भाजपमधील बेशिस्तीची दखल शहराचे कारभारी घेतील का ?

 भाजपमधील बेशिस्तीची दखल शहराचे कारभारी घेतील का ?

पुणे : पुणे महानगरपालिकेत स्थायी समितीच्या निवडणुकीच्यावेळी अनुपस्थित राहिलेल्या नगरसेवकांना कारणे दाखवा नोटीस बजावण्यात आली आहे. राज्यातील सत्ता गेल्यापासून शहरातील भारतीय जनता पार्टीत अस्वस्थता आहे. महापालिकेत तब्बल 99 नगरसेवक असताना अशी स्थिती आहे. शिस्तबद्ध पक्षात बेशिस्त का निर्माण होत आहे याचा विचार पक्षाचे शहरातील कारभारी करतील का, असा प्रश्‍न नगरसेवकच उपस्थित करू लागले आहे. 

चार दिवसांपूर्वी महापालिकेच्या स्थायी समितीच्या अध्यक्षपदाची निवडणूक झाली. हेमंत रासने बहुमतांनी निवडून आले. स्थायी समितीत भाजपाचे बहुमत असल्याने त्यांची निवड ही केवळ औपचाकिरता होती. मात्र, यावेळी सर्व 99 नगरसेवकांनी उपस्थित राहावे, असे आदेश पक्षाने काढले. तरीही केवळ 20 ते 25 नगरसेवक उपस्थित होते. स्थायी समितीच्या सदस्यांमधून स्थायीच्या अध्यक्षांची निवड होते. त्यामुळे या निवडणुकीशी थेट आपला संबंध नाही,अशी नगरसेवकांची भावना होती. त्यामुळे अनेकजण अनुपस्थित होते. थेट संबंध नाही, ही नगरसेवकांची भूमिका योग्य मानली तरी पक्षाने आदेश देऊनही ते अनुपस्थित राहिले. याचा अर्थ पक्षाचा तसेच पक्षाच्या शहरातील नेत्यांचा धाक राहिलेला नाही हे स्पष्ट होते. अनुपस्थितीची दखल शहराध्यक्ष माधुरी मिसाळ यांनी जवळपास 75 नगरसेवकांना कारणे दाखवा नोटीस बजावली आहे. अनुपस्थित राहिल्याबद्दल नोटीस बजावण्याची पुणे भाजपामधील कदाचित पहिली वेळ असावी. 

महापालिका निवडणुकीच्या काळात कॉंग्रेस-राष्ट्रवादीतील अनेकजण भाजपावासी होत नगरसेवक झाले. त्यातील काहीजण सध्या नाराज असल्याचे सांगण्यात येत आहे. गेल्या अडीच वर्षात आपल्याला काहीच मिळाले नाही. अशी त्यांची भावना आहे. अर्थात केवळ बाहेरून आलेलेच नव्हे तर भूळच्या भाजपाच्या अनेक नगरसेवकांचीदेखील हीच भावना झाली आहे. गेल्या अडीच वर्षात ठराविक लोकांना पदे मिळाली ही त्या नाराजीचे कारण आहे. या साऱ्यांना नोटीसा दिल्यानंतर ते येतील खुलासेदेखील करतील. मात्र, नगरसेवकांमध्ये असलेल्या अस्वस्थतेचे कारभारी काय करणार ? पक्षात नेतृत्वात सुसूत्रता दिसत नाही. खासदार झाल्यामुळे गिरीश बापट लोकसभेच्या कामकाजात अडकले आहेत. चंद्रकांत पाटील प्रदेशाध्यक्षपदाच्या कामात व्यस्त आहेत. त्यामुळे नेत्यांचे पुण्याकडे दुर्लक्ष होत असल्याची भावना नगरसेवकांमध्ये निर्माण झाली आहे. पक्षाचे नेते आणि शहराचे कारभारी यात लक्ष घालणार का ? हा खरा प्रश्‍न आहे. 

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Sarkarnama News
sarkarnama.esakal.com