बलात्का-यांना एन्काउंटरनेच संपवा : पाबळ गावचा राज्यातील पहिला ग्रामसभा ठराव 

मागील आठवड्यात हैद्राबाद (तेलंगणा) येथील एका व्हेटरनरी डाॅक्टरवरबलात्कार करुन तिचा निर्घुण खून करणा-या चार आरोपींचा इन्काउंटर केल्याबद्दल पाबळ ग्रामसभेने तेलंगणा पोलिसांचे जाहीर अभिनंदन करुन बलात्का-यांचे यापुढे इन्काउंटरच करावे, असा ठराव करुन तशी मागणीही केली आहे.
Pune District Pabal Village Sarpanch Demands Encounter Killing of Rapists
Pune District Pabal Village Sarpanch Demands Encounter Killing of Rapists

शिक्रापूर : बलात्का-यांना इन्काउंटरनेच संपवा, तसे कायदे करा, कायदे बदला अशी आमच्या संपूर्ण गावची मागणी आहे....असा ग्रामसभा ठराव घेवून पाबळ (ता.शिरूर,जि.पुणे) येथील महिला सरपंच पल्लवी डहाळे यांनी धाडसी प्रस्ताव मांडला आणि गावाने एकमुखी ठरावही संमत केला आहे. आता हा ठराव केंद्र आणि राज्य सरकारकडे पाठवून या मागणीचा पाठपुरावा करणार असल्याचा निर्धारही सौ.डहाळे यांनी व्यक्त केला.

मागील आठवड्यात हैद्राबाद (तेलंगणा) येथील एका व्हेटरनरी डाॅक्टरवर बलात्कार करुन तिचा निर्घुण खून करणा-या चार आरोपींचा इन्काउंटर केल्याबद्दल पाबळ ग्रामसभेने तेलंगणा पोलिसांचे जाहीर अभिनंदन करुन बलात्का-यांचे यापुढे इन्काउंटरच करावे, असा ठराव करुन तशी मागणीही केली आहे. याच पार्श्वभूमीवर साईबराबादचे पोलिस आयुक्त व्ही.सी.सज्जनार यांचे अभिनंदन करुन त्यांनी केलेल्या इन्काउंटरचे जाहीर कौतुक सरपंच पल्लवी डहाळे यांच्यासह ग्रामस्थांनी केले.

या व्हेटरनरी डाॅक्टरवर बलात्कार करुन तिची क्रुर हत्या करणा-या चार आरोपींना ज्या पध्द्तीने साईबराबादचे पोलिस आयुक्त व्ही.सी.सज्जनार यांच्या पोलिस पथकाने इन्कौंटरने संपविले, त्याचे तीव्र पडसाद देशात-राज्यात पडले. बलात्काराचे गुन्हे कमी करायचे असतील आणि महिलांना सुरक्षितपणे जगण्याचे वातावरण करायचे असेल, तर आता अशा गुन्हेगारांना इन्काउंटरमध्येच संपवायला हवे, अशी जाहीर मागणी सरपंच पल्लवी डहाळे यांनी काल (दि.६) पाबळ येथे झालेल्या ग्रामसभेत मांडली. त्याला ग्रामस्थांचा जोरदार प्रतिसाद मिळाला.

दरम्यान, इन्काउंटरबाबत मानवाधिकार संघटनांकडून आणि भारतीय कायदा चौकटीमुळे अनेक वादविवाद उपस्थित होत असताना एका गावाने आणि त्यातील महिला सरपंचांनी बलात्काराच्या गुन्ह्यातील आरोपींना एन्काउंटरमध्ये खतम करा अशी जाहीर मागणी केली. सौ.डहाळे यांचेशी संपर्क साधून त्यांना प्रतिक्रिया विचारल्या असता, आपण आपल्या मागणीशी ठाम असून सदर मागणी व ग्रामसभा ठराव केंद्र आणि राज्य सरकारकडे पाठविणार असल्याचेही त्यांनी सांगितले.
 

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Sarkarnama News
sarkarnama.esakal.com