राजू शेट्टींची प्रकृती बिघडली; पुण्यातील खासगी रुग्णालयात दाखल - Ex MP and farmer leader Raju Shetti admitted in private hospital in pune | Politics Marathi News - Sarkarnama

ब्रेकिंग न्यूज

दहावी व बारावीच्या परीक्षा पुढे ढकलल्या : शिक्षणमंत्री वर्षा गायकवाड यांची घोषणा. याशिवाय सीबीएसई, आयसीएसई आदी बोर्डांनीही त्या पुढे ढकलाव्यात अशी राज्य सरकारची सूचना
Breaking - दहावी-बारावीच्या परिक्षा पुढे ढकलल्या

राजू शेट्टींची प्रकृती बिघडली; पुण्यातील खासगी रुग्णालयात दाखल

वृत्तसंस्था
बुधवार, 28 ऑक्टोबर 2020

स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे अध्यक्ष व माजी खासदार राजू शेट्टी यांची प्रकृती बिघडली असून, त्यांना पुण्यातील खासगी रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे. 

पुणे : स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे अध्यक्ष व माजी खासदार राजू शेट्टी यांना आज पुण्यातील खासगी रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे. शेट्टी यांची प्रकृती बिघडल्याने त्यांना रुग्णालयात दाखल करण्यात आले असून, त्यांच्यावर उपचार सुरू असून, त्यांची प्रकृती स्थिर आहे, अशी माहिती त्यांच्या निकटवर्तीयांनी दिली. 

शेट्टी हे 53 वर्षांचे आहेत. मागील महिन्यात ते कोरोना पॉझिटिव्ह आढळले होते. त्यातून ते बरे झाले आहेत. शेट्टी हे नियमित तपासणीसाठी दीनानाथ मंगेशकर रुग्णालयात गेले होते. त्यावेळी त्यांना अस्वस्थ वाटू लागले. त्यामुळे त्यांना रुग्णालयात दाखल करुन घेण्यात आले आहे. त्यांच्या पायाला सूज आल्याने त्यांना आता रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे. त्यांच्यावर डॉक्टर उपचार करीत आहेत, अशी माहिती त्यांच्या निकटवर्तीयांनी दिली. 

राजू शेट्टी यांच्यासह पत्नी आणि मुलगा यांचा कोरोनाचा अहवाल  8 सप्टेंबरला पॉझिटिव्ह आला होता. शेट्टी यांच्यासह तिघांवर डॉक्‍टरांच्या मार्गदर्शनाखाली घरीच उपचार करण्यात येत होते. मात्र, दक्षतेचा उपाय म्हणून  9 सप्टेंबरला राजू शेट्टी यांना पुण्याला हलिवण्यात आले होते. पुण्यातील दीनानाथ मंगेशकर रुग्णालयात त्यांना दाखल करण्यात आले होते. त्यानंतर 11 सप्टेंबरला त्यांना रुग्णालयात घरी सोडण्यात आले होते. तेव्हापासून त्यांची दीनानाथ मंगेशकर रुग्णालयात नियमित तपासणी करण्यात येत आहे. 

कोरोनाची लागण झाल्यावर शेट्टी यांनी फेसबुकवर पोस्ट करत याची माहिती दिली होती. त्यात त्यांनी म्हटले होते, की 1 सप्टेंबरला माझी कोरोना टेस्ट निगेटिव्ह आली होती. मात्र, ती आता पॉझिटिव्ह झाली आहे. डॉक्‍टरांच्या सल्ल्यानुसार सध्या मी घरीच उपचार घेत आहे. कारण, तातडीने उपचार सुरू केल्याने मला रुग्णालयात जाण्याची आवश्‍यकता भासली नाही. डॉक्‍टरांशी चर्चा करून ठरविले की आपण वेळीच उपचाराला सुरुवात केल्याने रुग्णालयात ऍडमिट होण्याची गरज नाही. एका गरजू रुग्णाचा बेड अडविण्याची आवश्‍यकता नाही. घरीच उपचार होणे शक्‍य आहे, त्यामुळे हे डॉक्‍टर मंडळी सकाळी आणि संध्याकाळी माझी घरी येऊन माझी तपासणी करत आहेत. 

Edited by Sanjay Jadhav

अधिक राजकीय बातम्यांसाठी सरकारनामा अॅप डाऊनलोड करा
Play Store    App Store

संबंधित लेख