पुणे जिल्ह्यातून शिवसेना हद्दपार 

पुणे जिल्ह्यातून शिवसेना हद्दपार 

पिंपरी ः विधानसभेचे निकाल हे पिंपरी-चिंचवडच्या दोनपैकी एका खासदारांना खुशी,तर दुसऱ्यांना गम देणारे ठरले आहेत. शिवसेनेचे खासदार श्रीरंगअप्पा बारणे यांच्या मतदारसंघात (मावळ) गतवेळी महायुतीचे पाच आमदार होते. ते यावेळी दोनने कमी झाले.

तर ,त्याउलट राष्ट्रवादीचे खासदार डॉ. अमोल कोल्हे यांच्या मतदारसंघातील (शिरूर) त्यांची संख्या 2014 च्या एकवरून 2019 ला पाचवर गेली आहे. दरम्यान,पिंपरीसह खेड-आळंदीतीलाही आमदार गमावल्याने पुणे जिल्ह्यातून शिवसेना हद्दपार झाली आहे. 

एकूणच विधानसभेचा निकाल मावळात युतीच नव्हे,तर शिवसेना खासदारांनाही आत्मपरीक्षण करायला लावणारा ठरला आहे. कारण पाच महिन्यापूर्वी झालेल्या लोकसभेला मावळातील सहाही विधानसभा मतदारसंघात युती तथा शिवसेनेला दणदणीत आघाडी होती. तर, आता विधानसभेला त्यांना तीन मतदारसंघात पराभवाचे तोंड पाहावे लागण्याची पाळी पाच महिन्यात आली आहे. 

त्यांचा पिंपरी-चिंचवडमधील एकमेव आमदार आता राहिला नसल्याने शहरात विधासभेला शिवसेना शून्य झाली आहे. मावळमधील घाटावरील तीनपैकी तीन आमदार युतीचे (मावळ,चिंचवड भाजप,तर पिंपरी शिवसेना)होते. आता फक्त एकच (चिंचवड)राहिला आहे. ते म्हणजे भाजपचे लक्ष्मणभाऊ जगताप. 

पिंपरीत शिवसेनेचे ऍड. गौतम चाबूकस्वार,तर मावळात भाजपचे बाळा ऊर्फ संजय भेगडे या आमदारांचा पराभव झाला आहे. घाटाखालीही शिवसेनेने आपला उरणचा आमदार गमावला.मात्र,दुसरीकडे कर्जतला त्यांनी त्याची भरपाई करीत ती जागा राष्ट्रवादीकडून हिसकावली. परिणामी घाटाखाली त्यांचे बळ कायम राहिले आहे.पनवेलची गादी यावेळीही भाजपने कायम ठेवली. 

तिसऱ्या ठिकाणी,मात्र अपक्षाने बाजी मारली. एकूणच मावळात युतीचे बळ हे पाचवरून तीन झाले आहे.तर, डॉ. कोल्हेंच्या मतदारसंघात आघाडी तथा राष्ट्रवादीचे बळ हे एकवरून पाच आमदारापर्यंत वाढले आहे.फक्त आंबेगावातच ला दिलीप वळसे-पाटील हे राष्ट्रवादीचे आमदार होते. ,तर मनसे (जुन्नरला शरद सोनवणे))व शिवसेना (खेड-आळंदीत सुरेश गोरे )एकेक व भाजपचे तीन (शिरूर-हवेलीला बाबूराव पार्चाणे ,हडपसरला योगेश टिळेकर व भोसरीत महेशदादा लांडगे) आमदार होते. 

आता आंबेगावसह खेड-आळंदी (दिलीप मोहिते-पाटील तथा अण्णा), शिरूर-हवेली (अशोक पवार), जुन्नर (वल्लभ बेनके), हडपसर (चेतन तुपे)अशा पाच ठिकाणी राष्ट्रवादीचे आमदार झाले आहेत. नमूद करण्याजोगी बाब म्हणजे हडपसरमध्ये लोकसभेला युतीचे उमेदवार शिवसेनेचे शिवाजीराव आढळराव-पाटील यांना आघाडी होती.डॉ. खा.कोल्हे यांनी मतदारसंघातच राष्ट्रवादीचे एकाचे पाच आमदार केले नाही. तर त्यांची शिवस्वराज्य यात्रा आणि अमोघ वक्तृत्व यामुळे राज्यातही पक्षाचे आमदार वाढविण्यास हातभार लागला आहे. 
---- 

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Sarkarnama News
sarkarnama.esakal.com