पुण्यासाठी धक्कादायक दिवस : 24 तासांत कोरोना रुग्णांच्या संख्येत 5720 ने उच्चांकी भर - highest number of corona patients in 24 hours on Apr 3 | Politics Marathi News - Sarkarnama

ब्रेकिंग न्यूज

सातारा : लॉकडाऊनच्या विरोधात साताऱ्याचे भाजपचे खासदार उदयनराजे भोसले यांनी आज पोवईनाका येथे पोत्यावर बसून भिक मांगो आंदोलन केले.

पुण्यासाठी धक्कादायक दिवस : 24 तासांत कोरोना रुग्णांच्या संख्येत 5720 ने उच्चांकी भर

सरकारनामा ब्यूरो
शनिवार, 3 एप्रिल 2021

पहिल्यांदा चोवीस तासांत साडेपाच हजाराची संख्या पार

पुणे : पुण्यासाठी तीन एप्रिल 2021 हा दिवस धक्कादायक ठरला. याच दिवशी पुणे शहरात उच्चांकी कोरोनाचे रुग्ण सापडले. एकट्या पुण्यात 5 हजार 720 कोरोना रुग्ण आढळले. त्यापाठोपाठ पुणे जिल्ह्यात  आणि पिंपरी-चिंचवड या तीनही ठिकाणचा आकडा मिळून सुमारे दहा हजार रुग्ण चोवीस तासांत कोरोनाबाधित आढळले. आज राज्यात ४९,४४७ कोरोना रूग्णांचे निदान झाले असून २७७ कोरोना बाधितांचा मृत्यू

पुण्यात दिवसभरात ५७२० पाझिटिव्ह रुग्णांची वाढ झाली. त्यात दिवसभरात ३२९३ रुग्णांना डिस्चार्ज देण्यात आला. पुण्यात करोनाबाधीत ४४ रुग्णांचा मृत्यू. त्यातील नऊ  रूग्ण पुण्याबाहेरील होते. ८३७ क्रिटिकल रुग्णांवर उपचार सुरू आहेत. पुण्यात एकूण पॉझिटिव्ह रूग्णसंख्या २८३८१९. पुण्यातील ॲक्टिव्ह रुग्ण संख्या- ३९५१८. एकूण मृत्यू -५४११.
-आजपर्यंतच एकूण डिस्चार्ज २३८८९०.
- आज केलेल्या नमुन्यांची (स्वॅब) तपासणी- २००६६.

कर्फ्यूचे काटेकोर पालन

कोरोनाच्या वाढत्या संसर्गाच्या पार्श्‍वभूमीवर शहरात शनिवारी सायंकाळी सहा वाजल्यापासून संचार मनाई आदेशाची कडक अंमलबजावणी करण्यास सुरूवात झाली. सायंकाळी ठिक सहा वाजण्याच्या सुमारास पोलिसांच्या कारवाईच्या भितीने शहरातील बहुतांश व्यवहार बंद झाले, त्यानंतर चाकरमान्यांची घरी परतण्यासाठी एकच घाईगडबड सुरू झाल्याने बहुतांश मुख्य रस्त्यांवर वाहनांची गर्दी दिसू लागली. पोलिसांनी ठिकठिकाणी नाकेबंदी करून आदेशाच्या अंमलबजावणीला सुरूवात केल्याचे चित्र दिसत होते. 

शहरात शनिवारपासून सात दिवसांसाठी सायंकाळी सहा ते सकाळी सहा या वेळेत नागरीकांना संचार मनाई आदेश करण्यात आल्याचे महापालिका व पोलिस प्रशासनाकडून शुक्रवारी जाहीर करण्यात आले होते. त्याचे पडसाद शुक्रवारी सायंकाळपासूनच उमटण्यास सुरूवात झाली होती. तर शनिवारी दिवसभर नोकरदार, कामगार, कष्टकऱ्यांना सायंकाळी काम लवकर आटोपून घरी जाण्याच्यादृष्टीने प्रयत्न सुरू होते. दुपारी चार वाजल्यापासूनच शहरातील प्रमुख रस्त्यांवर वाहनांची वर्दळ वाढण्यास सुरूवात झाली. सायंकाळी सहा नंतर संचार मनाई आदेश लागू होत असल्याने, तसेच पोलिसांचा ससेमीरा पाठीमागे नको, म्हणून नागरीकांचा लवकरात लवकर घरी पोचण्याकडे कल होता. 

