उजनीच्या पाणीप्रश्नात जयंत पाटलांनी लक्ष घातले; सिंचन भवनाकडे सोलापूर जिल्ह्याचे डोळे

सोलापूर जिल्ह्यातील पाच टीएमसी पाणी हे सांडपाण्याच्या नावाखाली इंदापूर येथील प्रकल्पाला वळविण्याचा निर्णय घेण्यात आलाय.
 Jayant Patil, Dattatraya Bharane .jpg
Jayant Patil, Dattatraya Bharane .jpg

पुणे : उजनी धरणातील पाणी इंदापूरला वळविण्याच्या निर्णाया वरुन सोलापूरचे पालकमंत्री दत्तात्रय भरणे (Dattatraya Bharne) आणि सोलापूरकरांमध्ये चांगलाच वाद पेटला आहे. या वादावर तोडगा काढण्यासाठी राष्ट्रवादी काँग्रेस प्रदेशाध्यक्ष व जलसंपदा मंत्री जयंत पाटील ( Jayant Patil) यांच्या उपस्थित पुण्यातील सिंचनभवनात दत्तात्रय भरणे आणि सोलापूरमधील शिष्ट मंडळ यांच्यात बैठक होणार आहे. (A meeting chaired by Janyat Patil on the decision to divert water from Ujani dam to Indapur)

सोलापूर जिल्ह्यातील पाच टीएमसी पाणी हे सांडपाण्याच्या नावाखाली इंदापूर येथील प्रकल्पाला वळविण्याचा निर्णय घेण्यात आलाय. या निर्णयावरून सोलापूर आणि पालकमंत्री भरणे यांच्यात मोठा संघर्ष सुरू झाला आहे. हा निर्णय रद्द करण्यासाठी विविध संघटनांसह स्थानिक शेतकऱ्यांनी याला विरोध दर्शविला असून विविध प्रकारची आंदोलने देखील केली. पाच टीएमसी पाणी इंदापूरला गेल्यास एक आवर्तन कमी होणार असल्याने जिल्ह्याचे नुकसान होईल यामुळे सोलापूरमध्ये संतापाची भावना पसरली आहे.

गेल्या अनेक दिवसांपासून पालकमंत्री आणि सोलापूरकर यांच्यातील हा वाद विकोपाला गेल्याने जयंत पाटील यांनी हस्तक्षेप करण्याचा निर्णय घेतलाय. त्यामुळे सिंचनभवनात पाटील, दत्तात्रय भरणे आणि सोलापूरमधील शिष्ट मंडळ यांच्यात बैठक होणार आहे. या बैठकीत काय निर्णय होतो याकडे सोलापूरकरांचे लक्ष लागले आहे. सिंचनभवनला मोठा पोलिस बंदोबस्त तैनात करण्यात आला आहे. 

हे ही वाचा

जयंत पाटलांनी शब्द पाळला : मंगळवेढा उपसा सिंचन योजनेचे सर्वेक्षण सुरू

मंगळवेढा (जि. सोलापूर) : बहुचर्चित मंगळवेढा उपसा सिंचन योजनेच्या माध्यमातून तालुक्यातील वंचित 24 गावांना पाणी देण्याच्या दृष्टीने महाविकास आघाडी सरकारने प्रयत्न सुरू केले आहेत. या योजनेच्या सर्वेक्षणाचे काम सुरू झाले आहे. त्यासंदर्भात जलसंपदा मंत्री आणि राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील (Jayant Patil) यांनी सलगर बुद्रूक येथे पोटनिवडणुकीच्या प्रचारादरम्यान शब्द दिला होता. तो त्यांनी खरा केला आहे.

राजकीय पातळीवर 2009 पासून खळबळ उडवून देणाऱ्या 35 गाव उपसा सिंचन योजनेवरून अजूनही चर्चा सुरू आहे. जवळपास 560 कोटी रुपयांच्या या योजनेस 2014 मध्ये प्रशासकीय मान्यता देण्यात आली होती. मात्र, राज्यात सत्ताबदल झाल्यामुळे या योजनेतील गावे आणि 1 टीएमसी पाणी कमी करून या योजनेसाठीचा प्रस्ताव मागील भाजप-शिवसेना सरकारच्या काळात सादर करण्यात आला होता.   

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Sarkarnama News
sarkarnama.esakal.com