Pune Kothrud BJP Leaders Play Kho-Kho | Sarkarnama

कोथरुडमध्ये मंजुश्री खर्डेकरांचा मेधा कुलकर्णींना 'खोss'!

सरकारनामा ब्युरो
गुरुवार, 6 डिसेंबर 2018

पुणे : विधानसभेच्या निवडणुका जशा जवळ येत चालल्या आहेत, तसे राजकीय पटलावर अनेक खेळ रंगत आहेत. कुणी कबड्डी-कबड्डी म्हणत दुसऱ्याचे पाय कसे खेचावेत याचे मनसुबे आखतो आहे तर कुणी आपला फुटबाॅल होऊ नये, यासाठी जीवाचा आटापिटा करतोय. कोथरुड मतदारसंघातही असाच एक खेळ रंगला होता. 'खो-खो'चा! अर्थात हा खराखुरा 'खो-खो' होता. फक्त यातले खेळाडू राजकीय पक्षाचे होते.

राज्यात ठिकठिकाणी सध्या सीएम चषकाची धूम सुरु आहे. पुण्यातही या क्रीडा स्पर्धांचे आयोजन करण्यात आलं आहे. त्याचाच एक भाग म्हणून पुण्याच्या कोथरुड परिसरात सन्मित्र संघात सीएम चषक सौभाग्य खो-खो स्पर्धांचे आयोजन करण्यात आलं होतं. या स्पर्धांचे उद्घाटनही खो-खो खेळूनच झालं. 

कोथरुडच्या आमदार मेधा कुलकर्णी यांनी या स्पर्धांचं उद्घाटन केलं. यांच्यासह भाजपचे नगरसेवक पदाधिकारी या कार्यक्रमाला उपस्थित होते. मेधाताईंसह नगरसेवक दीपक पोटे, जयंत भावे, नगरसेविका माधुरी सहस्त्रबुद्धे, मंजुश्री खर्डेकर यांनीही उद्घाटनाच्या सामन्यात सहभाग घेतला. मंजुश्री खर्डेकरांनी मेधाताईंना 'खो' देताच चपळाईनं उठत मेधाताईंनी एक गडी बाद केला. या निमित्तानं राजकीय नेत्यांमध्ये असलेलं राजकीय 'खो-खो' मधलं प्राविण्य खऱ्या खेळातही दिसलं. 

अधिक राजकीय बातम्यांसाठी सरकारनामा अॅप डाऊनलोड करा
Play Store    App Store

संबंधित लेख