Pune Corporation Supervisor Caught with Cash and Gold
Pune Corporation Supervisor Caught with Cash and Gold

अबब....पुणे महापालिकेच्या मुकादमाकडे 36 लाखांची रोकड, 10 तोळे सोने 

नारळ व्यावसायिकावर कारवाई न करण्यासाठी पाचशे रुपयांची लाच स्विकारणाऱ्या महापालिकेच्या मुकादमाच्या घराची झडती घेतल्यानंतर तेथे तब्बल 36 लाख रुपयांची रोकड व दहा तोळे सोने आढळून आले आ

पुणे : नारळ व्यावसायिकावर कारवाई न करण्यासाठी पाचशे रुपयांची लाच स्विकारणाऱ्या महापालिकेच्या मुकादमाच्या घराची झडती घेतल्यानंतर तेथे तब्बल 36 लाख रुपयांची रोकड व दहा तोळे सोने आढळून आले आहे. लाचलुचपत प्रतिबंधक विभागाने (एसीबी) मुकादमासह दोघांना अटक केल्यानंतर शनिवारी रात्री मुकादमाच्या घरी झडती घेतली. न्यायालयाने दोघांना 22 जानेवारीपर्यंत पोलिस कोठडी सुनावली आहे. 

मुकादम सुनील रामप्रकाश शर्मा (वय 55, रा. वडगावशेरी, नगररोड, क्षेत्रीय कार्यालय) आणि बिगारी गोपी मच्छिंद्र उबाळे (32, रा. वडगावशेरी, नगररोड क्षेत्रिय कार्यालय) अशी अटक केलेल्यांची नावे आहेत. तक्रारदाराच्या नारळ विक्री स्टॉलवर कारवाई न करण्यासाठी शर्मा व उबाळे यांनी एक हजार रुपयांची मागणी केली होती. त्यानुसार, तडजोडीअंती पाचशे रूपये देण्याचे निश्‍चित झाले होते. लाच स्विकारताना शनिवारी अधिकाऱ्यांनी दोघांना अटक केली होती. 

दरम्यान, दोघांना रविवारी सुट्टीच्या न्यायालयात हजर करण्यात आले. त्यावेळी अधिक तपासासाठी दोघांच्या पोलिस कोठडीची मागणी करण्यात आली. त्यानुसार, विशेष न्यायाधीर एस.आर. नावंदर यांनी दोघांना 22 जानेवारीपर्यंत पोलिस कोठडी सुनावल्याचे "एसीबी'चे पोलिस उपअधिक्षक श्रीहरी पाटील यांनी सांगितले. 

दरम्यान, 'एसीबी'च्या अधिकाऱ्यांनी शनिवारी रात्री शर्मा याच्या घरी झडती घेतली. रात्रभर सुरू असलेल्या या झडतीमध्ये पोलिसांना तब्बल 36 लाख रुपयांची रोकड व दहा तोळे सोने आढळून आले. 

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Sarkarnama News
sarkarnama.esakal.com