पश्चिम महाराष्ट्रातील तीन प्रमुख जिल्ह्यांचा एसपी होण्याची संधी फक्त या दोघांनाच!

तीनही जिल्हे महत्त्वाचे मानले जातात....
abhinav-deshmukh--sanap.jpg
abhinav-deshmukh--sanap.jpg

पुणे : राज्यातील पोलिस दलातील अधिकाऱ्यांच्या कायम पसंतीमध्ये असलेल्या पुणे, कोल्हापूर आणि सातारा यापैकी एका जिल्ह्यात तरी पोलिस अधीक्षक म्हणून एकदा तरी जबाबदारी मिळावी, अशी अनेक पोलिस अधिकाऱ्यांची इच्छा असते. पण, या तीनही जिल्ह्यांत एसपी म्हणून काम करण्याची संधी मिळाली तर? असा चमत्कार या पूर्वी फक्त एकदाच झाला होता आणि आता त्याची पुनरूक्ती झाली ती अभिनव देशमुख यांच्याबाबत.

राज्याच्या पोलिस दलात ठाणे ग्रामीणला सर्वाधिक मागणी असते तर त्या खालोखाल पुणे ग्रामीणला पसंती असते. पुणे जिल्हा हा राजकीयदृष्ट्या कमालीचा संवेदनशील आहे. तब्बल 3 खासदार आणि 14 आमदार जिल्ह्यात आहेत. त्यामुळेच जिल्ह्यातील घडामोडींकडे पुणेकरांचेही लक्ष असते आणि राज्याच्या मुख्यमंत्र्यांसह प्रमुख नेत्यांचेही ! त्यातच पुणे हा राष्ट्रवादी कॉंग्रेसचा बालेकिल्ला समजला जातो.  जिल्ह्यातील नेते कायम सत्तेच्या परिघात असतात. त्यामुळे त्यांचेही या जिल्ह्यातील परिस्थितीवर बारकाईने लक्ष असते. त्यामुळे पुण्यात काम करण्यासाठी अनेकांचा प्रयत्न असतो. पुणे नाहीच मिळाले तर पुणे नाही मिळाले तर कोल्हापूर किंवा सांगलीलाही पसंती असते.

या पूर्वी डॉ. माधवराव सानप यांना कोल्हापूर, सातारा आणि पुणे जिल्ह्याचे अधीक्षक म्हणून काम करण्याची संधी मिळाली होती. सानप हे `एक गाव, एक गणपती`सारख्या योजनेमुळे चर्चेत आले होते. उपअधीक्षक म्हणून भरती झालेले सानप हे पोलिस महानिरीक्षक म्हणून निवृत्त झाले. त्यानंतर त्यांनी राजकारणाचा रस्ता धरला आणि ते भाजपमध्ये गेेले.

सानप यांच्या धर्तीवर तीनही जिल्ह्यांत पोस्टिंगची संधी पुण्याचे विद्यमान अधीक्षक अभिनव देशमुख यांना मिळाली आहे. ते थेट आयपीएस आहेत. मात्र हे तीन जिल्हे करण्यासोबतच त्यांनी गडचिरोलीसारख्या संवेदनशील जिल्ह्यात चांगला ठसा उमटवला. तेथे एसपी म्हणून त्यांची कारकिर्द गाजली.  देशमुख यांनी याआधी कोल्हापूरमध्ये उमटवलेला ठसा त्यांना पुण्यात आणण्यासाठी उपयुक्त ठरला, असे म्हटले जाते. तर, चांगल्या अधिकाऱ्यांच्या कायम शोधात असलेल्या राष्ट्रवादीच्या नेत्यांनीही त्यांची शिफारस एकमताने केली होती.

पश्चिम महाराष्ट्रातील सातारा आणि पुणे या दोन्ही जिल्ह्यांत अधीक्षक म्हणून काम करण्याची संधी या पूर्वी सुरेश खोपडे आणि संदीप पाटील यांना मिळाली.  आता त्यात देशमुख यांच्या नावाची भर पडली आहे. पुणे जिल्ह्यात ठसा उमटवलेल्या अधिकाऱ्यांना पुढच्या वाटचालीत चांगल्या ठिकाणी पोस्टिंग्ज मिळाल्या आहेत.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Sarkarnama News
sarkarnama.esakal.com