अजितदादा-फडणवीस एकत्र आले अन् झाला गोंधळ... - ncp and bjp workers creates ruckus in bhama askhed scheme program | Politics Marathi News - Sarkarnama

ब्रेकिंग न्यूज

मुख्यमंत्र्यांकडून 5 हजार 400 कोटींचे पॅकेज जाहिर...
पुढील 15 दिवस संचारबंदीच्या काळात अत्यावश्यक सेवा सुरू राहणार...
अत्यावश्यक सेवेतील कर्मचाऱ्यांसाठी सार्वजनिक वाहतूक सेवा सुरू ठेवणार...
नोंदणीकृत घरगुती कामगारांनाही आर्थिक मदत देणार...
नोंदणीकृत फेरीवाल्यांनाही पंधराशे रुपयांची मदत मिळणार...
परवानाधारक रिक्षाचालकांना पंधराशे रुपये देणार...
पुढील महिनाभर गरीबांसाठी मोफत शिवभोजन थाळी...दोन किलो तांदूळ, तीन किलो गहू मिळणार
राज्यात उद्या रात्री आठ वाजल्यापासून संचारबंदी...मुख्यमंत्र्यांची घोषणा

अजितदादा-फडणवीस एकत्र आले अन् झाला गोंधळ...

वृत्तसंस्था
शुक्रवार, 1 जानेवारी 2021

भामा-आसखेड पाणीपुरवठा योजनेचे लोकार्पण करण्याच्या कार्यक्रमासाठी अजित पवार आणि देवेंद्र फडणवीस एकत्र आले होते. या कार्यक्रमात राष्ट्रवादी आणि भाजपच्या कार्यकर्त्यांनी गोंधळ घातला. 

पुणे : पुणे शहराच्या पूर्व भागाला पाणीपुरवठा करण्यासाठी महत्त्वाची असलेल्या भामा-आसखेड पाणीपुरवठा योजनेचे लोकार्पण उपमुख्यमंत्री अजित पवार आणि विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांच्या हस्ते आज झाले. महापालिकेच्या मुख्य सभागृहात हा कार्यक्रम सुरु असताना सभागृहाबाहेर राष्ट्रवादी काँग्रेस आणि भाजपचे कार्यकर्ते आमनेसामने आले आणि  गोंधळ झाला. 

पुणे महापालिकेतील कार्यक्रमात अजित पवार आणि देवेंद्र फडणवीस आज एकत्र आले. या कार्यक्रमाला भाजपचे प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील उपस्थित होते. पवार आणि फडणवीस हे कार्यक्रमाच्या निमित्ताने एकत्र आल्याने ते काय बोलतात याबद्दल उत्सुकता होती. 

या कार्यक्रमासाठी भाजप आणि राष्ट्रवादीच्या कार्यकर्त्यांची मोठी गर्दी झाली होती. हा कार्यक्रम सुरु असताना दोन्ही पक्षाच्या कार्यकर्त्यांकडून घोषणाबाजी सुरू झाली. 'पुण्याची ताकद गिरीश बापट', 'जय श्रीराम', 'देश का नेता कैसा हो, फडणवीस जैसा हो', अशा घोषणा भाजप कार्यकर्त्यांनी देण्यास सुरवात केली. याला 'एकच वादा अजितदादा', असे जोरदार प्रत्युत्तर राष्टवादीने दिले.

यानंतर दोन्ही पक्षाचे कार्यकर्ते आमनेसामने भिडले. गेल्या काही दिवसांपासून  भामा-आसखेड प्रकल्पाचे श्रेय घेण्यावरुन जोरदार वाद सुरु आहे. त्याचेच प्रतिबिंब आजच्या कार्यक्रमात पडले. महापौर मुरलीधर मोहोळ यांनी हा कार्यकर्त्यांचा उत्साह आहे, असे सांगत या वादावर अधिक भाष्य करणे टाळले. 

या योजनेचे काम महापालिकेत राष्ट्रवादी काँग्रेसची सत्ता असताना सुरु झाले होते. त्यानंतर भाजपची सत्ता आली. या कालावधीत हे काम पूर्णत्वाला गेले आहे. तसेच, मधल्या काळात खेडमधील शेतकऱ्यांनी हे काम बंद पाडले होते. त्या वेळी उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी पुढाकार घेत या जलवाहिनीचे काम पूर्ण करण्यासाठी बैठका घेतल्या होत्या. त्यामुळे दोन्ही बाजूंनी आपल्याचमुळे काम मार्गी लागल्याचा दावा करत घोषणाबाजी केली.

भाजप सरकारने आर्थिक तरतूद करत ही योजना पूर्ण करण्यासाठी योगदान दिले होते. त्यामुळे या दोन्ही पक्षांच्या नेत्यांनी योजनेच्या कामात राजकारण केले नाही. मात्र, या योजनेच्या लोकार्पण सोहळ्यावेळी दोन्ही पक्षाच्या कार्यकत्यांमध्ये भामा-आसखेड प्रकल्पाचे श्रेय घेण्यावरुन जुंपल्याचे चित्र आज दिसून आले. 

Edited by Sanjay Jadhav

अधिक राजकीय बातम्यांसाठी सरकारनामा अॅप डाऊनलोड करा
Play Store    App Store

संबंधित लेख