मोठी कारवाई : महिला इंजिनिअरला नव्वद हजाराची लाच घेताना अटक - acb arrested irrigation department assistant engineer for accepting bribe | Politics Marathi News - Sarkarnama

ब्रेकिंग न्यूज

सातारा : लॉकडाऊनच्या विरोधात साताऱ्याचे भाजपचे खासदार उदयनराजे भोसले यांनी आज पोवईनाका येथे पोत्यावर बसून भिक मांगो आंदोलन केले.

मोठी कारवाई : महिला इंजिनिअरला नव्वद हजाराची लाच घेताना अटक

उत्तम कुटे
मंगळवार, 6 एप्रिल 2021

मागील पाच दिवसांत मावळ तालुक्यात एसीबीने ही दुसरी मोठी कारवाई केली आहे.
 

पिंपरीः नव्वद हजार रुपयांची लाच घेताना उपसा जलसिंचन विभागातील महिला सहाय्यक अभियंत्या मोनिका रामदास ननावरे (वय ३१) यांना आज पुणे लाचलुचपत प्रतिबंधक विभागाने (एसीबी) पवनानगर  (ता.मावळ, जि.पुणे) येथे पकडले.

गेल्या पाच दिवसांत मावळ तालुक्यात एसीबीने केलेली ही दुसरी मोठी कारवाई आहे.पाच दिवसांपूर्वीच (ता.१) वडगाव मावळ न्यायालयातील न्यायाधीश अर्चना जतकर यांना अडीच लाख रुपये लाच घेतल्याच्या प्रकरणात अटक करण्यात आली होती. सध्या मावळात लाचखोरीचे आणि तेही लाखात लाच मागण्याचे प्रमाण वाढल्याचे गेल्या काही दिवसांतील लाचखोरीच्या ट्रॅपमधून आढळून येत आहे.

गेल्या महिन्याच्या सहा तारखेला साडेतीन लाख रुपये लाच घेताना मावळातील कामशेत पोलिस ठाण्याचे पोलिस निरीक्षक,सहाय्यक निरीक्षक आणि हवालदार अशा तिघांना एसीबीच्या पुणे युनीटनेच पकडले होते. तर,या महिन्याची सुरवात थेट न्यायाधीशाच्या लाखाच्याच लाचखोरीतील अटकेने झाली. त्यानंतर पाच दिवसांतच दुसरी लाचखाऊ महिला अधिकारी आज एका शेतकऱ्याकडून लाच घेताना पकडली गेली. 

आजच्या प्रकरणातही लाच लाखातच म्हणजे एक लाख वीस हजार रुपयांची मागितली होती. नंतर नव्वद हजारावर तडजोड झाली. या प्रकरणातील तक्रारदार शेतकरी यांची मावळ तालुक्यातील कुरुंजगाव येथे शेती आहे. त्यांना शेतीसाठी पवना नदीतून पाणी घ्यायचे होते. त्याची परवानगी त्यांनी ननावरे यांच्याकडे मागितली होती. ती देण्यासाठी ही लाच मागून ती स्वीकारताना त्या पकडल्या गेल्या.

अधिक राजकीय बातम्यांसाठी सरकारनामा अॅप डाऊनलोड करा
Play Store    App Store

संबंधित लेख