Pune District Political News Shivsena Silent on Shirur-Ambegaon | Sarkarnama

शिवसेनेकडून आंबेगाव-शिरुरसाठी गुप्ततेतील घडामोडी तेजीत...

भरत पचंगे
मंगळवार, 13 ऑगस्ट 2019

जिल्ह्यातील बारामती आणि शिरुर अशा दोनच विधानसभा मतदार संघात राष्ट्र्वादीकडून त्यांच्या दोनच बड्या नेत्यांची इच्छुक म्हणून नावे आल्याचे पक्षाकडून यापूर्वीच जाहिर केले आहे. पर्यायाने बारामतीत भाजपाकडून उमेदवारीसाठी ब-याच जोर-बैठका सुरू झाल्याची चर्चा असतानाच शिरुर-आंबेगामधून मात्र शिवसेनेकडून पूर्ण मौन पाळले गेले आहे.

शिक्रापूर : आगामी विधानसभा निवडणूकीसाठी शिरुर-आंबेगावमध्ये वंचित विकास आघाडीने नाथा शेवाळ्यांच्या निमित्ताने आघाडी घेतली, राष्ट्रवादीकडून 'वळसे पाटील पुन्हा..' असे म्हणत तब्बल सहाव्यांदा एकमेव इच्छुक म्हणून प्रोजेक्ट झाले आहेत. मात्र, शिवसेनेकडून नेमका उमेदवार कोण याबाबत पूर्णत: गुप्तता पाळली जात आहे. अर्थात स्वत: शिवसेना उपनेते शिवाजीराव आढळराव, जिल्हा बॅंकेच्या माजी उपाध्यक्षा जयश्री पलांडे, जिल्हा परिषदेचे माजी उपाध्यक्ष अरुण गिरे या तिघांच्या नावाची चर्चा असतानाच अपक्ष पंचायत समिती सदस्य प्रा.राजाराम बाणखेले यांनी थेट आढळराव यांच्या निवासस्थानी जावून बंद दाराआड चर्चा केल्याने ऐन पावसाळ्यात आंबेगाव-शिरुर चांगलाच राजकीय गरम झाला आहे. 

जिल्ह्यातील बारामती आणि शिरुर अशा दोनच विधानसभा मतदार संघात राष्ट्र्वादीकडून त्यांच्या दोनच बड्या नेत्यांची इच्छुक म्हणून नावे आल्याचे पक्षाकडून यापूर्वीच जाहिर केले आहे. पर्यायाने बारामतीत भाजपाकडून उमेदवारीसाठी ब-याच जोर-बैठका सुरू झाल्याची चर्चा असतानाच शिरुर-आंबेगामधून मात्र शिवसेनेकडून पूर्ण मौन पाळले गेले आहे. अर्थात लोकसभेत अपयश आलेले माजी खासदार शिवाजीराव आढळराव हेच उमेदवार असतील अशी अटकळ बांधली जात असताना जिल्हा बॅंकेच्या माजी उपाध्यक्षा जयश्री पलांडे, जिल्हा परिषदेचे माजी उपाध्यक्ष अरुण गिरे या दोघांचेही उमेदवारीचे प्रयत्न सुरूच आहेत. या शिवाय आढळराव यांचे चिरंजीव अक्षय आढळराव-पाटील यांच्याही नावाची चर्चाही आहे. 

मात्र, या सर्व चर्चा पूर्ण गुप्तता पाळूनच पक्षपातळीवर सुरू असल्याचे बोलले जाते. पर्यायाने शिवसेनेचा उमेदवार नेमका कोण याची उत्सूकता आहेच. अर्थात कधी काळी शिवसेनेचे तालुकाप्रमुख राहिलेले अपक्ष आंबेगाव पंचायत समिती सदस्य प्रा. राजाराम बाणखेले यांनी उमेदवारीसाठी शिवसेनेचे दार ठोठावत शिवसेनेच्या काही नेत्यांच्या मुंबईत भेटी घेतल्या आहेत. शिवाय दोन दिवसांपूर्वी आढळराव यांचे लांडेवाडी येथील निवासस्थानी त्यांचेशी तब्बल दीड तास बंद दाराआड चर्चा केल्याचा खुलासाही बाणखेले यांनी सकारनामाशी बोलताना केला. पर्यायाने शिवसेनेची ही गुप्तता नेमकी कुणाच्या नावावर येवून थांबते त्याची प्रचंड उत्कंठा मतदार संघाला आहे. अर्थात शिवसेनेबरोबरच राष्ट्रवादीचेही आंबेगाव तालुकाध्यक्ष राहिलेल्या प्रा. बाणखेले यांना राष्ट्रवादीची उमेदवारी मिळाली तरी नको आहे असे त्यांचे उत्तर असल्याने त्यांच्या बाबतही अनेक तर्कवितर्क लढविले जात आहेत. 

अशा सगळ्याच गुप्ततेच्या ढगांच्या गर्दीत आंबेगाव-शिरुर राजकीय दृष्ट्या चांगलाच तापला असून आगामी काळात आणखी ब-याच मोठ्या राजकीय घडामोडी होण्याची चिन्हेही आहेत. दरम्यान आढळराव यांचे निवासस्थानी चर्चेला गेल्यानंतर तिथे औरंगाबादचे माजी खासदार चंद्रकांत खैरेही अचानक उपस्थित झाल्याने त्यांचा सत्कारही यावेळी बाणखेले यांनी केल्याची छायाचित्रे सोशल मिडीयात चांगलीच व्हायरल झाली आणि चर्चेतही राहिली.    

शिवसेनेचे मौन अनेक राजकीय उलथापालथीचे...
शिवसेना शिरुर-आंबेगावच्या उमेदवारीबाबत सध्या पूर्ण मौन पाळून आहे. शिवसेनेला मतदार संघातील शिरुरच्या ३९ गावात बडे प्रस्थ असलेला एक राष्ट्रवादीचा बडा नेता हाताला लागल्याची चर्चा आहे. मुळातच ३९ गावांमधील राष्ट्रवादीच्या नेत्यांचे राजकीय भविष्य अंधारलेले असल्याचे अनेक नेते खाजगीत सांगतात. याच पार्श्वभूमीवर या नेत्याशी 'सरकारनामा'ने संपर्क करुन खातरजमा करुन घेतली असता त्यानेही या गोष्टीला दुजोराही दिला आहे. पर्यायाने आंबेगाव-शिरुरमध्ये शिवसेनेचे मौन पुढील काळात ब-याच राजकीय उलथापालथी करणारे असणार हे नक्की.         

अधिक राजकीय बातम्यांसाठी सरकारनामा अॅप डाऊनलोड करा
Play Store    App Store


संबंधित लेख