पुणेकरांच्या पाठीशी केंद्र सरकार ठामपणे उभे : प्रकाश जावडेकर - Central Government stands firmly behind Punekar says Prakash Javadekar | Politics Marathi News - Sarkarnama

ब्रेकिंग न्यूज

कोकणासाठी मोठी बातमी : चिपी विमानतळाचा मार्ग मोकळा, DGCE चा परवाना. 9 ऑक्टोबरला उद्घाटन आणि त्याच दिवसापासून प्रवाशी वाहतूक
पंजाबमधील राजकारण पेटले : मुख्यमंत्री अमरिंदरसिंग यांचा राजीनामा; नवा मुख्यमंत्री कोण, याची उत्सुकता

पुणेकरांच्या पाठीशी केंद्र सरकार ठामपणे उभे : प्रकाश जावडेकर

सरकारनामा ब्यूरो
शनिवार, 5 सप्टेंबर 2020

भाजपची सत्ता पुण्यात असताना परिस्थिती हाताबाहेर जात असल्याचे चित्र

पुणे : पुण्यातील कोरोनाची हाताबाहेर जाऊ पाहणारी स्थिती हाताळण्यासाठी आता केंद्र सरकार कार्यप्रवण झाले असून केंद्रीय मंत्री प्रकाश जावडेकर यांनी केंद्रातील सरकार पुणेकरांच्या पाठीशी असल्याचा दिलासा दिला.

पुण्यातील एकूण कोरोना रुग्णांची संख्या एक लाखापेक्षा जास्त झाली आहे. त्यात सरकारी कोविड केंद्रातील कारभार पुढे आला. त्यातून जनतेत रोष निर्माण झाला. त्यानंतर जावडेकर यांनी आज पुण्यात लोकप्रतिनिधी आणि अधिकारी यांची बैठक घेतली. राष्ट्रवादी काॅंग्रेसचे अध्यक्ष शरद पवार, उपमुख्यमंत्री अजित पवार, आरोग्यमंत्री राजेश टोपे आदी या बैठकीला उपस्थित होते. 

यानंतर पत्रकारांशी बोलताना जावडेकर यांनी सांगितले की पुण्यातील संक्रमण कमी करण्यासाठी अॅंटिजेन टेस्ट वाढविण्यात येणार आहेत. आणखी एक सेरो सर्व्हे केला जाणार, हा मोठ्या स्वरूपात होणार. रस्त्यावर थुंकणाऱ्यांवर कडक कारवाई केली जाणार. जनजागृती आणखी मोठ्या स्वरूपात करणार, सर्व जण मिळून काम करतोय. सर्व यंत्रणांचा आणखी समन्वय आणणार आहोत. केंद्र सरकार ठामपणे पुण्याच्या पाठीशी, अशा शब्दांत त्यांनी दिलासा दिला.

दुसरीकडे विरोधकांनी या विषयावरून लक्ष्य करण्यास सुरवात केली आहे. पुणे शहरात भाजपचे सहा आमदार, शंभर नगरसेवक ,दोन खासदार,एक मंत्री , राज्याचे प्रदेशअध्यक्ष असताना कोरोना कसा काय आटोक्यात येत नाही .इतकी मोठी ताकद आणि पुणे महानगरपालिकेवर तुमची सत्ता असताना तुम्ही करता काय  ? आरोग्य व्यवस्थेच्या पूर्ण चिंधड्या उडाल्या आहेत .तुम्ही नागरिकांना वाऱ्यावर सोडले की काय असा प्रश्न काँग्रेसचे नेते अनंत गाडगीळ यांनी भाजपला विचारला आहे .
 

अधिक राजकीय बातम्यांसाठी सरकारनामा अॅप डाऊनलोड करा
Play Store    App Store

संबंधित लेख