पुण्यात 'हज हाऊस' करण्यासाठी प्रयत्न करू : शरद पवार

मुबई येथेहज हाऊस व्हावे यासाठी आम्ही प्रयत्न केले होते. त्याप्रमाणे मुबंईत हज हाऊस झाले. सध्या सत्तेत दुसरे असले तरी त्यांच्याकडे आम्ही शिफारस करू आणि पुण्यात हज हाऊस होण्यासाठी प्रयत्न करू.- शरद पवार
पुण्यात 'हज हाऊस' करण्यासाठी प्रयत्न करू : शरद पवार

पुणे: 'पुण्यात हज हाऊस करण्यासाठी प्रयत्न करू,' असे आश्वासन आज शरद पवार यांनी कोंढवा येथील कौसरबाग येथे 'रोझा इफ्तार' च्या आयोजित कार्यक्रमात दिले. 'मुबई येथे हज हाऊस व्हावे यासाठी आम्ही प्रयत्न केले होते. त्याप्रमाणे मुबंईत हज हाऊस झाले. सध्या सत्तेत दुसरे असले तरी त्यांच्याकडे आम्ही शिफारस करू आणि पुण्यात हज हाऊस होण्यासाठी प्रयत्न करू.' असेही आश्वासन पवार यांनी दिले.  

मुस्लिम धर्मीय बांधवांचा पवित्र महिना म्हणून ओळखल्या जाणार्‍या रमझान निमित्त राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष आणि माजी केंद्रीय मंत्री शरद पवार यांच्यातर्फे आणि त्यांच्या उपस्थितीत 'रोझा इफ्तार' चे आज आयोजन करण्यात आले होते. कार्यक्रमाचे प्रास्ताविक चेतन तुपे यांनी केले. सूत्र संचालन इक्बाल शेख यांनी केले. आभार नंदा लोणकर यांनी मानले.

शिक्षण तज्ज्ञ पी. ए. इनामदार  म्हणाले, 'सर्व धर्मीय सण एकत्रित साजरे करणारे सलोखा वाढीस लावणारे आणि  शांतताप्रिय, सर्वांना बरोबर घेवून प्रगती करणारे हे पुणे शहर आहे. पुण्यातील सर्वधर्मीय सलोख्याचे वातावरण राखणे, मुस्लिम धर्मिय बांधवांच्या सणात सहभागी होणे हा या उपक्रमाचा उद्देश स्वागतार्ह आहे'.मौलाना अयुब अशरफी, मौलाना निजामुद्दीन, मौलाना कारी ईसीद यांनी आपले मनोगत व्यक्त केले.

यावेळी अजित पवार, प्रदेशाध्यक्ष सुनील तटकरे, धनंजय मुंडे, खासदार वंदना चव्हाण, पालिकेतील विरोधी पक्ष नेते चेतन तुपे, पुणे शहर अल्पसंख्यांक आघाडी अध्यक्ष इक्बाल शेख, माजी महापौर प्रशांत जगताप, राजलक्ष्मी भोसले, चंचला  कोद्रे, वैशाली बनकर, दत्ता  धनकवडे, आजी माजी नगरसेवक, कोंढवा येथील स्थानिक नगरसेवक अॅड. हाजी गफूर पठाण, हमीद सुंडके, परवीन शेख, अनीस सुंडके, रईस सुंडके, हाजी फिरोज, नारायण लोणकर, संजय लोणकर, राहुल लोणकर, फहीम शेख, मोहिदीन खान आणि कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते .

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Sarkarnama News
sarkarnama.esakal.com