कोरोनामुळे विलिगीकरण केलेल्या व्यक्तीनेच मागितला पोलिसांना प्रवासासाठी डिजिटल पास - Pune News Isolated Corona Suspect Demanded Digital Pass for Travel to Police | Politics Marathi News - Sarkarnama

कोरोनामुळे विलिगीकरण केलेल्या व्यक्तीनेच मागितला पोलिसांना प्रवासासाठी डिजिटल पास

पांडुरंग सरोदे
सोमवार, 13 एप्रिल 2020

संचारबंदी कालावधीत घरी जाण्यासाठी पुणे पोलिसांकडे  डिजिटल पासची मागणी करणाऱ्याचा पोलिसांना संशय आल्याने त्यांनी स्थानिक पोलिसांकडे संपर्क साधला. स्थानिक पोलिसांनी पडताळणी केल्यानंतर संबंधित व्यक्तीला कोरोनामुळे विलगीकरण केल्याचे निदर्शनास आ

पुणे  : संचारबंदी कालावधीत घरी जाण्यासाठी पुणे पोलिसांकडे  डिजिटल पासची मागणी करणाऱ्याचा पोलिसांना संशय आल्याने त्यांनी स्थानिक पोलिसांकडे संपर्क साधला. स्थानिक पोलिसांनी पडताळणी केल्यानंतर संबंधित व्यक्तीला कोरोनामुळे विलगीकरण केल्याचे निदर्शनास आले. पोलिसांच्या सतर्कतेमुळे एक मोठी दुर्घटना टळली.

पोलिस उपायुक्त (गुन्हे) बच्चन सिंग यांच्या देखरेखीखाली संचारबंदी कालावधीत नागरिकांना अडचण येऊ नये, यासाठी डिजीटल पास यंत्रणा सुरू करण्यात आली. डिजीटल पास कक्षाकडे एका व्यक्तीने फोनद्वारे संपर्क साधला. आपण डिजीटल पास मिळविण्यासाठी अर्ज प्रक्रिया पूर्ण केली आहे, मात्र आपल्याला अद्याप पास मिळाला नसल्याचे त्याने सांगितले.

डिजीटल कक्षातील पोलिस अधिकाऱ्यांनी संबंधित व्यक्तीकडे पास देण्यासाठीचे कारण विचारले, तेव्हा त्याने "आपण चंदननगर येथील एका कंपनीमध्ये असून कोरोनामुळे माझे विलगीकरण करण्यात आले आहे, माझा विलगीकरण कालावधी संपला आहे, आता मला घरी जायचे आहे, " असे त्याने पोलिसाना सांगितले. 

पोलिसांनी त्यास कोरोनामुळे विलगीकरण केलेल्या व्यक्तीला सोडण्याची परवानगी आम्ही देऊ शकत नाही, असे स्मजवाले. तरीही त्याच्याकडून सोडण्याबाबत विनंती केली जात होती. त्यामुळे पोलिसांनी चंदननगर पोलिसांशी संपर्क साधला. त्यानंतर पोलिस संबंधित ठिकाणी जाऊन चौकशी केली. तेव्हा, डिजीटल परवानगी मागणाऱ्या व्यक्तीचा विलगीकरण कालावधी अद्याप संपला नसल्याची माहिती पोलिसाना मिळाली.

त्यानुसार पोलिसांनी संबंधित व्यक्तीला बाहेर न पडण्याच्या सूचना देऊन डिजीटल कक्षाला सविस्तर माहिती दिली. पोलिसांनी तत्काळ या प्रकारची दखल घेऊन पाहणी केल्याने पुढील दुर्घटना टळली, अशी माहिती पोलिस निरीक्षक शिल्पा चव्हाण यांनी दिली.

अधिक राजकीय बातम्यांसाठी सरकारनामा अॅप डाऊनलोड करा
Play Store    App Store

संबंधित लेख