नीतेश यांनी कॉंग्रेसला दाखवली राणे यांच्या "रिमोट कंट्रोल'ची भीती 

विधानसभेतील विरोधीपक्षनेतेपद कॉंगेसकडून कधी काढून घ्यायचे याचा निर्णय माजी मुख्यमंत्री नारायण राणे योग्यवेळी "रिमोट कंट्रोल'ने ठरवतील, असे राणे यांचे पुत्र व कॉंग्रेसचे आमदार नीतेश राणे यांनी आज येथे सांगितले.
नीतेश यांनी कॉंग्रेसला दाखवली राणे यांच्या "रिमोट कंट्रोल'ची भीती 

पुणे : विधानसभेतील विरोधीपक्षनेतेपद कॉंगेसकडून कधी काढून घ्यायचे याचा निर्णय माजी मुख्यमंत्री नारायण राणे योग्यवेळी "रिमोट कंट्रोल'ने ठरवतील, असे राणे यांचे पुत्र व कॉंग्रेसचे आमदार नीतेश राणे यांनी आज येथे सांगितले. 

राणे यांनी विधानपरिषदेच्या सदस्यत्वाचा राजीनामा देत कॉंग्रेसला रामराम केला आहे. मात्र नीतेश यांनी विधानसेच्या आमदारकीचा राजीनामा दिलेला नाही. ते अद्यापही कॉंग्रेसचे आमदार आहेत. विधासभेतील कॉंग्रेस व राष्ट्रवादीच्या संख्याबळात केवळ एकचा फरक आहेत. त्यामुळे नीतेश राणे व कालिदास कोळंबर यांनी कॉंग्रेस सोडल्यास कॉंग्रेसला विरोधीपक्षनेतेपद गमवावे लागणार आहे. त्यामुळे नीतेश यांनी राणे यांच्या "रिमोट कंट्रोल'ची भीती कॉंग्रेसला दाखवली आहे. 

पुण्यात बोलताना नीतेश यांनी भारतीय जनता पक्ष प्रवेशाबाबत मात्र अधिक बोलण्याचे टाळले. राजकारणात टायमिंगला महत्व असते. योग्यवेळी योग्य निर्णय होत असतात. त्यामुळे योग्यवेळी निर्णय होतील, असे नीतेश राणे म्हणाले. गेली तीन-चार महिने राणे यांच्या भाजप प्रवेशाची चर्चा सुरू आहे. भाजप प्रवेश लांबल्याने अस्वस्थ झालेल्या राणे यांनी कॉंग्रेसचा राजीनामा देत प्रदेशाध्यक्ष अशोक चव्हाण यांच्यासह पक्षातील अनेकांना लक्ष्य केले आहे. भविष्यात राणे आणखी आक्रमक होत कॉंग्रेसला लक्ष्य करण्याची शक्‍यता आहे. नीतेश यांनी राणे यांच्या रिमोट कंट्रोलची दाखविलेली भीती हा त्याचाच एक भाग असल्याचे मानले जात आहे. 

पुण्यासह राज्यातील अनेक जिल्ह्यात राणे समर्थक आहेत. भाजप प्रवेश निश्‍चित झाल्यानंतर यातील काहीजण उघडपणे बाहेर पडतील असे कॉंग्रेसमधील जाणकारांचे मत आहे. मुंबई महापालिकेतही राणे कॉंग्रेस व शिवसेनेला नुकसान पोचवू शकतात, असा अंदाज या जाणकारांनी व्यक्त केला आहे. राणे यांनी कॉंग्रेस सोडण्याची ही वेळ नव्हती, असा सूरदेखील कॉंग्रेसमधील राणे समर्थक व सहानुभूतीदारांनी लावला. मात्र राणे भाजपमध्ये गेल्यास यातील बरेचजण त्यांच्याबरोबर जावू शकतात, असे या जाणकारांचे मत आहे. 
 

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Sarkarnama News
sarkarnama.esakal.com