शिवसेनेतून बाहेर पडण्यासाठी आढळराव गोळिबाराचे निमित्त शोधत आहेत....

आढळरावांच्या आरोपांनी मोहिते यांचे उत्तर..
dilip mohite-adhalrao
dilip mohite-adhalrao

राजगुरूनगर :  माजी खासदार शिवाजीराव आढळराव पाटील हे अतिशय खोटारडे असून 'सौ चूहे खाके, बिल्ली चली हज को' अशी त्यांची भूमिका असते. मी जर खेड सभापतींच्या मारहाण नाट्यामागे असेल तर आढळरावांनी पत्रकारांना सांगण्यापेक्षा मुख्यमंत्र्यांना सांगावे आणि माझी शक्य तेवढी उच्च पातळीवर चौकशी करावी. मात्र त्या चौकशीत काही निष्पन्न झाले नाही तर, आढळरावांनी तोंडाला काळे फासून खेड तालुक्यात यावे, असे प्रत्युत्तर आमदार दिलीप मोहिते-पाटील यांनी,  त्यांच्यावर आढळराव पाटील यांनी पत्रकार परिषदेत केलेल्या आरोपांवर दिले. (MLA Dilip Mohite alleges Adhalrao over political drama in khed taluka)

 खेडच्या या हल्ल्यामागे व नाट्यामागे आढळराव पाटील असून त्यांच्यावर गुन्हा दाखल करण्यात यावा, याचा मी पुनरुच्चार करतो. आढळरावांनी शिरूर तालुक्यातल्या आमदारांना घरात घुसून मारायची धमकी दिली होती. काही ना काही वाद निर्माण करून, शिवसेनेतून बाहेर पडून भाजपमध्ये जाण्यासाठी ते वातावरण निर्मिती करत आहेत. लोकसभेची निवडणूक हरल्यापासून ते नैराश्यग्रस्त झालेले आहेत. राज्यात तीन पक्षांची आघाडी झाल्याने, आपल्याला शिरूर मधून पुन्हा तिकीट मिळणार नाही, हे त्यांना ठाऊक असल्याने, ते शिवसेनेने बाहेर जायचे निमित्त शोधत आहेत, असे मोहिते म्हणाले. 

डोणजे येथे झालेल्या हल्ल्याचे सर्व चित्रीकरण सीसीटीव्हीमध्ये केद झालेले आहे. तरीही आढळराव तसं घडलं नाही, असे धादांत खोटे बोलत आहेत. त्यामध्ये पोलीस तपास करत असून, सत्य काय आहे ते लवकरच समाजापुढे येईल. भगवान पोखरकर यांच्या राजीनामा नाट्यामागे आम्ही नसून त्यांच्याच पक्षातले नाराज सदस्य आहेत.  माझ्या पक्षाच्या सदस्यांच्या धमक्या येऊ लागल्याने, संरक्षणासाठी मी त्यांना माझ्या भावाच्या रिसॉर्टवर आणून ठेवले होते, एवढाच यातील माझा रोल आहे. दरम्यान शिवसेनेचे नेते अनिल देसाई यांचे माझ्याबरोबर बोलणे झाले होते आणि हा वाद बसून आपण सामंजस्याने मिटवू, असे ते मला म्हणाले होते. परंतु त्यांच्याबरोबर बैठक होण्याअगोदरच आढळरावांनी हा हल्ला घडवून आणला. कोयते,  कुऱ्हाडी घेऊन त्या ठिकाणी लोक आले होते. त्यांनी गोळीबारही केला, असा आरोप मोहिते यांनी केला.

 माझ्यावर असलेले विनयभंगाचे गुन्हे राजकीय हेतूने केलेले खोटे गुन्हे होते. त्यामुळे ते पोलीस चौकशीत टिकले नाहीत. त्यामागेही आढळरावच होते. पोखरकरांवरचे विनयभंगाचे गुन्हे मात्र सत्य असून त्यांनी आदिवासी सरपंच महिलेचा विनयभंग केल्याबद्दल त्यांच्यावर कारवाईही झालेली आहे. तसेच त्यांनी अन्य एका महिलेवरही अत्याचार केलेला आहे. त्यांच्या कार्यालयातील एका अल्पवयीन मुलीशी त्यांचा विवाह झाल्याचीही मला माहिती मिळाली आहे. असा गुंडागर्दी करणारा सभापती तालुक्याला चालेल का? असा सवाल करून ते म्हणाले, अशा सभापतीचे समर्थन आढळराव करत असतील, तर  यापेक्षा मोठे दुर्दैव नाही.' 

जुन्नर पंचायत समिती आढळरावांच्या हातातून गेली आहे. तेथे आशाताई बुचके आणि त्यांच्यात वितुष्ट आहे. आंबेगावात त्यांचे काही चालत नाही. शिरूरमध्ये तीच परिस्थिती आहे. हडपसर, भोसरी, भोर, वेल्हा येथे तर त्यांचे अस्तित्वच राहिलेले नाही.  खेड तालुक्यात शिवसेनेत नेतृत्व शिल्लक राहिले नसल्याने, तालुक्यात येऊन वाईट घटना घडवून, खेडचे वातावरण खराब करण्याचे काम ते करतात.  खेड तालुक्यांमध्ये जमिनी खरेदी करून त्यात नफा मिळवतात. तसेच खेड तालुक्यात इतरही व्यवसाय करतात. खेड तालुका हा त्यांच्या दृष्टीने सोन्याची अंडी देणारी कोंबडी आहे. म्हणून ते सतत येधे लक्ष घालतात. मी मात्र विकासात गर्क असल्याने अन्य गोष्टी करण्यासाठी माझ्याकडे खरोखर वेळ नाही, असेही आमदार मोहिते म्हणाले. 

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Sarkarnama News
sarkarnama.esakal.com