फायद्यासाठी गुन्ह्याची तीव्रता कमी करणाऱ्या दोन पोलिस अधिकाऱ्यांना पिंपरी-चिंचवडचे पोलिस आय़ुक्त कृष्णप्रकाश यांनी काल रात्री तडकाफडकी निलंबित केले. यामुळे पोलिस दलात मोठी खळबळ उडाली आहे. वाहतूक नियमभंगाबद्दल एका महिला दुचाकीस्वाराकडून लाच घेणाऱ्या महिला वाहतूक पोलिसाला १८ डिसेंबरला निलंबित केल्यानंतर सहा दिवसांतच आणखी दोन अधिकाऱ्यांनाही घरी बसवून प्रामाणिक व खमक्या आय़ुक्तांनी अशा कारवाईची  हॅटट्रिक केली आहे. 

पिंपरी पोलीस ठाण्यावरील पोलीस निरीक्षक (गुन्हे)राजेंद्र निकाळजे आणि पोलीस उपनिरीक्षक तथा फौजदार एस.एस. जाधव अशी निलंबितांची नावे आहेत. आऱोपींना जामीन मिळण्यास मदत केली आणि तपासात हलगर्जीपणा केल्याचा ठपका त्यांच्यावर ठेवण्यात आला आहे. वाहन तोडफोडीच्या गुन्ह्यातील आरोपीवर खुनाच्या प्रयत्नाचा गुन्हा दाखल होता. मात्र, निकाळजे यांनी आरोपींना जमीन मिळावा या हेतूने गंभीर गुन्ह्याचे कलम कमी करून किरकोळ कलम लावले. तसे लेखी न्यायालयाला कळवले. 

दरम्यान, गंभीर व अजामीनपात्र गुन्हा हा किरकोळ व जामीनपात्र झाल्याने आरोपीला जामीन मिळाला. तसेच, जाधव यांनीही केले. दरोड्याचा गुन्ह्यातील ते कलम कमी करून तो किरकोळ गुन्हा असल्याचे त्यांनीही न्यायालयाला कळवले होते. 

हा प्रकार समजल्यानंतर त्यांच्याकडून खुलासा मागण्यात आला. तो न पटल्याने निलंबनाची कारवाई आयुक्तांनी केली. अवैध धंदे बंद करण्यासाठी पुरेसा वेळ दिल्यानंतरही ते चालू असलेल्या ठिकाणी आयुक्तांनी आपल्या पथकामार्फत (गुन्हा शाखेचे सामाजिक सुरक्षा पथक) तेथे धाडी टाकून ते बंद केले. त्यानंतर हे धंदे असलेल्या पोलिस ठाण्याच्या प्रमुखांची साईड ब्रँचला त्यांनी बदली केली होती. आता,मात्र त्यापुढचे पाऊल उचलत कर्तव्यात कसूर करणाऱ्यांना मग तो अधिकारीही का असेना त्यांनी थेट घरीच बसविण्यास सुरवात केल्याने शहर पोलिस दलात खळबळ उडाली आहे. 

Related Stories

No stories found.
Sarkarnama
www.sarkarnama.in