सहकार क्षेत्रातले दिग्गज अशोक काळभोर यांचे निधन - Well known personality in Co-operative sector Ashok Kalbhor Passes Away | Politics Marathi News - Sarkarnama

ब्रेकिंग न्यूज

हिवाळी अधिवेशन 14 आणि 15 डिसेंबरला मुंबईत होणार

सहकार क्षेत्रातले दिग्गज अशोक काळभोर यांचे निधन

सरकारनामा ब्युरो
रविवार, 4 ऑक्टोबर 2020

पुणे जिल्ह्यातील सहकार क्षेत्रातील दिग्गज व्यक्तीमत्व असलेले अशोक काशिनाथ काळभोर ( वय. ६९ ) यांचे दुःखद निधन झाले. त्यांच्या पश्चात पत्नी, दोन भाऊ, दोन मुले, सुना, नातवंडे असा मोठा परिवार आहे. 

लोणी काळभोर : पुणे जिल्ह्यातील सहकार क्षेत्रातील दिग्गज व्यक्तीमत्व असलेले अशोक काशिनाथ काळभोर ( वय. ६९ ) यांचे दुःखद निधन झाले. त्यांच्या पश्चात पत्नी, दोन भाऊ, दोन मुले, सुना, नातवंडे असा मोठा परिवार आहे. 

पुणे जिल्हा मध्यवर्ती सहकारी बॅंक व थेऊर येथील यशवंत सहकारी साखर कारखाना यांचे अध्यक्ष व गुलटेकडी येथील हवेली कृषी उत्पन्न बाजार समितीचे संचालक म्हणून त्यांनी अतिशय चांगले काम केले होते. त्यांनी हवेली तालुक्यात विविध सहकारी संस्थांची उभारणी केली होती. तालुक्यातील सहकार क्षेत्रात त्यांचा दबदबा होता. लोणी काळभोर ग्रामपंचायतीचे सदस्य व लोणी काळभोर विविध कार्यकारी सेवा सहकारी संस्थेचे संचालक म्हणून ही त्यांनी काम पाहिले होते. 

सन २००४ सालच्या विधानसभा निवडणुकीत शिवसेनेचे उमेदवार म्हणून त्यांनी पुरंदर हवेली विधानसभा मतदारसंघात निवडणुक लढवली होती. जेष्ठ नेते शरद पवार व अजित पवार यांचे ते अतिशय जवळचे सहकारी होते. 
Edited By - Amit Golwalkar

अधिक राजकीय बातम्यांसाठी सरकारनामा अॅप डाऊनलोड करा
Play Store    App Store

संबंधित लेख