पोलिसांचा दणका : युवक काँग्रेस प्रदेश सरचिटणीसासह टोळीला लावला `मोका`

केदारसह त्याचे वडील हे गेल्या दोन महिन्यांपासून फरारच आहेत.
Action against Ganesh Gaikwad and his father under Mcoca Act
Action against Ganesh Gaikwad and his father under Mcoca Act

पिंपरी : महाराष्ट्र प्रदेश युवक काँग्रेसचा सरचिटणीस आणि पुण्यातील उद्योगपती केदार ऊर्फ गणेश नानासाहेब गायकवाड (वय ३६, रा. एनएसजी हाऊस,आयआयटी रोड,औध,पुणे), त्याचे वडील आणि तीन साथीदारांना पिंपरी-चिंचवड पोलिसांनी आज `मोका` (महाराष्ट्र संघटीत गुन्हेगारी नियंत्रण कायदा,१९९९)लावला. मात्र, टोळीप्रमुख केदारसह त्याचे वडील हे गेल्या दोन महिन्यांपासून  फरारच आहेत. (Action against Ganesh Gaikwad and his father under Mcoca Act)

दरम्यान, पोलिसांनी गायकवाड टोळीविरुद्ध मोका कायद्यान्वये कारवाई केली असली, तरी काँग्रेसने मात्र अद्याप कसलीही कारवाई केलेली नाही. आता मोका लागल्यानंतर केदारचं निलंबन होण्याची शक्यता बळावली आहे. केदारसह त्याचा मेव्हणा दिपक गवारे (रा. शिवाजीनगर, पुणे) व त्याचे इतर दोन साथीदार गणेश ज्ञानेश्वर साठे (वय ३५, रा. पिंपळे निलख) आणि राजदादा अंकुश (रा. पिंपळे गुरव) अशी मोका लागलेल्या इतरांची नावे आहेत. त्यातील राजदादा अंकुश हा सध्या चतुशृंगी पोलिस ठाण्याच्या एका गुन्ह्यात त्यांच्या अटकेत आहे. तर, त्यात गवारे व त्याच्या पत्नीला अगोदरच अटक झालेली आहे.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, गायकवाड टोळीविरुद्ध पिंपरीसह पुणे आणि पुणे ग्रामीणमध्ये खंडणी, खूनाचा प्रयत्न, अपहरण, बलात्कार, दंगा, मारामारी असे २५ गंभीर गुन्हे दाखल आहेत. त्यातील प्रत्येकी दोन गुन्हे पिंपरी-चिंचवड पोलिस आय़ुक्तालयातील सांगवी आणि हिंजवडी पोलिस ठाण्यावरील आहेत. त्यापैकी सांगवीतील दरोड्याच्या गेल्या महिन्यात २४ तारखेला दाखल झालेल्या गुन्ह्यात ही मोकाची कारवाई अतिरिक्त पोलिस आयुक्त रामनाथ पोकळे यांनी आज केली. 

तीन दिवसांपूर्वीच सांगवी पोलिस ठाण्यातच केदार टोळीविरुद्ध खंडणी, अपहरण आणि बेकायदेशीर सावकारीचा नवा दुसरा गुन्हा दाखल झालेला आहे. चार गुन्हे आपल्या हद्दीत दाखल असलेल्या पिंपरी-चिंचवडच्या पोलिस आयुक्त कृष्णप्रकाश यांनी गायकवाड टोळीला मोकाचा हिसका दाखवला. २५ पैकी तब्बल २० गुन्हे त्यांच्या हद्दीतील व पिंपरी आयुक्तालयात दाखल झालेल्या गुन्ह्यांच्या अगोदरचे जुने आहेत. त्यापैकी तब्बल १२ गुन्हे एकट्या केदारविरुद्ध आहेत. त्यातील आठ तर एकाच म्हणजे चतुशृंगी पोलिस ठाण्यात असून एक चंदननगर तर तीन पिंपरी आयुक्तालयात आहेत.

त्याचे वडिल नानासाहेब शंकर गायकवाड विरुद्धच्या आठ गुन्ह्यांपैकी सहा हे पुणे पोलिस आयुक्तालयातील चतुशृंगी पोलिस ठाण्यावर तर दोन पिंपरी-चिंचवड पोलिस आय़ुक्तालयात (हिंजवडी व सांगवी पोलिस ठाणे) नोंद आहेत. पिंपरीत गुन्हे दाखल  सुरु होताच गायकवाड पितापूत्र फरार झाले आहेत. 

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Sarkarnama News
sarkarnama.esakal.com