पुरंदर, भोर आणि इंदापूरसाठी पुणे जिल्हा काॅंग्रेस आक्रमक

sangram thopate
sangram thopate

पुणे : काॅंग्रेस आणि राष्ट्रवादीतील आघाडीत पुणे जिल्ह्यातील तीन मतदारसंघ काॅंग्रेससाठी त्वरीत जाहिर करावेत, अशी मागणी पुणे जिल्हा कॉंग्रेस समितीने आज केली.

जिल्हाध्यक्ष संजय जगताप यांच्या अध्यक्षतेखाली झालेल्या बैठकीत ही मागणी झाली. जिल्हा कॉंग्रेसचे उपाध्यक्ष  दिलीप बाठे यांनी ठराव मांडला.

दोन्ही काॅंग्रेसमधील जागा वाटप अद्याप ठरायचे आहे. इंदापूरची जागा काॅंग्रेसला सोडणार की नाही, याची सर्वाधिक उत्सुकता आहे. तसे पुरंदरमध्येही काॅंग्रेस आग्रही आहे. भोरमध्ये काॅंग्रेसचाच विद्यमान आमदार असल्याने तेथील जागा त्याच पक्षाकडे राहणार असल्याची शक्तता आहे. मात्र इंदापूर आणि पुरंदरबाबत राष्ट्रवादी काॅंग्रेसच निवडणूक लढविणार असल्याची चर्चा असल्याने काॅंग्रेस आता आक्रमक झाली आहे.

``पुणे जिल्यातील ११ विधानसभा मतदारसंघांपैकी आघाडीL किमान सात जागा या कॉंग्रेस पक्ष्याला मिळाल्याच पाहिजेत, तसेच भोर, इंदापूर, व पुरंदर या कॉंग्रेस पक्ष्यासाठी त्वरित जाहीर कराव्यात,”अशी मागणी त्यांनी केली. जुन्नर, मावळ खेड व खडकवासला या जागांची आघाडीत कॉंग्रेसच्या वतीने मागणी व्हावी, अशीही सूचना करण्यात आला.

बारामती व शिरूर लोकसभा मतदारसंघातील राष्ट्रवादीच्या उमेदवारांच्या विजयात कॉंग्रेस पक्षसंघटनेचा सिंहाचा वाटा आहे. त्यामुळे पक्षाची ताकद असलेल्या व निवडून येण्याची क्षमता असल्याने तीन मिळाल्या पाहिजेत. तसे नाही झाले तर पुणे जिल्यातील सर्व ११ विधानसभा मतदारसंघ कॉंग्रेस स्वबळावर लढेल, असा इशारा देण्यात आला.

कॉंग्रेस पक्षाची ताकद व तळागळातील संघटना या जागांसाठी जीव ओतून काम करण्यास सज्ज आहे. जनमत हे कॉंग्रेसकडे पुणे जिल्ह्यात झुकू लागल्याचे दिसून येत आहे. तसेच यापुढे कॉंग्रेस पक्ष्याचे सेवादल हे संघटन अग्रस्थानी असणार आहे व पुढील काळात सेवादलाचे कार्यकर्तेच हे कॉंग्रेसजणांचे सुरक्षा कवच राहणार आहेत, असे ठरविण्यात आले. 

माजी अध्यक्ष देविदास भन्साळी, प्रदेश प्रतिनिधी दत्तात्रय गवळी व कौस्तुभ गुजर, वरिष्ठ उपाध्यक्ष संग्राम मोहोळ, खजिनदार महेश ढमढेरे, सरचिटणीस पृथ्वीराज पाटील, जिल्हा युवक अध्यक्ष सोमनाथ दौंडकर, जिल्हा महिला अध्यक्ष सीमा सावंत, महिला उपाध्यक्ष अर्चना शहा, लहुअण्णा निवंगुणे- बारामती लोकसभा अध्यक्ष, वैभव यादव-शिरूर अध्यक्ष, गंगाराम मातेरे- मुळशी, राजू इनामदार- आंबेगाव, सचिन बराटे- खडकवासला. तसेच, निखील कवीश्वर, अतुल कारले, नंदू चौधरी बाळासाहेब प्रताप, कृष्णाजी शिंगारे, खंडू तिकोने, विजय डंबीर व अन्य पदाधिकारी उपस्थित होते.  
  

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Sarkarnama News
sarkarnama.esakal.com