ajit pawar
ajit pawar

अजित पवारांनी सांगितली त्यांच्या मनातील पुण्यातील पालिका वाॅर्डरचना!

महाआघाडी सरकारची पालिका निवडणुकीसाठी तयारी

पुणे : पुणे महापालिकेच्या आगामी निवडणुकीतील (PMC election 2022) वाॅर्डरचना कशी असणार याविषयीची उत्सुकता राजकीय कार्यकर्त्यांत आहे. याबाबत उपमुख्यमंत्री अजित पवार यांना आज विचारले असता त्यांनी अधिकृत घोषणा केली नाही. पण त्यांच्या मनातील उत्तर आज पुण्यात दिले. (Ajit Pawar about PMC wards)

ते म्हणाले की भाजप सरकार सत्तेवर असताना त्यांच्या मनाप्रमाणे त्यांनी प्रभागरचना केली. मुंबईत एकसदस्यीय तर उर्वरित महाराष्ट्रात चार सदस्यांचा एक प्रभाग होता. महाविकास आघाडी सरकारचा याबाबत अधिकृत निर्णय झाला नाही. पण मला वैयक्तिकदृष्ट्या दोन सदस्यांचा एक प्रभाग असावा, असे वाटते. इतर घटक पक्षांशी बोलून यावर निर्णय घेऊ, असे त्यांनी स्पष्ट केले.

अजित पवार यांच्या मनात असेल तसेच घडण्याची शक्यता असल्याने पुणे, पिंपरी-चिंचवड आणि इतर शहरांत दोन सदस्यांचा प्रभाग राहू शकतो. पुण्यात 2002 च्या निवडणुकीत तीन सदस्यांचा प्रभाग होता.  2007 मध्ये एक सदस्यीय, 2012 मध्ये दोन सदस्यीय आणि 2017 मध्ये चार सदस्यांचा प्रभाग झाला. आता पुन्हा 2022 मध्ये दोन सदस्यीय पद्धत येण्याची चिन्हे अजित पवार यांच्या सांगण्यावरून दिसत आहेत. 

 भाजपविरोधात मराठा आरक्षणावरून निशाणा साधताना या वेळी पवार म्हणाले की ''हेच मराठा आरक्षण सर्वोच्च न्यायालयात टिकले असते, तर काय म्हटले असते. आम्हीच कायदा केला होता,'' अशा शब्दात पवारांनी भाजपवर निशाणा साधला आहे. ५४ आमदारांच्या पाठिंब्याचे पत्र बाहेर कसे आले, असे पाटील म्हणाले होते. यावर बोलताना अजित पवार म्हणाले, ''जी गोष्ट झाली आहे, तिला चौदा महिने झाले. मागच्या गोष्टी उकरून काढत आहेत. ज्यांना काम नाही ते नको त्या गोष्टी बोलतात. आता कोरोनाकडे लक्ष देणे महत्वाचे आहे. कोणत्याही आरक्षणाला धक्का न लावता आरक्षण मिळाले पाहिजे यासाठी आम्ही प्रयत्न करत असल्याचेही पवार म्हणाले.  

नरेंद्र पाटील यांनी मराठा आरक्षणावरून राज्य सरकारवर टीका केली होती. त्यालाही पवार यांनी उत्तर दिले. ''काहीजण भावनेच्या आहारी जाऊन काहीही बोलतात. कायदा, संविधान काही बघत नाही. ही लोक काही काळ आमच्या बरोबर होती. त्यांचा आवाका किती आहे. हे आम्हाला माहिती आहे. त्यामुळे फार महत्त्व देत नाही, ''असे पवार म्हणाले. संभाजीराजे यांनी दिलेल्या इशाऱ्यावर अजित पवार म्हणाले की ''मी त्यांच्याशी बोललो होतो. पण त्यांनी सांगितले की, ६ तारखेचा कार्यक्रम होऊ द्या. तसेच त्यांनी मुख्यमंत्र्यांकडे त्यांच्या मागण्या मांडल्या आहेत. आता महाविकास आघाडी सरकार त्यावर लवकरच निर्णय घेईल, असे त्यांनी सांगितले. 
 

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Sarkarnama News
sarkarnama.esakal.com