अजित पवार यांनी थेट अदर पूनावालांना फोन लावला...पण? - ajit pawar tries to speak adar poonwala for vaccine supply | Politics Marathi News - Sarkarnama

अजित पवार यांनी थेट अदर पूनावालांना फोन लावला...पण?

सागर आव्हाड
शुक्रवार, 7 मे 2021

पूनावला हे पुढील दहा दिवसांत देशात परतण्याची शक्यता... 

पुणे : राज्यात आणि पुण्यातही कोरोना लशींची (Corona Vaccine) कमतरता असल्याने राज्य सरकार चिंतेत आहे. एकट्या पुण्याला रोज एक लाख लशींची गरज आहे. (Pune needs daily one lakh corona vaccine) तेवढा पुवठा नसल्याने त्यामुळे सर्वत्र नागरिकांच्या तक्रारी येत आहेत. याबाबत उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी लस जर पुरेशा प्रमाणात मिळाल्या तर महिना ते दीड महिन्यात हे लसीकरण संपवू शकतो. त्यासाठी मी सिरमचे अदर पूनावाला  (Adar Poonawala) यांच्याशी पण मी बोलण्याचा प्रयत्न केला. मात्र ते परदेशात असल्याने तो होऊ शकला नाही. राज्याला काय दरात ते लस देऊ शकतील, याबाबतही त्यांच्याशी मला चर्चा करायची होती, असे त्यांनी पुण्यात पत्रकारांशी बोलताना स्पष्ट केले. 

ते म्हणाले, ``18 ते 44 या वयोगटातील नागकिरांना लस देताना जास्त अडचणी आहेत. राज्याला या वयोगटासाठी बारा कोटी लशीची गरज आहे. असे असताना राज्याला रोज तीन लाख लस मिळाली आहे. भारत बायोटेक, सीरम या कंपन्यांनी पण त्यांची उत्पादनक्षमता वाढविण्याची गरज आहे. आपण हाफकिनला लस उत्पादनाची परवानगी मिळाली आहे. मात्र तेथील लस मिळायला आणखी वेळ लागेल. लशीचा पुरवठा वाढविण्यासाठी मी पूनावालांशी बोलणार होतो. पण पुढील दहा दिवसांनंतर ते भारतात येतील, त्यावर पुन्हा मी त्यांच्याशी बोलेन.

पुण्यात लाॅकडाऊन आणखी कठोर होणार यावर अजित पवार म्हणाले, ``कोरोना परिस्थिती हाताळण्यावरून मुंबईचे कौतुक होत असताना पुण्यातील परिस्थितीबाबत न्यायालयाने चिंता व्यक्त केली. यावर उपमुख्यमंत्री अजित पवार म्हणाले की कठोर लाॅकडाऊन लावावा, असे पोलिसांचे मत आहे. पण राज्याचे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे हे याबद्दल निर्णय घेतील. पुण्यातील परिस्थितीबाबत न्यायालयाने काही मत व्यक्त करत कठोर लाॅकडाऊनची सूचना राज्य सरकारला केली. त्याबद्दल मला काही म्हणायचे नाही. पण आपण सर्व बाजूंनी प्रयत्न करत आहोत. न्यायालयात सादर झालेल्या आकडेवारीविषयी  पुण्याचे महापौर मुरलीधर मोहोळ यांनी तक्रार केल्याचे मला कळाले. पुणे महापालिकेने स्वतंत्रपणे वकील देऊन त्यांनी आपली बाजू न्यायालयात मांडावी. पंढरपूर येथे विधानसभा पोटवनिडणुकीत राष्ट्रवादीचा पराभव आपण स्वीकारल्याचे त्यांनी स्पष्ट केले.

पूनावाला हे लशींसाठी अनेक नेत्यांचे, मुख्यमंत्र्यांचे फोन येत असल्याने लंडनमध्ये वास्तव्यास गेले आहेत. सारी जबाबदारी आपल्याच खांद्यावर असल्याची जाणीव होत असल्याचे त्यांनी विधान केले होते.

हे पण वाचा : माझ्यासह जिल्हा प्रशासनाची संवेदनशीलता संपली असे मला वाटते.....

 

अधिक राजकीय बातम्यांसाठी सरकारनामा अॅप डाऊनलोड करा
Play Store    App Store

संबंधित लेख