pune-loksabha-election-congress | Sarkarnama

पुण्यातली कॉंग्रेसची उमेदवारी निष्ठावंतांनाच; कार्यकर्त्यांचा विश्‍वास 

उमेश घोंगडे 
बुधवार, 13 मार्च 2019

लोकसभा निवडणुकांचे वारे जोराने वाहू लागले आहे. पुण्यात कॉंग्रेसची उमेदवारी कुणाला मिळणार यावरून दावे-प्रतिदावे करण्यात येऊ लागले आहेत. कुणाच्याही नावाची चर्चा सुरू असली तरी उमेदवारी निष्ठावंतांनाच मिळणार असा दावा निष्ठावंत कॉंग्रेसजनांकडून करण्यात येत आहे. येत्या सोमवारपर्यंत पुण्याच्या उमेदवारीची निकाल लागेल, असे या कार्यकर्त्यांचे म्हणणे आहे. 

पुणे : लोकसभा निवडणुकांचे वारे जोराने वाहू लागले आहे. पुण्यात कॉंग्रेसची उमेदवारी कुणाला मिळणार यावरून दावे-प्रतिदावे करण्यात येऊ लागले आहेत. कुणाच्याही नावाची चर्चा सुरू असली तरी उमेदवारी निष्ठावंतांनाच मिळणार असा दावा निष्ठावंत कॉंग्रेसजनांकडून करण्यात येत आहे. येत्या सोमवारपर्यंत पुण्याच्या उमेदवारीची निकाल लागेल, असे या कार्यकर्त्यांचे म्हणणे आहे. 

कॉंग्रेसच्यावतीने माजी शहराध्यक्ष अभय छाजेड, माजी आमदार मोहन जोशी व महापालिकेतील पक्षाचे गटनेते अरविंद शिंदे यांची नावे सुरवातीला केंद्रीय समितीकडे पाठविण्यात आली. त्यानंतर भाजपाचे सहयोगी खासदार संजय काकडे व संभाजी ब्रिगेडचे प्रदेशाध्यक्ष प्रवीण गायकवाड यांची नावे कॉंग्रेसकडून चर्चेत आली. मात्र, पक्षातील ज्येष्ठ नेते उल्हास पवार यांनी राज्यातील तसेच शहरातील पक्षाच्या स्थितीबाबत नाराजी व्यक्त करणारे पत्र थेट राहूल गांधी यांना पाठविल्याने एकच खळबळ उडाली. या पत्राची दखल घेत माजी मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण व हर्षवर्धन पाटील यांना पुण्यात पाठविण्यात आले. या दोघांनी पुण्यातील सारे पदाधिकारी व इच्छुकांशी पुन्हा चर्चा केली. 

या चर्चेनंतर पुण्यातील उमेदवारीबाबत काही विशिष्ट नावांची होणारी चर्चा थांबली. त्यामुळे अंतीमत: उमेदवार कोण असणार याची उत्सुकता लागून राहिली आहे. विशेषत: इच्छुकांच्या कार्यकर्त्यांमध्ये ही उत्सुकता अधिक आहे. पुण्यातील उमेदवारीबाबत अनेक तर्क-वितर्क लावण्यात येत आहेत. मात्र, पक्षाला निष्ठावंतांना उमेदवारी द्यावी लागेल, असा सूर लावण्यात येत आहे. येत्या सोमवारपर्यंत उमेवारी निश्‍चित होईल, असे माजी आमदार व लोकसभेसाठी इच्छुक असलेले उमेदवार मोहन जोशी यांनी सांगितले.  

 
 

अधिक राजकीय बातम्यांसाठी सरकारनामा अॅप डाऊनलोड करा
Play Store    App Store

संबंधित लेख