नितीन लांडगे यांच्या पीएने तोंड उघडलं नाही अन् स्थायीचे १५ सदस्य वाचले

मागील आठवड्यातस्थायीचे अध्यक्ष अॅड. नितीन लांडगे यांना पालिकेच्या एका ठेकेदाराकडून एक लाख १८ रुपयांची लाच घेताना पकडण्यात आले होते.
Nitin Landages PA did not name anyone in the ACB inquiry
Nitin Landages PA did not name anyone in the ACB inquiry

पिंपरी : लाचखोरीत अटक झालेले पिंपरी-चिंचवड महापालिकेच्या स्थायी समितीचे अध्यक्ष अॅड. नितीन लांडगे यांचे पीए आणि पालिकेचे मुख्य लिपिक ज्ञानेश्वर पिंगळे यांनी चौकशीदरम्यान अखेरपर्यंत तोंड उघडलं नाही. त्यामुळं स्थायीचे इतर सर्व १५ सदस्य लाचलुचपत प्रतिबंधक विभागाच्या (एसीबी) चौकशीतून सुटले. त्यामुळे त्यांनी सुटकेचा मोठा निश्वास सोडला आहे. तसेच यामुळे टक्केवारीचे हे प्रकरण फक्त भाजपपुरते मर्यादित राहिले. ते ऱाष्ट्रवादी, शिवसेनेच्या स्थायीतील सदस्यांपर्यंत पोचलेच नाही. (Nitin Landages PA did not name anyone in the ACB inquiry)

मागील आठवड्यात बुधवारी (ता. १८) पिंगळेंसह त्यांचे दोन सहकारी लिपिक, एक शिपाई आणि स्थायीचे अध्यक्ष अॅड. नितीन लांडगे यांना पालिकेच्या एका ठेकेदाराकडून एक लाख १८ रुपयांची लाच घेताना पकडण्यात आले होते. त्यामुळे पालिकेतच नाही तर राज्यभरातील राजकीय वर्तुळात मोठी खळबळ उडाली. प्रत्येक निविदा रकमेच्या तीन टक्के रक्कम लाच म्हणून १६ जणांना द्यावी लागते, असे पिंगळे याने तक्रारदार ठेकेदाराला सांगत दोन टक्के घेण्यास लाचेच्या सापळ्यापूर्वी नकार दिला होता. नंतर, मात्र त्यात अटक होऊन चार दिवस पोलिस (एसीबी) कोठडीत काढल्यानंतरही त्यांनी ते १६ कोण यांची नावे शेवटपर्यंत सांगितली नसल्याचे समजते. 

या १६ जणांच्या चौकशीसाठी घेतलेली सर्व पाच आरोपींची पोलिस कोठडी संपून सुद्धा ही चौकशी, त्यांचे जाबजबाब एसीबी घेऊच शकली नाही. पिंगळेनी तोंड न उघडल्यानेच स्थायीतील भाजपसह राष्ट्रवादी, शिवसेना, अपक्ष आघाडी अशा १५ सदस्यांवरील चौकशीची टांगती तलवार टळली. त्यामुळे त्यांनी सोमवारी सुटकेचा श्वास सोडला. कारण या सर्व आरोपींची पोलिस कोठडी संपून त्यांना सोमवारी न्यायालयीन कोठडी मिळाली आहे. अॅड लांडगेंना तर अंतरिम जामीनही झाला. बाकीच्या चौघांना तो परवा होण्याची शक्यता आहे. 

दरम्यान, ते सोळा कोण हे न समजल्याने वा ते माहित असून तसा तपास न केल्याने स्थायीच्या उघड टक्केवारीच्या गुपितावर कायदेशीर शिक्कामोर्तब झाले नाही. राज्य सरकारमध्ये गृहखाते असलेल्या राष्ट्रवादीचे चार सदस्य स्थायी समितीत असल्याने त्यांच्यामागे चौकशीचा ससेमिरा लावला नसल्याची चर्चा यामुळे आज पालिकेत ऐकायला मिळाली.

नितीन लांडगे स्थायीची बैठक घेणार?

अॅड. लांडगे यांना सोमवारी (ता.२३) अंतरिम जामीन मिळाला. त्यामुळे ते या आठवड्याची स्थायीची साप्ताहिक बैठक येत्या बुधवारी (ता.२५) घेऊ शकतात. कायद्याने त्याला अडसर नसून जोपर्यंत गुन्हा सिद्ध होऊन शिक्षा होत नाही, तोपर्यंत महापालिका प्रशासन त्यांना त्यापासून रोखू शकत नाही, असे पालिकेचे विधी सल्लागार आणि सहाय्यक आयुक्त चंद्रकांत इंदलकर यांनी 'सरकारनामा'ला सांगितले. फक्त लांडगे ही बैठक घेणार का, हा प्रश्न आहे. तसेच त्यांच्या अनुपस्थितीतही अजेंडा जाहीर झालेली ही सभा घेण्याची तरतूद आहे. अध्यक्ष म्हणून एका सदस्याची निवड करून ती घेता येऊ शकते, असे महापालिकेचे नगरसचिव आणि अतिरिक्त आयुक्त उल्हास जगताप यांनी स्पष्ट केले. त्यामुळे ही बैठक होणार की ती तहकूब केली जाते, याकडे लक्ष लागले आहे.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi news on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS.
सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुक,ट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट आणि टेलिग्रामवर आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Sarkarnama
www.sarkarnama.in