Pune to get fresh Vegetables in Lock down period | Sarkarnama

पुणेकरांनो चिंता नको; लाॅकडाऊनमध्येही ताजी भाजी मिळेल!

ज्ञानेश सावंत
गुरुवार, 26 मार्च 2020

शहराच्या विविध भागांतील ६५ आठवडे बाजार आणि ३२ मंडई या ठिकाणी रोज सकाळी आणि काही वेळा सायंकाळीही फळ आणि पालेभाज्या उपलब्ध होणार आहेत. त्यासाठी महापालिका आणि मार्केट याडातील आडते असोसिएशन, शेती गट यांच्यात चर्चा झाली असून, या उपक्रमाला पुढच्या दोन दिवसांत सरवात होईल

पुणे  : पुणेकरांनो तुम्हाला रोज ताजी भाजी मिळणार आहे. तिही तुमच्या घराजवळ, हवी तेव्हा, हवी तेवढी भाजी आणि फळही मिळतील. आणि हो, हिरवीगार भाजी तशा स्वस्तातही मिळेल! कारण, थेट शेतकरी ही भाजी आणणार आहेत. ती तुमच्यापर्यंत पोचविण्याच्या उद्देशाने शहरातील सगळ्या मंडई आणि आठवडे बाजारात पालेभाज्या उपलब्ध करण्याचे नियोजन महापालिकेने केले आहे.

दरम्यान, शहराच्या विविध भागांतील ६५ आठवडे बाजार आणि ३२ मंडई या ठिकाणी रोज सकाळी आणि काही वेळा सायंकाळीही फळ आणि पालेभाज्या उपलब्ध होणार आहेत. त्यासाठी महापालिका आणि मार्केट याडातील आडते असोसिएशन, शेती गट यांच्यात चर्चा झाली असून, या उपक्रमाला पुढच्या दोन दिवसांत सरवात होईल, असे महापालिका आयुक्त शेखर गायकवाड यांनी बुधवारी सांगितले.

कोरोनाच्या पार्श्वभूमीवर अत्यावश्यक सेवा वगळता लॉकडाऊन करण्यात आले आहे. मात्र, भाजी खरेदीसाठी मार्केट याडात प्रचंड गर्दी होत आहे. त्याशिवाय महात्मा फुले आणि अन्य मंडईतही तसेच चित्र आहे. पुढील २० दिवस 'लॉकडाऊन' असल्याने फळ, पालेभाज्या मिळणार का, याबाबत लोकांत संभ्रमावस्था आहे. या पार्श्वभूमीवर लोकांच्या सोयीसाठी आठवडे बाजार आणि मंडईत भाजी उपलब्ध होणार आहे.

याबाबत गायकवाड म्हणाले, "शेतकऱ्यांकडून भाज्या मागविण्यात येतील आणि शेती गटाच्या माध्यमातून विक्री होईल. त्यासाठीचे वेळापत्रक जाहीर करण्यात येणार आहे. ज्या प्रमाणात मागणी असेल, त्याप्रमाणात मालाची पुरवठा होईल. याची काळजी घेण्यात आली आहे.”

अधिक राजकीय बातम्यांसाठी सरकारनामा अॅप डाऊनलोड करा
Play Store    App Store

संबंधित लेख