पुणे जिल्हा काॅंग्रेसची धुरा पुन्हा संजय जगतापांकडे

पुणे जिल्हा काॅंग्रेसची धुरा पुन्हा संजय जगतापांकडे

पुणे : पुणे जिल्हा काॅंग्रेसच्या अध्यक्षपदी संजय जगताप यांच्या फेरनिवडीचा ठऱाव आज एकमताने ठराव मंजूर करण्यात आला. तो प्रदेश काँग्रेस कार्यकरिणीकडे पाठविण्यात आला. येत्या काही दिवसात प्रदेश कार्यकारिणी याबाबत अधिकृतपणे घोषणा करेल असे पक्षाचे निरीक्षक व वरिष्ठ नेत्यांनी सांगितले.

काॅंग्रेसच्या सध्या संघटनात्मक निवडणुका सुरू आहेत. त्यासाठीची बैठक आज काॅंग्रेस भवनमध्ये पार पडली. पुणे जिल्ह्यात अध्यक्षपदासाठी संजय जगताप यांचेच नाव पुढे आले. ते सर्वांनी मंजूर केले. झारखंडचे प्रदीप तुलसीयन हे निरीक्षक म्हणून उपस्थित होते.  

यावेळी पक्षाचे प्रवक्ते रत्नाकर महाजन, माजी मंत्री हर्षवर्धन पाटील, जिल्हाध्यक्ष संजय जगताप, आमदार संग्राम थोपटे, आमदार रामहरी रुपनवर, जिल्हा काँग्रेस निरीक्षक अलकाताई राठोड वरिष्ठ उपाध्यक्ष संग्राम मोहोळ आदी मान्यवर उपस्थित होते. 

पुणे जिल्ह्यासह महाराष्ट्रातील काँग्रेसच्या सर्व नेत्यांनी एकत्र येणे ही काळाची गरज असून आगामी काळात काँग्रेसला गतवैभव प्राप्त करुन द्यावयाचे असेल तर या क्षणापासून कंबर कसणे आवश्यक आहे, असे मत  तुलसीयन यांनी व्यक्त केले. तालुका स्तरापासून ते जिल्हा स्तरापर्यंतचे नेतृत्व हे सर्व समंतीने व पारदर्शक पद्धतीने निवडावे असे पक्षाचे उपाध्यक्ष राहुल गांधी यांचा आग्रह असल्याचे त्यांनी सांगितले. 

माजी मंत्री हर्षवर्धन पाटील यांनी सांगितले की मागील तीन वर्षाच्या नैराश्यजनक मानसिकतेतुन काँग्रेस पक्ष बाहेर पडत असून मागील महिन्याभरात सोशल मिडियावर जनतेचा रोष मोठ्या प्रमाणावर व्यक्त होण्यास प्रारंभ झाला आहे. आता याच वातावरणाचा संधीमध्ये रुंपातर करणे हे आपले कर्तव्य आहे.  

यावेळी आमदार संग्राम थोपटे, पक्षाचे प्रवक्ते रत्नाकर महाजन यांनी कार्यकर्ते व पदाधिकार्‍यांना मार्गदर्शन केले. प्रास्ताविक नंदुकाका जगताप यांनी केले. तर जिल्हा काँग्रेसचे सरचिटणीस पृथ्वीराज पाटील यांनी आभार मानले

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Sarkarnama News
sarkarnama.esakal.com