...तर दुकाने बंद होतील : नफेखोरी करणाऱ्या व्यापाऱ्यांना रुपाली पाटील यांचा इशारा

घरगुती कार्यक्रमाला गेलेल्या महाराष्ट्र नवनिर्माण सेनेच्या शहराध्यक्ष रुपाली पाटील या आठवडाभरापासून साताऱ्यातल्या वाईत अडकल्या आहेत. पण, पुण्यात काही भागात जीवनावश्यक वस्तू महागल्याच्या तक्रारी त्यांच्या कानावर गेल्या अन संतापलेल्या रुपाली पाटलांनी एका बंद मॉलमधला माल बाहेर काढला, तो गरिबांपर्यंत पोचविलाही
MNS Leader Roopali Patil Warns Traders
MNS Leader Roopali Patil Warns Traders

पुणे : घरगुती कार्यक्रमाला गेलेल्या महाराष्ट्र नवनिर्माण सेनेच्या शहराध्यक्ष रुपाली पाटील या आठवडाभरापासून साताऱ्यातल्या वाईत अडकल्या आहेत. पण, पुण्यात काही भागात जीवनावश्यक वस्तू महागल्याच्या तक्रारी त्यांच्या कानावर गेल्या अन संतापलेल्या रुपाली पाटलांनी एका बंद मॉलमधला माल बाहेर काढला, तो गरिबांपर्यंत पोचविलाही. 

रुपाली पाटील तेवढ्यावरच थांबल्या नाहीत; जीवनावश्यक वस्तुंच्या किमती न वाढविण्याची विनंती दुकानदारांना केली आणि तसे केलात तर दुकानाला टाळेच ठोकण्याचा दमही त्यांनी भरला.

कोरोनाचा संसर्ग टाळण्यासाठी सध्या देशभरात 'लॉकडाऊन' आहे. त्यामुळे अत्यावश्यक सेवा वगळता अन्य बाजारपेठांना टाळे आहे. मात्र, या काळात काही वस्तुंचे भाव वाढविण्यात आल्याच्या तक्रारी आहेत. विशेषतः तेल, तूरडाळ आणि कडधान्याचे भाव वाढले आहेत. तर पालेभाज्याही महाग झाल्या आहेत. आधीच रोजगार थांबला आणि आता पुन्हा महागाईची झळ सोसावी लागत असल्याने हातावर पोट असलेली मंडळी हैराण झाली आहे. त्यातच रोजंदारी करणाऱ्या मंडईतील २५ कुटुंबातील चूल बंद असल्याची वस्तुस्थिती रुपाली पाटील यांच्यापर्यंत पोचली.

तेव्हा, गेल्या काही दिवसांपासून बंद असलेला मॉल रात्री उघडून त्यातील जीवनावश्यक वस्तू लोकांपर्यंत पोचविण्याची तयारी केली. मॉल व्यवस्थापनानेही आपल्याकडील बहुतांशी माल दिला. दुसरीकडे, काही भागात व्यापाऱ्यांनी आपल्याकडील साहित्याच्या किमती वाढविल्याने त्यांना समजत देत, बाजारभाव कायम ठेवण्याचा सल्ला रुपाली पाटलांनी यांनी दिला आहे.

त्या म्हणाल्या, "लोकांचे रोजगार बंद झाला आहे. मोलकरीण घरातून बाहेर जात नाही. मग, त्यांच्या कुटुंबातील लोकांचे पोट कसे भरायचे? तरीही काही किराणा दुकानदार नफेखोरी करीत असतील तर चुकीचे आहेत. गेल्या आठवड्याच्या तुलनेत बहतांशी वस्तू महाग केल्या आहेत. हे प्रकार नाही थांबले तर, दुकाने बंद होतील; हे विसरू नका."

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Sarkarnama News
sarkarnama.esakal.com