महेश लांडगे व लक्ष्मण जगताप समर्थकांत वाद उफाळला : स्थायी समितीत `राडा`
pcmc-building-final

महेश लांडगे व लक्ष्मण जगताप समर्थकांत वाद उफाळला : स्थायी समितीत `राडा`

या वादात आता भाजपच्या बड्या नेत्यांनी लक्ष देण्याची गरज

पिंपरी : पिंपरी चिंचवड महापालिकेच्या स्थायी समितीत आज राडा झाला. लँडलाईन फोन आणि मोबाईलही यावेळी फुटला. फाईल भिरकावण्यात आल्या. पालिका सुरक्षारक्षकांनी धक्काबुक्की केल्याचा आरोप सदस्यांनी केला. मात्र, सदस्यांनीच आपल्याला धक्काबुक्की केल्याचे एका सुरक्षारक्षकाने सांगितले.

शहराचे एक कारभारी व भाजपचे भोसरीचे आमदार महेशदादा लांडगे समर्थक संतोष लोंढे स्थायीचे अध्यक्ष आहेत. तर,शहराचे दुसरे कारभारी भाजपचे चिंंचवडचे आमदार लक्ष्मणभाऊ जगताप यांच्या समर्थकांत धुसफूस सुरू आहे. जगताप समर्थक सदस्यांनी आजच राडा घातला. त्याला आज निमित्त ठरले ते पालिका आयुक्त श्रावण हर्डीकर यांनी बोगस एफडीआरप्रकरणी खुलासा न केल्याचे. शहरातील अनेक विकासकामातील ठेकेदारांनी बोगस एफडीआर दिल्या आहेत. त्याबाबत तातडीने खुलासा करा आणि मगच सभा सुरु करा, अशी मागणी भाऊ समर्थकांनी आयुक्तांकडे केली. मात्र, त्यासाठी आठवड्याचा वेळ आयुक्तांनी मागितला.त्यावर अगोदरच चार बैठकांना गैरहजर असलेल्या आयुक्तांवर हे सदस्य चिडले आणि राडा झाला.

दादा समर्थक स्थायीचे अध्यक्ष असल्याने आपल्या भागातील कामे मंजूर होत नसल्याचे भाऊ समर्थकांचे म्हणणे आहे. त्यावरूनच पण वरकरणी बैठक तहकूब होत असल्याचे आणि आयुक्त व इतर अधिकारी उपस्थित राहत नसल्याचे कारण देत भाऊ समर्थक सदस्यांनी गेल्या महिन्यात ५ तारखेच्या बैठकीतही गोंधळ झाला होता. तेव्हाच पुन्हा उद्रेक होईल, असा इशारा भाऊ समर्थकांनी दिला होता आणि आज तसेच घडले.

Related Stories

No stories found.
Sarkarnama
www.sarkarnama.in