पुण्यात मनसेचे कार्यालय पेटवून देण्याचा प्रयत्न

डहाणूकर कॉलनी परिसरात असलेले महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे कार्यालय पेटवून देण्याचा धक्कादायक प्रकार पुढे आला आहे. ही घटना डहाणूकर कॉलनीतील पक्षाच्या कार्यालयामध्ये मतदानाच्या दुसऱ्या दिवशी मंगळवारी घडली. याप्रकरणी अलंकार पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल झाला आहे. सलग दुसऱ्यांदा मनसेचे कार्यालय पेटवून देण्याचा प्रयत्न झाल्यामुळे कार्यकर्त्यांकडून संताप व्यक्त केला जात आहे.
MNS Flag And Logo
MNS Flag And Logo

पुणे :  डहाणूकर कॉलनी परिसरात असलेले महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे कार्यालय पेटवून देण्याचा धक्कादायक प्रकार पुढे आला आहे. ही घटना डहाणूकर कॉलनीतील पक्षाच्या कार्यालयामध्ये मतदानाच्या दुसऱ्या दिवशी मंगळवारी घडली. याप्रकरणी अलंकार पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल झाला आहे. सलग दुसऱ्यांदा मनसेचे कार्यालय पेटवून देण्याचा प्रयत्न झाल्यामुळे कार्यकर्त्यांकडून संताप व्यक्त केला जात आहे. 

यप्रकरणी मनसेचे प्रदेश सरचिटणीस व प्रवक्ते हेमंत संभूस (वय 46, रा. कोथरुड ) यांनी अलंकार पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, कर्वे रस्त्यावरील डहाणूकर कॉलनीमध्ये रस्त्याच्याकडेला स्वयंभू प्रतिष्ठान व मनसेचे कार्यालय आहे. 21 ऑक्‍टोबर रोजी मतदान झाले. त्यानंतर दुसऱ्या दिवशी रात्री नऊ वाजेपर्यंत संभूस व त्यांचे कार्यकर्ते कार्यालयात होते. त्यांना भेटण्यसाठी आलेल्या ज्येष्ठ नागरीक व महिलांशी संवाद साधल्यानंतर सर्वजण निघून गेले. 

त्यानंतर रात्री पावणे दहा वाजण्याच्या सुमारास अनोळखी व्यक्तींनी कार्यालयाला अगा लावून तेथून पळ काढला. या घटनेची माहिती स्थानिक नागरीकांनी संभूस यांच्यासह अग्निशामक दलास दिली. जवानांनी काही मिनीटातच आग आटोक्‍यात आणली. त्यामध्ये कार्यालयातील महत्वाच्या फाईल्स, फायबर पत्रा व अन्य वस्तु जळाल्या. 

कोथरूड विधानसभा मतदारसंघातून भारतीय जनता पक्षाचे नेते चंद्रकांत पाटील यांच्या विरोधात मनसेचे उमेदवार किशोर शिंदे यांनी निवडणूक लढवित जोरदार टक्कर दिली होती. त्या रागातून अनोळखी व्यक्तींनी जाणीवपुर्वक मनसेच्या कार्यालयास पेटवून देण्याचा प्रयत्न केल्याची शक्‍यता संभूस यांनी व्यक्त केली. 

मनसेचे कार्यकर्ते घेणार आरोपीचा शोध 
मनसेचे कार्यालय पेटवून देण्याचा प्रयत्न यापुर्वीही एकदा झाला होता. त्यावेळी मनसेचे नेते अनिल शिदोरे यांनी पोलिसांकडे अर्ज सादर करुन आरोपींवर कठोर कारवाई करण्यास सांगितले होते. मात्र त्यावर ठोस कारवाई झाली नाही. त्यानंतर पुन्हा एकदा हा प्रकार घडला, त्यामुळे हा प्रकार करणाऱ्यांचा शोध घेण्याचे काम मनसेच्या कार्यकर्त्यांकडून केले जात आहे. 

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Sarkarnama News
sarkarnama.esakal.com