मिळकतकरावरील दंड आकारणी थांबवा : शिवसेनेची पुण्यात मागणी

सध्याच्या स्थितीत सामान्य थकबाकीदारांना कर भरण्यात अशक्‍य होणार असल्याने किमान त्यांच्या करावरील दंडाच्या रक्कमेत सवलत द्यावी आणि पुढील तीन महिने कर थकला तरी, त्यावर दंड आकारू नये, अशी मागणी शिवसेनेचे नगरसेवक नाना भानगिरे यांनी महापालिका आयुक्त शेखर गायकवाड यांच्याकडे केली आहे
Shivsena Demands Cancellation of Penalty on Property Tax in Pune
Shivsena Demands Cancellation of Penalty on Property Tax in Pune

पुणे : पुणेकरांना नव्या वर्षातील मिळकतकराची बिले पाठविण्याची कार्यवाही सुरू होऊन चोवीस तास झाले खरे; मात्र ज्यांना मिळकतकर भरणे शक्‍य झाले नाही, अशा मिळकतधारकांच्या कराच्या रक्कमेवर दंड आकारू नये, असा आग्रह शिवसेनेने महापालिका आयुक्तांकडे धरला आहे. पुढील तीन महिन्यांसाठी शास्ती रद्द केल्यास नियमित कर भरणारे आणि थकबाकीदार अशा साडेतीन लाख मिळकतधारकांना फायदा होईल, असे शिवसेनेच्या मागणीतून स्पष्ट झाले आहे. 

कराच्या थकबाकीवर महिन्या दोन टक्के म्हणजे, वर्षाला 24 टक्के शास्ती (दंड) आकारली जाते. कोरोनामुळे सर्वत्र आर्थिक अडचणी निर्माण झाल्या आहेत. भविष्यातही त्याचे गंभीर परिणाम उमटण्याची भीती आहे. त्यातच 'लॉकडाऊन'चा सर्वच क्षेत्रांवर परिणाम जाणवू लागला आहे. पुढील काही महिने आर्थिक घडी सुरळीत होण्याची चिन्हे नसल्याने केंद्र आणि राज्य सरकारने गरिबांच्या हिताचे निर्णय घेत; बॅंकाच्या हप्तासह घरभाड्याचा तगादा लावू नये, अशा सूचनावजा आदेश देण्यात आले आहेत. त्यामुळे या घटकांना दिलासा मिळणार आहे. 

या स्थितीमुळे पुणेकरांना मिळकतकरही भरण्यात अडचणी येणार आहेत. तरीही गेल्या काही दिवसांत पुणेकरांनी सुमारे 1300 कोटी रुपयांचा कर भरला आहे. मात्र सध्याच्या स्थितीत सामान्य थकबाकीदारांना कर भरण्यात अशक्‍य होणार असल्याने किमान त्यांच्या करावरील दंडाच्या रक्कमेत सवलत द्यावी आणि पुढील तीन महिने कर थकला तरी, त्यावर दंड आकारू नये, अशी मागणी शिवसेनेचे नगरसेवक नाना भानगिरे यांनी महापालिका आयुक्त शेखर गायकवाड यांच्याकडे केली आहे. 

कोरोना आणि त्यानंतरच्या 'लॉकडाऊन'चा परिणाम उद्योगधंद्यांवर झाला असून, त्यामुळे हजारो लोकांचे रोजगार थांबले आहेत. त्यामुळे उद्योग, सेवा क्षेत्रांसह बहुतांशी लोकांना आर्थिक अडचणींना तोंड द्यावे लागेल. या पार्श्‍वभूमीवर पुणेकरांना तात्पुरता दिलासा देण्याच्या उद्देशाने कर थकला तरी तीन महिन्यांसाठी त्यावर दंड घेऊ नये, त्याबाबतचा निर्णय घेऊन त्याची घोषणा करावी, असे भानगिरे यांनी म्हटले आहे.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Sarkarnama News
sarkarnama.esakal.com