कोरोना संकटात पुणेकरांना मोठा दिलासा देणारी बातमी : नव्या रुग्णांची संख्या तीन आकड्यांत

पुण्यात नव्या रुग्णांची संख्या 15 मे नंतर झपाट्याने कमी...
Pune corona
Pune corona

पुणे : बेड मिळत नाहीत, व्हेंटिलेटरचा तुटवडा, रेमडिसिव्हरसाठी संघर्ष, लाॅकडाऊन, प्रियजनांचा मृत्यू अशा निगेटिव्ह बातम्यांनी नागरिकांना त्रासच होत आहेत. गेले दोन महिने हे सत्र थांबलेले नाही. मात्र या साऱ्या संकटात मोठा दिलासा आज 17 मे रोजी मिळाला आहे. ज्या पुण्यात रोज सात हजारांपर्यंत नवे रुग्ण सापडत होते तेथे 17 मे रोजी हा आकडा तीन आकड्यांवर आला आहे. या दिवशी सातशेच्या आसपासच नवीन रुग्ण आढळले आहेत. (only 700 new corona patients in Pune on May 17)

याबाबतची अधिकृत आकडेवारी सायंकाळी सात वाजता जाहीर होणार आहे. पालिकेचे (PMC) आरोग्यप्रमुख डाॅ. संजय वावरे यांनी दिलेल्या माहितीनुसार नव्या रुग्णांचा आकडा हा 700 च्या खालीच असणार आहे. रविवारी (ता. 16 मे) रोजी हा आकडा 1317 होता. गेल्या दीड महिन्यांत 16 मे रोजी रुग्णांची संख्या सर्वात कमी म्हणजे 1164  होती. यात आणखी मोठा दिलासा आठ दिवसांत मिळाला आहे. फक्त 700 रुग्णांची आज भर पडल्याने आरोग्य यंत्रणेसह अनेकांना हायसे वाटले आहे.

ही संख्या कमी होण्याची दोन-तीन कारणे सांगण्यात येतात. कोरोनाची लक्षणे कमी दिसू लागल्याने चाचण्या करणाऱ्यांचीही संख्या कमी झाली आहे. तसेच काही चाचण्यांचे रिपोर्ट येणे अद्याप बाकी असावेत, त्यामुळे हा आकडा कमी असावा, असे सांगण्यात येत आहे. पुण्यात अद्याप रोज दहा ते बारा हजार स्वॅब तपासणी होत आहे. त्यात कोरोना पाॅझिटिव्ह आढळणाऱ्या रुग्णांचे प्रमाण हे दहा टक्के आहे. हेच प्रमाण एप्रिल महिन्यात उच्चांकी पातळीवर म्हणजे 30 टक्क्यांवर पोहोचले होते. 25 हजार चाचण्या केल्या तर त्यात सुमारे 7500 कोरोना रुग्ण मिळत होते. हे प्रमाण आता झपाट्याने कमी होऊ लागले आहे. हा पाॅझिटिव्हिटी रेट पाच टक्क्यांच्या खाली गेल्यानंतर पुण्यातील लाॅकडाऊन उठविणे प्रशासनाला शक्य होणार आहे. सध्या तो आठ ते दहा टक्क्यांच्या आसपास आहे.

पुण्यातील रुग्णांची संख्या ही 15 मे नंतर झपाट्याने कमी होणे अपेक्षित होते. त्यानुसार घडत असल्याने तो मोठा दिलासा ठरणा आहे. पुण्यात काल (16 मे) दिवसभरात २९८५ रुग्णांना डिस्चार्ज देण्यात आला होता. पुण्यात १४१५ क्रिटिकल रुग्णांवर उपचार सुरू आहेत. पुण्यातील ॲक्टिव्ह रुग्ण संख्या ही 20 हजाराच्या खाली आहे. त्यातील 80 टक्के रुग्ण हे घरीच उपचार घेत असल्याने रुग्णालयातील कोरोना रुग्णांची संख्याही मोठ्या प्रमाणात घटली आहे. पुणे पालिकेच्या काॅल सेंटरला येणारे फोनही 80 टक्क्यांनी कमी झाले आहेत. 

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Sarkarnama News
sarkarnama.esakal.com