गायकवाड बापलेकांनी कर्जदाराला मगरी असलेल्या विहीरीत उलटे टांगले होते!

नानासाहेब शंकर गायकवाड व त्याचा मुलगा गणेश याची धरपकड झाल्यानंतर आता त्यांच्याविरुद्ध तक्रारींचा ओघ सुरु झाला आहे.
Flow of complaints started against of Nanasaheb Gaikwad and his son
Flow of complaints started against of Nanasaheb Gaikwad and his son

पिंपरी : डबल `मोका`तील क्रूरकर्मा गायकवाड बापलेकांविरुद्ध पिंपरी-चिंचवडमध्ये आणखी दोन गंभीर गुन्हे दाखल झाले आहेत. या दोन्ही गुन्ह्यातील फिर्यादी हे गॅरेजचालक असून त्यातील एकाला त्यांनी सूस (ता. मुळशी, जि.पुणे) येथील आपल्या फार्महाऊसमधील मगरी असलेल्या विहीरीत उलटे टांगले होते. पैसे न दिल्यास याच विहीरीत टाकण्याची धमकी त्याला दिल्याचे समोर आलं आहे. (Flow of complaints started against of Nanasaheb Gaikwad and his son)

नानासाहेब शंकर गायकवाड व त्याचा मुलगा गणेश याची धरपकड झाल्यानंतर आता त्यांच्याविरुद्ध तक्रारींचा ओघ सुरु झाला आहे. आतापर्यंत त्यांच्याकडून व्याजाने पैसे घेतलेले कर्जदार हे या दोघांच्या प्रचंड दहशतीमुळे गप्प होते. मात्र, त्यांना पुणे पोलिसांनी मोकान्वये अटक करताच आता तक्रारदार पुढे येत आहेत. गायकवाड बापलेक पुणे पोलिसांच्या अटकेत असल्याने ते वगळता वरील दोन गुन्ह्यात आरोपी असलेला त्यांचा वकील नाणेकर आणि मिश्रा नावाचा साथीदार यांचा शोध पिंपरी-चिंचवड पोलिसांनी सुरु केला आहे. त्यांचा वाहनचालक राजाभाऊ अंकुश हा येरवडा तुरुंगात असून तेथून त्याचा ताबा पोलिस घेणार आहेत.  

गायकवाड टोळीविरुद्ध बेकायदेशीर सावकारी, अपहरण, खंडणी आणि गोळीबाराचा ताजा गुन्हा काल (ता.२५) चिखली पोलिस ठाण्यात नोंद झाला. २०१६ ते २०१९ दरम्यान हा गुन्हा घडला. त्याबाबत अंश ऑटोव्हिलच्या गॅरेजमालकाने काल फिर्याद दिली आहे. त्यांच्या गॅरेजमध्ये गायकवाडांच्या मोटारी दुरुस्तीसाठी येत होत्या. या ओळखीतून त्यांनी या बापलेक  सावकारांकडून दहा लाख रुपये व्याजाने घेतले होते. त्यापोटी त्यांनी २२ लाख रुपये वसूल केले. तरीही मुद्दल व व्याज बाकी असल्याचे सांगत त्यासाठी तगादा लावला होता. 

पैसे न दिल्याने आरोपींनी फिर्यादीचे अपहरण करून त्याला प्रथम औंधच्या त्यांच्या बंगल्यावर व नंतर सूसच्या फार्महाऊसवर नेऊन कोंडून ठेवले. हवेत गोळीबार करीत पैसे देण्याची मागणी करीत त्यांना मारहाण केली. नंतर फिर्यादीच्या पाच गुंठे जागेचे मूळ खरेदीखत त्यांनी जबरदस्तीने ताब्यात घेतले होते. तर, सांगवी पोलिस ठाण्यात गायकवाड बापलेक व त्यांचा चालक आणि वकिलाविरुद्ध बेकायदेशीर सावकारी  व गोळीबार करून दरोडा टाकल्याचा गुन्हा दाखल झालेला आहे. 

हा प्रकारही २०१९ ते २०२१ दरम्यान घडलेला आहे. त्यातील फिर्यादी हे ही गॅरेजमालकच आहेत. त्यांना थकलेल्या व्याजाच्या हफ्त्यापोटी आरोपींनी आपल्या फार्महाऊसवरील विहीरीवर उलटे टांगले. नंतर विहीरीतील मगरींना तुकडे करून खाऊ घालण्याची धमकी दिली. तत्पूर्वी तक्रारदाराची पाचशे रुपयांच्या स्टॅंम्प पेपरवर सही घेत दोन टेम्पो, एक ट्रकमधून त्यांच्या गॅरेजमधील तीन मोटारी व इतर सामान आऱोपींनी धमकावून नेले होते, असे फिर्यादीत म्हटले आहे. 

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi news on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS.
सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुक,ट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट आणि टेलिग्रामवर आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Sarkarnama
www.sarkarnama.in