बड्या नेत्यांत कोल्हे व लांडगे हे दोघेच पदवीधरसाठी पिंपरी-चिंचवडमधून मतदार

अनेक नेते प्रचारात असूनही पदवीपर्यंत शिक्षण नसल्याने मतदार नाहीत...
बड्या नेत्यांत कोल्हे व लांडगे हे दोघेच पदवीधरसाठी पिंपरी-चिंचवडमधून मतदार
mahesh landge-amol kolheff

पिंपरी : विधानपरिषदेच्या पुणे पदवीधर मतदारसंघाच्या एक डिसेंबर रोजी होणाऱ्या निवडणुकीत पिंपरी-चिंचवड शहराच्या दोन कारभारी आमदारांपैकी  एकच मतदार आहेत. तर, शहरातील तिसरे आमदारही या निवडणुकीत मतदान करू शकणार नाहीत. त्याजोडीने शहराच्या दोनपैकी एकाच खासदारांचे नाव या निवडणुकीच्या मतदारयादीत आहे. तर,राष्ट्रवादीच्या शहराध्यक्षांसह शहरातील अनेक नगरसेवक,नगरसेविकांनाही आपला मतदानाचा हक्क ते पदवीधर नसल्याने या निवडणुकीत बजावता येणार आहे.

मतदार नसल्याने मतदान करता येणार नसले,तरी ते इतरांनी करावे, म्हणून हे लोकप्रतिनिधी प्रयत्नशील असल्याचे दिसून आले आहे. शहराच्या दोन खासदारांपैकी राष्ट्रवादीचे खासदार डॉ. अमोल कोल्हे (शिरूर) आणि तीन आमदारांपैकी फक्त भाजपचे आमदार आणि शहराध्यक्ष महेशदादा लांडगे (भोसरी)यांचीच नावे पदवीधरच्या मतदारयादीत आहेत. तर,भाजपचे चिंचवडचे आमदार लक्ष्मणभाऊ जगताप व पिंपरीचे राष्ट्रवादीचे आमदार अण्णा बनसोडे यांना या निवडणुकीत मतदान करता येणार नाही. त्यांच्याजोडीने शहरातील अनेक नगरसेवकांचीही नावेही या मतदारयादीत नसल्याने ते मतदानापासून वंचित राहणार आहेत.
 
मात्र,पदवीधरचे मतदार नसले तरी जगताप यांनी  या निवडणुकीच्या मतदारयादीत काही हजार नव्या मतदार नोंदवून त्यांची भर मतदारयादीत यावेळी घातली आहे. दुसरे कारभारी आमदार महेशदादा यांनीही अशीच कामगिरी केली आहे. राष्ट्रवादीचे शहराध्यक्ष संजोग वाघेरे पाटील हे पदवीधर नसल्याने त्यांना या निवडणुकीत मतदान करता येणार नाही. मात्र, शहरातील इतर पदवीधरांनी ते करावे व आपल्याच उमेदवाराला ते व्हावे,यासाठी ते प्रयत्न करीत असल्याचे दिसून आले. मनसेचे शहराध्यक्ष सचिन चिखले यांचेही नाव मतदारयादीत नसले, तरी ते पुणे मतदारसंघातील आपल्या पक्षाच्या उमेदवार रुपाली ठोंबरे-पाटील यांच्यासाठी सक्रिय झाले आहेत.  

Related Stories

No stories found.
Sarkarnama
www.sarkarnama.in