सत्यशील शेरकर यांच्यावर अखेर गुन्हा दाखल : अक्षय बोऱ्हाडे मारहाण प्रकरण

या प्रकरणाचे पडसाद सोशल मिडियात मोठ्या प्रमाणात उमटले...
सत्यशील शेरकर यांच्यावर अखेर गुन्हा दाखल : अक्षय बोऱ्हाडे मारहाण प्रकरण
sherkar-borhade

ओझर (पुणे) : शिरोली बुद्रुक ( ता. जुन्नर ) येथे अनधिकृतपणे मनोरुग्णांची संस्था चालवत असलेल्या अक्षय मोहन बोऱ्हाडे या तरुणाला विघ्नहर सहकारी साखर कारखान्यचे अध्यक्ष सत्यशील शेरकर यांनी घरी बोलावून मारहाण केल्याचा आरोप संस्थाचालक अक्षय बोऱ्हाडे याने फेसबुक लाईव्हच्या माध्यमातून केला आहे. हा प्रकार काल (27 मे) घडला होता. त्यावर आज 28 मे रोजी गुन्हा दाखल झाला आहे.

बोऱ्हाडे यांचा आरोप

गेले तीन वर्षा पासून मी व माझे कुटुंब या संस्थेच्या माध्यमातून समाजातील निराधार तसेच मनोरूग्णांची  सेवा करत आहे, त्यांना आधार देण्याचे काम करत आहे. परंतू माझे चांगले काम गावातील काही व्यक्तींना सहन न झाल्यामुळे मला मारहाण करण्यात आली असल्याचे अक्षय बोहाडे याने फेसबुक लाईव्हच्या माध्यमातून म्हटले आहे. आपण पोलिसांकडे तक्रार देणार नसल्याचे त्यांनी आधी म्हटले होते. मात्र आज त्यांनी फिर्याद दाखल केली. बोऱ्हाडे यांना मारहाणीच्या प्रकाराचे बरेच पडसाद उमटले. खासदास उदयनराजे यांनीही या प्रकरणात लक्ष घालून अशी मारहाण खपवून घेणार नसल्याचा इशारा दिला. 

या घटनेबाबत बोलताना शेरकर म्हणाले या  संस्थेत राहणाऱ्या मनोरुणग्णांची कोणत्याही प्रकारची वैद्यकीय तपासणी होत नसून त्यामध्ये नव्याने काही मनोरूग्ण दाखल होत आहेत दोन दिवसांपूर्वी त्याने मंचर येथून एक आजारी मनोरुग्ण आणला असल्याचे समजले. सध्या कोरोना विषाणूचा वाढता प्रादुर्भाव लक्षात घेता या संस्थेत कोरोनाचा प्रादुर्भाव झाल्यास गावाचे आरोग्य धोक्यात येईल. असे होऊ नये याबाबत सूचित करण्यासाठी  काही ग्रामस्थांनी बोऱ्हाडे यास शेरकर यांच्या घरी बोलावले.परंतू अक्षय बोऱ्हाडे याने ग्रामस्थांचे काही एकून न घेता अरेरावीची उत्तरे देत तेथून निघून गेला व फेसबुकच्या माध्यमातून मी त्यास मारहाण केली असल्याचे खोटे आरोप बोऱ्हाडे याने केले असल्याने शेरकर यांनी पत्रकार परिषदेच्या माध्यमातून सांगितले.

याबाबत उमटलेल्या प्रतिक्रिया पुढीलप्रमाणे 

अक्षय, तू घाबरू नकोस! तुझ्यासारख्या प्रामाणिक शिवभक्तांच्या पाठीशी मी ठामपणे उभा आहे. छत्रपतींचा वंशज म्हणून माझं ते कर्तव्यच आहे. आत्ताच मी अक्षयशी बोललो. त्याला धीर दिला. आणि पुढेही सर्व ते सहकार्य करण्याचा शब्द दिला. घरातील गरिबीची तमा न बाळगता समाजाची सेवा झोकून देऊन करणाऱ्या अक्षय बोऱ्हाडे या मुलावर अत्याचार झाल्याची बातमी मनाला वेदना देऊन गेली. छत्रपती शिवाजी महाराज,, संभाजी महाराजांना आदर्श मानून त्याने कार्य सुरू ठेवले आहे. या मुलाच्या कार्याची दखल घेत, पुरंदर किल्ल्यावर शंभु जयंती ला माझ्या हस्ते सत्कारही करण्यात आला होता.

अश्या प्रामाणिक शिवभक्ताला एका सत्तांध व्यक्तीकडून मारहाण होते, त्यांनतर त्याला बंदुकीचा धाक दाखवून जीवे मारण्याची धमकी मिळते. हे अत्यंत चुकीचं आहे. पोलीस प्रशासनाने या घटने कडे गांभीर्याने लक्ष देणे गरजेचे आहे. संपूर्ण घटनेचा छडा लावून आरोपी ला तात्काळ शिक्षा झाली पाहिजे, कुणा पक्षाचा, कुणा जातीचा, कारखानदाराचा किंवा मोठ्या घरचा म्हणून का मुलाहिजा ठेवावा? अक्षय बोऱ्हाडे च्या सुरक्षेची जबाबदारी पोलिसांनी घ्यावी अशी सूचनाही करतो.

खासदार छत्रपती संभाजीराजे

अक्षय बोऱ्हाडे सारखा शिवप्रेमी हा आमचा अभिमान आहे !त्यांनी असंख्य लोकांचे अश्रू पुसले आणि आज त्याचाच डोळ्यात अश्रू येण हे मनाला वेदना देणार आहे!! पोलिसांनी कारवाई करावीच. तो एकटा नाही हे लक्षात घ्या. आमच लक्ष आहे.. नाहीतर हर हर महादेव होणारच!!!

आमदार नितेश राणे

Related Stories

No stories found.
Sarkarnama
www.sarkarnama.in