मराठा नेत्यांनो आता तरी जागे व्हा; अन्यथा सारे काही भस्म होईल : पार्थ पवारांचा इशारा

पार्थ यांच्या ट्विटमुळे खळबळ
मराठा नेत्यांनो आता तरी जागे व्हा; अन्यथा सारे काही भस्म होईल :  पार्थ पवारांचा इशारा
parth pawar ff.jpeg

पुणे : राज्याचे उपमुख्यामंत्री अजित पवार यांचे सुपुत्र  पार्थ पवार यांनी मराठा आरक्षण संदर्भाने तीन ट्वीट केले आहेत. या ट्वीटमुळे अनेकजण आश्चर्यचकित झाले आहेत . 

आरक्षण रद्द झाल्याने  मराठा समाजात अस्वस्थता दिसत असताना बीडच्या विवेक राहाडे या विद्यार्थ्याने आत्महत्या केल्याचे वृत्त समोर आल्यानंतर पार्थ यांनी आपल्या भावना ट्विटच्या माध्यमातून व्यक्त केल्या.

मराठा आरक्षणासाठी विवेकने आत्महत्या केल्याचं ऐकून मी व्यथित झालो आहें  ही  घटना अत्यंत दुःखद आहे सरकारने याकडे गंभीरपणे पाहावे. सरकारन या प्रकरणात  तातडीनं लक्ष घालावं,' असं पार्थ यांनी म्हटलं आहे. विवेकच्या आत्यहत्यमुळे पेटलेल्या ठिणगीमुळे साऱ्या व्यवस्थेला आग लागेल. त्याच्यासारख्या लाखो तरुणांना न्याय मिळावा म्हणून मी प्रसंगी न्यायालयात याचिका दाखल करेल. अशा लाखो `विवेक`ना न्याय मिळवून देणे माझे कर्तव्य आहे, अशी भावना त्यांनी व्यक्त केली आहे. विवेकच्या मृत्यूने मी हादरून गेलो आहे. मराठा नेत्यांनो आता तरी जागे व्हा, असे आवाहन त्यांनी केले आहे. सरकारने यात तातडीने हस्तक्षेप करण्याची मागणीही पार्थ यांनी केली आहे.

पार्थ यांच्या या ट्विटनंतर साहजिकच राजकीय प्रतिक्रिया येऊ लागल्या आहेत. राष्ट्रवादीच्या खासदार सुप्रिया सुळे म्हणाल्या की मराठा आरक्षण देण्याचा राष्ट्रवादीने प्रयत्न केला. महाराष्ट्र सरकारही आता त्यासाठी प्रयत्नशील  आहे. मी स्वतः धनगर समाजाला न्याय मिळावा म्हणून प्रयत्न करते आहे. पार्थ यांनी काही आवाहन केले असेल तर चांगली गोष्ट आहे, असे सुप्रिया सुळे म्हणाल्या. महसूलमंत्री बाळासाहेब थोरात यांनी पार्थचे ट्टिवट वाचल्यानंतर त्यावर प्रतिक्रिया देऊ असे सांगितले.  

Related Stories

No stories found.
Sarkarnama
www.sarkarnama.in