...नाही तर मुख्यमंत्र्याची गाडी आडवू - सुप्रिया सुळे

"शिवणे ते कोंढवे धावडे या रस्त्याला हजारो खड्डे पडले असून त्याचे काम एक महिन्यात सुरू न झाल्यास पालकमंत्र्याच्या घरापुढे आंदोलन करू. वेळप्रसंगी मुख्यमंत्र्यांची गाडीदेखील आम्ही आडवू," असा इशारा खासदार सुप्रिया सुळे यांनी दिला.
...नाही तर मुख्यमंत्र्याची गाडी आडवू - सुप्रिया सुळे

उत्तमनगर : "शिवणे ते कोंढवे धावडे या रस्त्याला हजारो खड्डे पडले असून त्याचे काम एक महिन्यात सुरू न झाल्यास पालकमंत्र्याच्या घरापुढे आंदोलन करू. वेळप्रसंगी मुख्यमंत्र्यांची गाडीदेखील आम्ही आडवू," असा इशारा खासदार सुप्रिया सुळे यांनी दिला. 

शिवणे ते  कोंढवे धावडे रस्ताचे भूमिपूजन दीड वर्षापूर्वी झाले. रस्ता रुंदीकरणासाठी इमारती पाडल्या. तेथे अद्याप रस्त्याचे रुंदीकरण झाले नाही. सहा महिन्यांपूर्वी डांबरीकरण झालेला रस्ता पावसात खराब झाला. यामुळे रस्त्याच्या दुरावस्थेकडे सरकारचे लक्ष वेधण्यासाठी उत्तमनगर येथील माजी सरपंच सुरेश गुजर यांनी जनसेवा उत्कर्ष स्वयंसहायता बचत गट व शिवणे, उत्तमनगर, कोंढवे धावडे, न्यू कोपरे कृती समितीच्यावतीने रविवारी अहिरेगेट ते भैरवनाथ मंडळापर्यंत चालत आंदोलन करण्यात आले. जन आंदोलन मोर्चाचे आयोजन केले होते. यावेळी सुप्रिया सुळे बोलत होत्या. कपडे, किराणा, व्यावसायिक नाभिक, मेडिकल, दुकान या व्यापारी संघटनेने 2 तास दुकाने बंद ठेवून आंदोलनात सहभागी झाले.

यावेळी, आयोजक सुरेश गुजर, अनिता इंगळे, दिलीप बराटे, सचिन दोडके, सायली वांजळे, शुक्राचार्य वांजळे, नितीन दांगट, काका चव्हाण, रूपाली चाकणकर, अंबादास धर्मकांबळे, सदाशिव लोले, दत्तात्रेय वाघ, अतुल दांगट, अनिल देशमुख, त्रिम्बक मोकाशी, अतुल धावडे, सारंग राडकर, नंदू मोकाशी, अतुल आगरवाल, खुशाल करंजावणे, अमोल कार्ले उपस्थित होते. 

विद्यार्थी, कामगार, महिला, ज्येष्ठ नागरिक येथील रस्त्याच्या दुरावस्थेमुळे जखमी झाले आहेत. भाजी विक्रत्यांपासून ते  सर्व व्यापारी, स्थानिक नागरिक, पर्यटक रस्त्याच्या या दुरवस्थेला वैतागले आहेत. मला ही लाज वाटते, की हा रस्ता माझ्या मतदारसंघातील आहे. याबाबत मी पत्रव्यवहार करून पाठपुरावा केला, असे सांगून खासदार सुळे म्हणाल्या, "मागण्या करूनदेखील दुर्लक्ष होत असल्याने आम्ही शांततेत वारकऱ्यांच्या मार्गाने हे आंदोलन केले. आमचे आंदोलन होत असल्याने सत्ताधारी भाजपने 10 कोटी मंजूर झाले असून एका महिन्यात काम सुरू होईल असे फ्लेक्स लावले. त्याचे देखील आम्ही स्वागत करतो. आमच्या आंदोलनामुळे जाग आली."

आम्ही आंदोलन करण्यापूर्वी मुरूमाने खड्डे बुजविले. नगरसेवक दोडके यांनी काँक्रीट रस्ता, पण बांधकाम विभागाला जाग आली नाही. म्हणून आंदोलन करावं लागले, असे आयोजक सुरेश गुजर यांनी सांगितले. 


आमदारांचा निषेध 

सार्वजनिक बांधकाम खाते (पीडब्लूडी) खाते मग्रूर असून खात्याला 3 महिन्यापूर्वी खड्डे भरण्यास सांगितले. त्यावर मला म्हणतात, की तुम्हाला टेंडर भरायचे का, आम्ही मुरमाने खड्डे भरले. पीडब्लूडी म्हणते, की आम्ही खड्डे भरले. आम्ही लोकप्रतिनिधी असल्याने लोकांसाठी आम्ही रस्त्यावर येणार. एवढा रस्ता खराब झाला असताना आमदारांनी रस्त्यासाठी एक फोन करून रस्ता खड्डे भरण्यास सांगितले असते, तर चांगले असते. परंतु त्यांचे दुर्लक्ष असल्याने मी त्यांचा निषेध करते.
                                        

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Sarkarnama News
sarkarnama.esakal.com