आमच्या नेत्यांचे ट्रोलिंग होत असताना भाजपचे नेते तेव्हा हसत होते : तांबे

भाजपने आपल्या नेत्यांचे ट्रोलिंग सहन न करण्याचा इरादा व्यक्त केला आहे. त्यावर काॅंग्रेसचे नेते सत्यजीत तांबे काय म्हणाले?
आमच्या नेत्यांचे ट्रोलिंग होत असताना भाजपचे नेते तेव्हा हसत होते : तांबे
Satyajeet_20Tambe

पुणे : कोणत्याही नेत्यावर खालच्या भाषेत टीका करणे चूकच आहे. पण मर्यादा सोडून समाज माध्यमांवर खालच्या भाषेत ट्रोलिंग करणे याची सुरवात भाजपने केली आहे. याच्या विरोधात आम्ही वेळोवेळी न्यायालयात दादा मागितली पण आम्हला न्याय मिळाला नाही. आता भाजपचे चंद्रकांत पाटील हे ट्रोल होत असल्याने त्यांना वाईट वाटत आहे. पण तेव्हा चंद्रकांत पाटील का गप्प होते, असा सवाल युवक काॅंग्रेसचे प्रदेशाध्यक्ष सत्यजीत तांबे यांनी विचारला.  

चंद्रकांत पाटील यांनी काल भाजप प्रदेश कार्यकारिणीच्या बैठकीत बोलताना  आमच्यावर खालच्या भाषेत टीका केली तर आम्ही आक्रमक भूमिका घेऊ असे विरोधकांना सुनावले होते .त्याला उत्तर देताना काँग्रेस युवक प्रदेशाध्यक्ष  सत्यजीत तांबे यांनी आपल्या भावना व्यक्त केल्या.

याबाबत बोलताना तांबे म्हणाले की ही सुरवात तर भाजपने केली आणि आता तो भस्मासुर त्यांच्याव उलटला आहे. तत्कालीन पंतप्रधान मनमोहनसिंग, सोनिया गांधी, राहुल गांधी यांच्या विरोधात खालच्या पातळीवरील भाषा भाजपने आधी वापरली. 2013 पासून भाजप समर्थकांचे हे कृत्य सुरू आहे. त्याला आता जशास तसे उत्तर मिळू लागल्याने भाजप नेत्यांचे वस्त्रहरण होत आहे. मात्र त्याबद्दल भाजप नेत्यांनी खेद व्यक्त करायचे काही कारण नाही. त्यांनीच असे प्रकार सुरू करून विरोधकांना त्रास देण्याचे धोरण ठेवले होते. याचा आनंद तेव्हा त्यांना होत होता. आता हेच अस्त्र त्यांच्यावर उलटल्याने ते तक्रार करू लागले आहेत.

लोकशाहीत योग्य भाषेत आपले मुद्दे मांडणे, हे अपेक्षितच आहे. मात्र त्यासाठीची भाषा ही सुसंस्कृत असावी. त्याचे विस्मरण भाजपला झाले होते. या निमित्ताने त्यांना त्याची आठवण होईल. आता तरी भाजपच्या समर्थकांनी आपले धोरण बदलायला हवे. इतर पक्षांतील नेत्यांबद्दल त्यांनी प्रतिक्रिया देताना वयाचा, पदाचा आदर ठेवण्याची गरज आहे. त्यांनी सध्याप्रमाणे ट्रोल करण्याचे धोरण कायम ठेवले तर त्याच भाषेत त्यांना प्रत्युत्तर मिळेल, याची त्यांनी जाणीव ठेवावी, असा इशारा तांबे यांनी दिला. 

Related Stories

No stories found.
Sarkarnama
www.sarkarnama.in