गृहमंत्री दिलीप वळसे पाटलांचं रक्षाबंधन पोलिसांसोबत!

राज्यातील अनेक मंत्री व नेत्यांनी रक्षाबंधन सण साजरा करताना सामाजिक बांधिलकीही जपली आहे.
गृहमंत्री दिलीप वळसे पाटलांचं रक्षाबंधन पोलिसांसोबत!
HM Dilip Walse Patils Rakshabandhan with women police

आंबेगाव (जि. पुणे) : राज्याचे गृहमंत्री दिलीप वळसेपाटील यांनी रविवारी आगळ्यावेगळ्या पध्दतीने रक्षाबंधन सण साजरा केला. भीमाशंकर सहकारी साखर कारखाना येथे त्यांना मंचर पोलीस स्टेशनमधील पोलीस अंमलदार मनीषा शेळके-गाढवे यांनी राखी बांधली. (HM Dilip Walse Patils Rakshabandhan with women police)

राज्यातील अनेक मंत्री व नेत्यांनी रक्षाबंधन सण साजरा करताना सामाजिक बांधिलकीही जपली आहे. अनेकांनी कोरोना काळात जीवाची पर्वा न करता सेवा देणारे कोरोना योध्दे यांच्यासोबत हा सण साजरा केला आहे. गृहमंत्री वळसेपाटील यांनीही महिला पोलिस कर्मचाऱ्यांकडून राखी बांधून घेत सामाजिक बांधिलकी जपली. यावेळी उपविभागीय पोलीस अधिकारी अनिल लंबाते, पोलीस निरीक्षक सतीश होडगर, पारगाव बिट अंमलदार कैलास कड आणि सोमनाथ वाफगावकर हजर होते.

दरम्यान, वळसेपाटील यांनी बैलगाडा शर्यत बंदी उठवण्यासाठी प्रयत्न करत असल्याचे अखिल भारतीय बैलगाडा संघटनेच्या सभासदांना सांगितले आहे. या सभासदांनी भीमाशंकर साखर कारखान्यावर त्यांची भेट घेतली. बैलगाडा शर्यत बंदी संदर्भात न्यायालयीन लढाई लढून सर्वोच्य न्यायालयात प्रलंबित असलेले सुनावणी लवकरात लवकर होण्याचा प्रयत्न आहे. त्यासाठी आपली बाजू कायदेशीररित्या भक्कम व्हावी म्हणून राज्याचे अॅडव्होकेट जनरल व नामांकित वकीलांसोबत बैलगाडा संघटनेच्या प्रतिनिधींची लवकरच बैठक घेणार असल्याचेही वळसे पाटील यांनी सांगितले. 

बैलगाडा मालकांवरील गुन्हे मागे घेण्याची घोषणा केल्याबद्दल वळसे पाटील यांचा यावेळी देशी गाई वासराची प्रतिकृती देऊन सत्कार करण्यात आला. याप्रसंगी माजी आमदार पोपटराव गावडे, मंचर बाजार समितीचे सभापती देवदत्त निकम, मानसिंग पाचुंदकर, विश्वास कोहकडे, अखिल भारतीय बैलगाडा संघटनेचे बाळासाहेब आरुडे, संदीप बोदगे, शिवाजी निघोट, रामभाऊ टाकळकर, सर्जेराव खेडकर, पप्पू येवले आदी उपस्थित होते. 

बैलगाडा शर्यतीला सर्व पक्षांचा तसेच राज्य व केंद्र शासनाचाही पाठींबा आहे. राज्य सरकारच्या वतीने सुप्रीम कोर्टात याचिका दाखल केली असून त्यासाठी चार नामांकित वकिलांची नेमणूक केली आहे. देशातील काही राज्यांत शर्यत सुरु आहे, कारण तिथे आव्हान दिले गेले नाही. महाराष्ट्रात प्राणी मित्र संघटनेने आव्हान दिल्याने स्थगिती आली आहे. सुप्रीम कोर्टाचा तिढा सुटल्याशिवाय काहीही करता येणार नाही, असंही वळसे पाटील यांनी स्पष्ट केलं.

Related Stories

No stories found.
Sarkarnama
www.sarkarnama.in