मंगलदास बांदल यांचा जामीन अर्ज फेटाळला...

बांदल यांचा कोठडीतील मुक्काम वाढला..
मंगलदास बांदल यांचा जामीन अर्ज फेटाळला...
mangaldas bandal

पुणे :  गहाण ठेवलेल्या जमिनीची परस्पर विक्री केल्याप्रकरणात पुणे जिल्हा परिषदेचे (Pune ZP) माजी बांधकाम सभापती मंगलदास बांदल (Mangaldas Bandal) यांचा जामीन अर्ज न्यायालयाने फेटाळला. सत्र न्यायाधीश एस. बी. हेडाऊ यांनी हा आदेश दिला.

बांदल यांनी त्यांच्या दोन साथीदारांच्या मदतीने बँकेतील अधिकाऱ्यांना हाताशी धरून कर्ज मजूर करून घेतले. त्यांनतर हे पैसे स्वत:चे फायद्याकरीता वापरले. हप्ते न भरता त्या जमिनीची विक्री केली आहे. त्यामुळे त्यांचा जामीन फेटाळण्याचा युक्तीवाद सरकारी वकील राजेश कावेडीया यांनी केला.

जमीन विकत घेण्यासाठी बांदल यांनी शिवाजीराव भोसले सहकारी बॅंकेच्या वडगाव शेरी शाखेतून दोन कोटी 10 लाख रुपयांचे  कर्ज घेतले होते. या प्रकरणात बांदलसह रुपेंदरकौर हरचरणपाल नंदा, हरचरणपाल मोहनसिंग नंदा (दोघेही, रा. कोंढवा), विजय दिनकर धुमाळ (पिंपळे धुमाळ, ता. शिरूर) आणि गोरख महादेव दोरगे यांच्यावर गुन्हा दाखल झाला आहे. 19 जनेवारी 2015 मध्ये घडलेल्या घटनेबाबत बॅंकेच्या वसुली अधिकाऱ्यांनी शिक्रापूर पोलिसात फिर्याद दिली आहे.

रुपेंदर कौर आणि हरचरणपाल या दोघांच्या नावावर हे कर्ज काढण्यात आले होते. ही जमीन विजय धुमाळ याला विक्री करण्यात आली होती. या प्रकरणात पोलिसांनी मंगलदास बांदल यांना अटक केली आहे. त्यावेळी दोन्ही नंदा यांनी हा व्यवहार बांदल यांनी केला असल्याचे सांगितले आहे. ही  जमीन बांदल याने धमकावून मालक सुरेश शिंदे यांना विकण्यास लावली. व्यवहार एक कोटी 40 लाख रुपयांचा ठरला असताना, त्यांना केवळ 70 लाख रुपये देण्यात आले आहेत.

बांदल यांच्यावर शिक्रापूर पोलिस ठाण्यात दाखल असलेल्या चार गुन्ह्याचा तपास सुरू आहेत. तर पूर्वी सात गुन्हे दाखल होते. त्याची शिक्रापूर परिसरात दहशत आहे. जामीन दिल्यास तपासावर परिणाम होण्याची शक्‍यता आहे. त्यामुळे जामीन फेटाळण्याची मागणी ऍड. राजेश कावेडीया यांनी दिली. शिक्रापूर पोलिस ठाण्याचे पोलिस उपनिरीक्षक ए. ए. खटावकर या गुन्ह्याचा तपास करत आहे.

Related Stories

No stories found.
Sarkarnama
www.sarkarnama.in