...तर थेट मुख्यमंत्र्यांना सांगा! आमदार मोहितेंनी आढळरावांना दिलं आव्हान - MLA Dilip Mohite criticize Shivajirao Adhalrao Patil over Ringroad Project | Politics Marathi News - Sarkarnama

ब्रेकिंग न्यूज

शरद पवार आज अमित शहांच्या भेटीला, शहांकडे सहकार खात्याचा कारभार आल्यानंतरची पहिलीच भेट

...तर थेट मुख्यमंत्र्यांना सांगा! आमदार मोहितेंनी आढळरावांना दिलं आव्हान

राजेंद्र सांडभोर
रविवार, 11 जुलै 2021

खेड तालुका रिंगरोड व रेल्वे विरोधी शेतकरी कृती समितीच्या प्रतिनिधींनी रविवारी आमदार मोहिते यांची भेट घेतली.

राजगुरूनगर : खेड तालुक्यातील रिंगरोडवरून आता राजकारण तापू लागलं आहे. आमदार दिलीप मोहिते यांनी रविवारी माजी खासदार शिवाजीराव आढळराव पाटील यांना थेट आव्हान दिलं. रिंगरोडलाबाबत नकारात्मक पवित्रा आणि रेल्वेला पाठिंबा अशी दुटप्पी भूमिका न घेता रिंगरोडला स्थगिती देण्यास मुख्यमंत्र्यांना सांगावे, असे आव्हान मोहिते यांनी आढळरावांना दिले. (MLA Dilip Mohite criticize Shivajirao Adhalrao Patil over Ringroad Project) 

खेड तालुका रिंगरोड व रेल्वे विरोधी शेतकरी कृती समितीच्या प्रतिनिधींनी रविवारी आमदार मोहिते यांची भेट  घेतली. या बैठकीनंतर मोहिते यांनी पत्रकार परिषदेत आपली भूमिका मांडली. आपण लोकांबरोबर असल्याचे सांगत ते म्हणाले, लोकांना विश्वासात घेऊन रिंगरोड करायला हवा. रस्ता जास्तीत जास्त सरकारी जमिनींमधून जावा, अशी अपेक्षा आहे. रस्त्याची आखणी बदलता येत असेल तर बदलायला हवी. भूमिहीन होणाऱ्या शेतकऱ्यांबाबत वेगळा विचार करणे गरजेचे आहे. 

हेही वाचा : मंत्री झाल्यानंतर राणेंच्या पहिल्याच कार्यक्रमाला फडणवीस अन् शिवसेनेतील कट्टर विरोधक

रेडी रेकनरचे दर चालू बाजारभावापेक्षा खूपच कमी आहेत. त्याबाबत सर्व आमदार मिळून निर्णय घेत असतात. त्यांनी तो दर वाढविण्याचा निर्णय घ्यावा, अशी भूमिका मोहिते यांनी मांडली. रिंग रोडच्या भूसंपादनासंदर्भात आढळराव पाटील हे बाधित शेतकऱ्यांमध्ये संदिग्धता निर्माण करीत आहेत. त्यामध्ये वाद निर्माण करून त्यांना काय साध्य होणार आहे, असा सवालही मोहिते यांनी उपस्थित केला.

आढळराव यांनी एमआयडीसी, एसईझेड या प्रकल्पांनाही विरोध करून ही अस्तित्वात आले. अमोल कोल्हे खासदार झाल्यानंतर रेल्वे आली. पण रेल्वे आणण्याचे श्रेय आढळरावांना हवे आहे. खरेतर सध्याच्या रेल्वेमार्गाचा तालुक्याला फारसा फायदाही नाही. पूर्वी तळेगाव दाभाडेच्या बाजूने झालेले सर्वेक्षण फायद्याचे होते. तालुका मुंबईशी जोडला गेला असता. शेतमाल मुंबईला पाठविता आला असता, असे मोहिते म्हणाले.

दरम्यान, कृती समितीचे प्रतिनिधी आमदारांना भेटायला आले असता समितीचे अध्यक्ष पाटील गवारे आणि बाजार समितीचे संचालक बाळ ठाकूर यांच्यामध्ये वाद झाला. दोघांमध्ये वैयक्तिक टीका टिप्पणी होऊन खडाजंगी झाली. एकमेकांना शिविगाळही झाल्याने काही काळ तणाव निर्माण झाला होता. 

अधिक राजकीय बातम्यांसाठी सरकारनामा अॅप डाऊनलोड करा
Play Store    App Store

संबंधित लेख