..... यामुळे पश्चिम महाराष्ट्रातून भाजप हद्दपार होणार : राष्ट्रवादीचा जोरदार दावा - BJP will finished from Western Maharashtra claims NCP | Politics Marathi News - Sarkarnama

ब्रेकिंग न्यूज

पूजा चव्हाण मृत्यप्रकरणी वनमंत्री संजय राठोड यांचा राजीनामा

..... यामुळे पश्चिम महाराष्ट्रातून भाजप हद्दपार होणार : राष्ट्रवादीचा जोरदार दावा

सरकारनामा ब्यूरो
मंगळवार, 23 फेब्रुवारी 2021

चंद्रकांतदादांसाठी कसोटीचा काळ 

मुंबई : पुणे पदवीधर विधान परिषद मतदारसंघाच्या निवडणुकीत राष्ट्रवादीने तीन महिन्यांपूर्वी बाजी मारल्यानंतर तो भाजपसाठी मोठा धक्का ठरला होता. आता पुन्हा सांगली महापौरपदी राष्ट्रवादीने भाजपचे बहुमत असताना आपला महापौर बसवला. त्यावर राष्ट्रवादीने जोरदार प्रकिक्रिया दिली असून पश्चिम महाराष्ट्रातून भाजप हद्दपार होणार असल्याचे हे संकेत म्हणून या विजयाचे कौतुक केले.

पदवीधर आणि महापौर निवड या दोन्ही निवडणुकांत राष्ट्रवादीचे प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील आणि भाजपचे प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील यांच्यात सामना झाला. दोन्ही वेळी जयंत पाटलांना `करेक्ट कार्यक्रम` केला. पदवीधर मतदारसंघात खुद्द चंद्रकांतदादाच हेच आमदार होते. ते कोथरूडमधून विधानसभेत गेल्याने त्यांनी विधान परिषदेचा राजीनामा दिला. येथे राष्ट्रवादी काॅंग्रेसचे अरुण लाड यांनी भाजपचे संग्राम देशमुख यांनी पराभव केला. तेव्हाच भाजपासाठी तो इशारा होता. 

त्यामुळे राष्ट्रवादीचा आत्मविश्वास दुणावला आहे. महाविकास आघाडीचे सरकार राज्यात सत्तेवर आल्यापासून झालेल्या विविध निवडणुकांत भाजपला मार खावा लागत आहे. ग्रामपंचायत निवडणुकांत आपणच क्रमांक एकवर असल्याचा दावा भाजपने केला होता. 

सांगली महापौरपदाच्या आज झालेल्या निवडणुकीत राष्ट्रवादीचे दिग्विजय सूर्यवंशी विजयी झाले आहेत. याबाबत बोलताना राष्ट्रवादीचे प्रवक्ते महेश तपासे म्हणाले की भाजपाचे प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील हे विधानपरिषदेच्या निवडणुकीत सातत्याने जयंत पाटील यांच्यावर वेगवेगळी वक्तव्ये करताना दिसत होते. परंतु पुणे पदवीधरची निवडणूक झाली आणि आजची निवडणूक होऊन भाजप पश्चिम महाराष्ट्रातून हद्दपार झाला आहे. भाजपला आता भविष्यात कधीच अच्छे दिन येणार नाही हे महाराष्ट्रातील जनतेने महाविकास आघाडी स्वीकारून दाखवून दिले असल्याचेही महेश भारत तपासे यांनी स्पष्ट केले.

सांगलीत नक्की काय घडले?

सांगली, मिरज आणि कुपवाड शहर महापालिकेचे पंधरावे महापौर म्हणून राष्ट्रवादी कॉंग्रेसचे दिग्विजय सूर्यवंशी यांची निवड झाली. त्यांच्या निवडीने इतिहासात प्रथमच आलेली भाजपची पुर्ण बहुमताची सत्ता अडीच वर्षात उलथली आहे. भाजपची सात सदस्य फुटले. पाच जणांचे राष्ट्रवादीला मतदान तर दोघे गैरहजर राहिले. 

दिग्विजय सूर्यवंशी यांना ३९ तर धीरज सूर्यवंशी यांना ३६ मते पडली. निवडणूक निर्णय अधिकारी जितेंद्रडुडी यांनी दिग्विजय यांना विजयी घोषित केले.ऑनलाईन होणाऱ्या या निवडणुकीत कॉंग्रेस-राष्ट्रवादीचे सदस्यकोल्हापूरातून तर भाजपचे सदस्य खरे क्‍लब हाऊसमधून मतदान केले. साडेअकरा वाजता प्रत्यक्ष प्रक्रियेस सुरवात झाली. त्यानंतर पंधरा मिनिटे अर्ज माघारीसाठी असतील. त्यानंतर दिलेल्या लिंकद्वारे बारा वाजता ऑनलाईन मतदान होईल, असे जाहीर करण्यात आले.

जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी जितेंद्र डुडी यांनी या सभेचे अध्यक्ष म्हणून काम पाहिले. गेले चार दिवस रंगलेला सदस्यांच्या फुटीचा, उमेदवारीचा सस्पेन्स दुपारी साडेबाराच्या सुमारा संपला आणि निवडणुकीचे चित्रही स्पष्ट झाले. ३९  विरुध्द ३६ मतांनी दिग्विजय सूर्यवंशी विजयी झाले.

अधिक राजकीय बातम्यांसाठी सरकारनामा अॅप डाऊनलोड करा
Play Store    App Store

संबंधित लेख