लॉक डाऊन नाही करायचे तर मग काय करायचे?

कोविड बाधित रुग्णांसाठी गृह विलगीकरण संदर्भात बृहन्मुंबई महानगरपालिकेच्या सार्वजनिक आरोग्य खात्याने सुधारीत सविस्तर मार्गदर्शक सूचना नुकत्याच प्रसारित केल्या आहेत. त्यानुसार लक्षणे नसलेले बाधित (asymptomatic) किंवा सौम्य लक्षणे असलेले रुग्ण ह्यांनी एकूण सतरा दिवसांचा गृह विलगीकरण (home quarantine) कालावधी पाळणे आवश्यक असून त्यामध्ये कोणतीही कपात करण्यात आलेली नाही, हे प्रशासनाकडून स्पष्टपणे नमूद करण्यात येत आहे.

काही प्रसारमाध्यमांमध्ये, मुंबईत लक्षणे नसलेले बाधित (asymptomatic) किंवा सौम्य लक्षणे असलेल्या रुग्णांचा गृह विलगीकरण कालावधी पूर्वीच्या १४ दिवसांऐवजी आता १० दिवस करण्यात आल्याचे वृत्त प्रसारित झाले आहे. ते अयोग्य आहे. उलटपक्षी सुधारीत सूचनांनुसार आता एकूण सतरा दिवस विलगीकरण पाळणे आवश्यक आहे. प्रसार माध्यमातील वृताच्या अनुषंगाने जनमानसात गैरसमज पसरू नये, म्हणून सविस्तर स्पष्टीकरण देण्यात येत आहे.

लक्षणे नसलेले बाधित (asymptomatic) किंवा सौम्य लक्षणे असलेले रुग्ण घरीच विलग राहून आणि सोबत योग्य औषधोपचार घेवून लवकर बरे होवू शकतात. असे रुग्ण निर्देशित केल्यापासून दहा दिवस गृह विलगीकरणात राहिल्यानंतर त्यांना महानगरपालिकेचे वैद्यकीय अधिकारी (आरोग्य) पथकाच्या सल्ल्यानेच डिस्चार्ज मिळाल्याचे मानण्यात येईल. त्यासाठी संबंधित रुग्णाने त्यांच्या विभागाच्या वैद्यकीय अधिकारी (आरोग्य) पथकाकडे दहा दिवस पूर्ण झाल्यावर प्रकृतीबाबत अद्ययावत माहिती देणे आवश्यक राहील. त्यानंतर त्याने इतर सर्व रुग्णांप्रमाणेच पुढील सात दिवस गृह विलगीकरण पाळणे आवश्यकच आहे. म्हणजेच दहा अधिक सात असे एकूण सतरा दिवस गृह विलगीकरण कालावधी पूर्ण करणे आवश्यक आहे. त्यात कोणतीही सूट दिलेली नाही, ह्याची कृपया सर्वांनी नोंद घ्यावी.

तसेच विलगीकरण कालावधी योग्यरीत्या पाळून सहकार्य करावे, असे आवाहन सार्वजनिक आरोग्य खात्याच्या वतीने कार्यकारी आरोग्य अधिकारी डॉ. (श्रीमती) मंगला गोमारे यांनी केले आहे.

अधिक राजकीय बातम्यांसाठी सरकारनामा अॅप डाऊनलोड करा
Play Store    App Store

संबंधित लेख