गजा मारणेच्या नऊ साथीदारांना पोलिसांनी पकडलं अन् ते चोवीस तासांत बाहेर!

गजा मारणे टोळीविरुद्ध पिंपरी पोलिसांची कारवाई सुरुच आहे. त्याच्या ९ साथीदारांना पोलिसांनी पकडले होते.
गजा मारणेच्या नऊ साथीदारांना पोलिसांनी पकडलं अन् ते चोवीस तासांत बाहेर!
pimpari chinchwad police arrests criminal gajanan marne nine associates

पिंपरी : कुख्यात गुंड गजा मारणे याच्या विरोधात कारवाईसाठी पिंपरी-चिंचवड पोलीस सरसावले आहेत. दहशत माजवल्याच्या आरोपाखाली गजा मारणे टोळीतील नऊ जणांना पिंपरी-चिंचवडमधील हिंजवडी पोलिसांनी काल (ता. अटक केली होती. मात्र, हा गुन्हा जामीनपात्र असल्याने 24 तासांच्या आतच त्यांची न्यायालयातून सुटका झाली आहे.
 
दहशत माजवल्याच्या गुन्ह्यात या नऊजणांना पुण्यातील कोथरुड पोलिसांनी पकडले होते. त्यांच्या मोटारी व मोबाईलही पोलिसांनी जप्त केलेले आहेत. त्या गुन्ह्यात त्यांची जामिनावर सुटका होताच लगेच हिंजवडी पोलिसांनी त्यांना आपल्याकडील तशाच गुन्ह्यात ताब्यात घेतले. त्यांना काल अटक करुन आज न्यायालयात हजर करण्यात आले. मात्र, न्यायालयात त्यांना जामीन झाला.त्यामुळे त्यांची सुटका झाली. 

दरम्यान, अशाच प्रकारचा तिसरा गुन्हा तळेगाव दाभाडे पोलिस ठाण्यात दाखल असल्याने त्यात आता हे आरोपी वर्ग करून घेतले जाण्याची शक्यता आहे. कोथरुड व तळेगावमधील जामीनपात्र गुन्ह्यात अटकेची कारवाई केल्यानंतर पिंपरी-चिंचवड पोलिस गजा व त्याच्या साथीदारांविरुद्ध दरोड्याच्या गुन्ह्यात अशी कारवाई करतील. त्यानंतर ते मोकान्वये त्यांच्या मुसक्या आवळणार आहेत.

दोन खूनाच्या आरोपातून निर्दोष मुक्तता होताच तळोजा कारागृहातून सुटका झालेल्या गजा मारणे आणि त्याच्या साथीदारांनी गेल्या महिन्यात १५ तारखेला तळोजा ते पुणे अशी जंगी मिरवणूक काढली होती. त्यावेळी त्याच्याविरुद्ध पहिला गुन्हा तळेगावला लगेच दाखल झाला होता. त्यानंतर कोथरूड, वारजे, हिंजवडी व खोपोली पोलीस ठाण्यात गुन्हे दाखल झाले होते. त्यात पोलिसांनी गजाच्या मिरवणुकीत वापरण्यात आलेल्या काही कोटी रुपयांच्या आलिशान मोटारी, मोबाईल व ड्रोन जप्त केलेला आहे. 

हिंजवडी पोलिसांनी पकडलेले नऊही आरोपी पुण्यातील असून, त्यातील आठ कोथरुड,तर एक बिबवेवाडीचा रहिवासी आहे. आकाश राजू सोनटक्के (वय २३), संतोष अरुण ढोकळे (वय ३७), अक्षय, संजय पिसाळ (वय ३१), राहुल रावसाहेब गायकवाड (वय २३), रमेश लालू राठोड (वय २५), हेमंत भीमराव गोडांबे (वय ३०), अमित संजय कुडळे (वय २९), पोपट यादव लासूरे (वय २८, सर्व रा.कोथरुड, पुणे) आणि अक्षय शिवाजी भागवत (वनय ३१,रा. बिबवेवाडी,पुणे) अशी अटक केलेल्यांची नावे आहेत, अशी माहिती या गुन्ह्याचे तपास अधिकारी सागर काटे आणि पोलिस निरीक्षक जोगदंड यांनी दिली. 

Edited by Sanjay Jadhav

Related Stories

No stories found.
Sarkarnama
www.sarkarnama.in