भाजपचे 19 नगरसेवक राष्ट्रवादीच्या वाटेवर?... महापौर म्हणतात..

भारतीय जनता पक्षाचे सर्व नगरसेवक एकत्र आहेत. कुणी आतला-बाहेरचा असा भेद आमच्यात नाही. पदांच्या वाटपातही सर्वांना समान न्याय हे धोरण कायम आहे.
All the corporators of Bharatiya Janata Party are together says Mayor Muralidhar Mohol
All the corporators of Bharatiya Janata Party are together says Mayor Muralidhar Mohol

पुणे : भारतीय जनता पक्षाचे सर्व नगरसेवक एकत्र आहेत. कुणी आतला-बाहेरचा असा भेद आमच्यात नाही. पदांच्या वाटपातही सर्वांना समान न्याय हे धोरण कायम आहे. त्यामुळे नगरसेवकांच्या फुटीची चर्चा हा निव्वळ खोडसाळपणा आहे, असे स्पष्टीकरण महापौर मुरलीधर मोहोळ यांनी बुधवारी केले.

'सरकारनामा'शी बोलताना महापौर मोहोळ म्हणाले, काही लोकांकडून गेल्या काही दिवसांत जाणीवपूर्वक अशा प्रकारची चर्चा करून वातावरण निर्माण करण्याचा प्रयत्न करण्यात येत आहे. मात्र, यात कोणत्याही स्वरूपाचे तथ्य नाही. महापालिका निवडणुकीला अद्याप एक वर्ष बाकी आहे. मात्र, त्याआधीच जाणीवपूर्वक अशाप्रकारचे वातावरण तयार करण्यात येत आहे. असा कितीही प्रयत्न केला तरी आमच्यात फाटाफूट होणार नाही. 

सर्व नगरसेवक एकत्र आहेत. गेल्या चार वर्षात आतला-बाहेरचा असा कोणताही भेद करण्यात आलेला नाही. सर्वांना जबाबदारीचे वाटप करण्यात आले आहे. विरोधकांनी कितीही प्रयत्न केला तरी आमच्यात फाटाफूट होणार नाही, असे मोहोळ यांनी स्पष्ट केले.

चार वर्षापूर्वी झालेल्या निवडणुकीत भारतीय जनता पक्षाला पुणे महापालिकेत ऐतिहासिक यश मिळाले. तब्बल 98 नगरसेवक निवडून आले. इतके यश महापालिकेच्या इतिहासात यापूर्वी कुणालाही मिळालेले नव्हते. गेल्या निवडणुकीच्या काळात राज्यात भाजपची सत्ता होती. त्यामुळे महापालिकेत पक्षाला प्रचंड यश मिळाले. या निवडणुकीत काँग्रेस तसेच राष्ट्रवादी कॉंग्रेसमधून सुमारे 40 ते 50 जणांनी भाजपमध्ये येऊन महापालिकेची उमेदवारी मिळविली.

यातील काही नगरसेवकांना सत्तेची पदे मिळाली. तर काहीजण सत्तेपासून दूर राहिले. महापालिका निवडणुकाला एकच वर्ष बाकी आहे. त्यामुळे पालकमंत्री अजित पवार यांच्या नेतृत्वाखाली निवडणुकीची जोरदार तयारी राष्ट्रवादीकडून सुरू आहे. त्या दृष्टीने पक्षाकडून भाजपातील नगरसेवकांचा अंदाज घेण्यात येत आहे. राष्ट्रवादीतून गेल्यावेळी भाजपात गेलेले तसेच इतर इच्छुकांना गळ टाकण्याची व्यूव्हरचना राष्ट्रवादीकडून करण्यात येत आहे. त्याला काही प्रमाणात यश मिळत असून त्यातून आलेल्या काही नावांवर आज माध्यमांत चर्चा सुरू झाल्याने राजकीय वादळ सुरू झाले आहे.

येत्या महापालिका निवडणुकीत पुणे व पिंपरीत काहीही करून सत्ता हस्तगत करण्याची तयारी राष्ट्रवादीकडून करण्यात येत आहे. महाविकास आघाडीच्या रूपाने राष्ट्रवादी सत्तेत असल्याने या प्रयत्नांना बळ मिळत आहे. त्यामुळे जसजशा निवडणुका जवळ येतील त्याप्रमाणे या चर्चा होत राहणार आहेत. मात्र, प्रभाग रचना कशाप्रकारे होतात, त्यावरच कोण कुठल्या पक्षात जातो याचा निर्णय होणार आहे.

Edited By Rajanand More
 

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Sarkarnama News
sarkarnama.esakal.com